Mangesh Padgaonkar Information in Marathi
मंगेश पाडगावकर मराठी माहिती
मंगेश पाडगावकर एक निसर्ग कवी :
- ‘श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रे जल धारा,’ ‘आले मेघ भरून’ पावसाळी कुंद हवा, पावसाची रिपरिप सुरु झाली की हमखास ह्या गाण्यांची आठवण येते आणि पर्यायाने मंगेश पाडगावकरांची आठवण होते. पूर्वी पावसाची पहिली झड पाडली की हमखास पेपर मध्ये पाडगावकरांची पावसाची कविता लिज्जत पापडाच्या पहिल्या पानावरच्या जाहिरातीत कविता झळकायची.
- पाडगावकर ह्यांनी तब्बल बहात्तर वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केले. भावगीत, निसर्गगीत बालगीत आणि भ्रष्टाचारा विरुद्ध कविता अशा अनेक प्रांतात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविला.
मुंबईचा सारस्वत :
- पाडगावकरांचा जन्म १० मार्च १९२९ साली वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे झाला. पण बाकीचे सारे जीवन मुंबईत गेले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत ह्या विषयातून एम.ए केले.
- नंतर मिठीबाई कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले. नंतर USIS म्हणजे युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सर्विस मध्ये संपादक म्हणून काम केले. तसेच साधना साप्ताहिकात सह संपादक म्हणून काम केले. तसेच त्यांनी गृहस्थी पण नीट सांभाळली.
- त्यांना पत्नी यशोदा दोपाडगावकर दोन मुले आणि एक मुलगी होती. तसे पाहायला गेले तर कुटुंब, चांगली नोकरी असे चौकटीतील सुखी जीवन होते. पण हा कवितेचा ध्यास कसा लागला?
काव्य प्रतिभा :
- वयाच्या १४ व्या वर्षापासून पाडगावकरांनी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांचे पहिले प्रेम भावगीत होते. त्यांचे गाणे आणि अरुण दाते ह्यांचा आवाज ह्यांचा सुमधुर संगम ह्यांनी रसिकांवर अक्षरश: मोहिनी घातली. ‘भातुकलीच्या खेळा मधले राजा आणिक राणी’ हे गाणे तर ज्याच्या त्याच्या ओठावर खेळत होते.
- त्यानंतर ‘हात तुझा हातात धुंद हि हवा, अखेरचे येतील माझ्या एक शब्द ओठी, शुक्र तारा मंद वारा ह्या गाण्यानी तर सर्वांना वेड लावले. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे सुद्धा लोक विसरू शकत नव्हते.
अनुवाद आणि कादंबर्या :
- काव्याबरोबर त्यांनी लिखाण हि खूप केले.४० पुस्तके, वादळ नावाचे नाटक, स्नेह गाथा, मीराबाई, कबीर आणि सूरदास ह्यांच्या लिखाणाचा अनुवाद, बायबल च्या नव्या कराराचा अनुवाद, शेक्सपियरच्या जुलियस सीजर आणि रोमियो ज्युलीयेत ह्यांचा अनुवाद केला. जेम्स फेनिमोर ह्याच्या Path finder चे ‘वाटाड्या ‘ म्हणून भाषांतर केले. त्यांचे काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध झाले. ‘धारा नृत्य, शर्मिष्ठा, उत्सव, गझल, भटके पक्षी उदासबोध, वात्रटिका, विदुषक इत्यादी.
- लहान मुलांसाठी लिहिलेले ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणे तर सर्व लहान मुलांचे आवडते गाणे होते. ते स्वाभिमानी होते. गुजराती काव्य संमेलनात आणीबाणी विरुद्ध ‘सलाम’ हे काव्य लिहून सत्तेपुढे गुडघे टेकणाऱ्या लोकांना त्यांनी कान पिचक्या दिल्या.
- असा हा मनस्वी कवी ३० दिसेम्बर २०१५ ला काळाच्या पडद्या आड गेला. त्यांच्या निधनाने मराठी भावगीताची हानी झाली.