Yashwantrao Chavan Information in Marathi
माननीय यशवंतराव चव्हाण – सहकाराच्या चळवळीचे जनक
- चीनने भारतावर आक्रमण केले होते. आपला दारूण पराभव झाला होता. असंख्य सैनिक मारले गेले होते. पराभवाला कारणीभूत असलेल्या त्या वेळच्या संरक्षण मंत्री कृष्णा मेनन ह्यांनी राजीनामा दिला होता. राष्ट्राचे मनोधैर्य खचले होते. अशा वेळी दिल्ली सरकारला त्या पहाडी पुरुषाची आठवण झाली आणि हिमालयाच्या हाकेला ओ देऊन यशवंतराव चव्हाण हा सह्याद्री धावला. युद्धानंतरची परिस्थिती त्यांनी अतिशय कुशलतेने हाताळली.
- महाराष्ट्राचा हा सुपुत्र दिल्लीच्या राजकारणात एक अतिशय महत्त्वाचा एक्का होता. छोट्याश्या गावातून थेट दिल्ली पर्यंत गरूड झेप घेणारे हे व्यक्तिमत्व कसे होते बघू.
आईची शिकवण :
- यशवंतरावांचा जन्म १२ मार्च १९१३ मध्ये देवराष्ट्रे सातारा[सध्या सांगली] येथे झाला. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांना आई आणि मामानी वाढवले. आईने त्यांना स्वावलंबन आणि देश प्रेमाचे धडे दिले. त्यामुळे जेंव्हा स्वातंत्र्य संग्राम सुरु झाला तेंव्हा १७ व्या वर्षी त्यांनी गांधीच्या असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. यासाठी त्यांना दंड झाला. परंतु त्याच वेळी ते मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आले. त्यापैकी स्वामी रामा नंद भारती, धुळाप्पा नवले, अप्पासाहेब सुहासने आणि वी. एस. पागे. इत्यादी. त्यांची मैत्री शेवटापर्यंत टिकली. १९३२ मध्ये त्यांना साताऱ्यात तिरंगा फडकवला म्हणून १८ महिन्यांची सजा झाली.
कॉंग्रेस मध्ये प्रवेश आणि स्वातंत्र्य संग्राम :
- साताऱ्याला टिळक महाविद्यालयात शिकत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांनी असंख्य पुस्तके वाचली. तसेच स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी थोर लोकांचा, महात्मा गांधी, सरदार पटेल आणि नेहरू ह्यांचा सहवास लाभल्याने विचारण मध्ये प्रगल्भता आली. १९३८ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून हिस्टरी आणि पोलिटीकल सायन्स मधून B.A. केले. कॉंग्रेस पक्षात ते सक्रिय झाले. १९४० मध्ये ते सातारा जिल्ह्याचे कॉंग्रेस अध्यक्ष झाले. हे चालू होते तरी शिक्षण थांबले नव्हते. १९४१ मध्ये त्यांनी LLB केले. १९४२ मध्ये त्यांचा विवाह वेणूताई चव्हाण ह्यांच्याशी झाला. परंतु तेंव्हाच १९९४२ च्या चले जाव च्या चळवळीत त्यांना पुन्हा तुरुंगवास घडला. ते दोन वर्षानंतर त्यांना सोडले.
- त्या वेळी मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी म्हणून नाही तर बॉम्बे स्टेट म्हणून ओळखली जायची.१९४६ मध्ये ते सातारा मतदारसंघातून मेंबर ऑफ लेजीस्लेटीव असेंब्ली म्हणून निवडून आले. त्याच वेळी त्यांना बॉम्बे स्टेट चे होम मिनिस्टर चे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून निवडले गेले. त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. १९५० मध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा गर्जना सुरु झाल्या. भाषावार प्रांत रचना झाल्यामुळे ह्या मागणीचा जोर वाढला. त्या वेळी यशवंतराव चव्हाण कराड मधून निवडून आले होते. आणि त्यांना द्विभाषिक बॉम्बे स्टेट चे मुख्यमंत्री केले गेले. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे कॉंग्रेसला खूप जागा गमावाव्या लागल्या. यशवंत रावांच्या मध्यस्थीमुळे आणि पाठपुराव्यामुळे इच्छा नसताना ही नेहरुंना मराठीसहित मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. एका अर्थाने हा त्याच्या मुत्सद्दीपणाचा विजय होता. म्हणून त्यांना ‘मुंबईसहित महाराष्ट्राचा शिल्पकार’ म्हणतात.
- यशवंतरावाना पहिल्या मुंबई सहित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले गेले. त्या वेळी त्यांनी १९६२ मध्ये अतिशय महत्त्वाचा Co Operative Society Act पास केला. त्यावर PHD केलेल्या Dr. भावना पाटोळे म्हणतात. की, “यशवंत राव चव्हाण ह्यांनी मागास भागात शेत बरोबरच उद्योग ह्यांचा विकास झाला पाहिजे असे पहिले.”
दिल्लीवर स्वारी :
- यशवंत रावांच्या धोरणीपण आणि मुत्सद्देगिरीचा प्रत्यंतर आल्यामुळे पंडित नेहरूनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. कारण १९६२ च्या चीन बरोबरच्या युद्धात आपला दारूण पराभव झाला आणि सैनिकांचे मनोधैर्य ढासळले होते. यशवंत रावांनी सगळी परिस्थिती कुशलतेने हाताळली. ह्यावर श्री के.सुब्रामानियान संरक्षण विश्लेषक ह्यांनी लिहिले आहे की, “ श्री चव्हाण यांनी मला बोलावून सैनिकांसाठी काय करता येईल ते विचारले. मी सांगितले की अपंग सैनिकांना कायम नोकरी आणि शहीद सैनिकांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण द्यायला पाहिजे. हे आधीच्या अर्थ मंत्र्यांनी ऐकले नाही. पण यशवंतराव ह्यांनी ते अमलात आणले.”
- अर्थातच पुढे १९७१ च्या भारत पाक युद्धात आणि १९७५ च्या बांग्लादेश स्वातंत्र्य युद्धात आपण बाजी मारली. श्री चव्हाण हे श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७०ते १९७४ अर्थमंत्री होते. नंतर स्वर्ण सिंह पंतप्रधान असताना परराष्ट्र मंत्री होते. त्यानंतर १९७९ ते १९८० चरण सिंह आणि मोरारजी देसाई पंतप्रधान असताना गृह मंत्री होते.
- २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० पर्यंत ते महाराष्ट्रातील एकमेव उप पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्याची क्षमता असूनही ते पंतप्रधान झाले नाही पण महाराष्ट्रातील ते एकमेव मंत्री होते ज्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री ही अतिशय महत्त्वाची खाती अत्यंत कुशलतेने सांभाळली. दिल्ली दरबारात त्यांचा अतिशय दबदबा होता. त्यांच्या मताला तेथे खूप किमत होती. त्यांचा दूरदर्शीपणा, विकासाच्या योजना, शेतकर्या बद्दल कळकळ आणि महाराष्ट्राचा अभिमान हे गुण क्वचितच एखाद्या नेत्यामध्ये आढळतील.
- दिल्लीत असतानाही त्यांचे महाराष्ट्राकडे लक्ष होते. त्यांनी खूप वाचन केले होते. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनाला ते हजर असत. त्यांना त्यांचे आत्मचरित्र लिहायचे होते. त्यांच्या जीवनाचे तीन टप्पे होते. बालपण आणि मुंबईचे पहिले मुख्यमंत्रीपद, त्यानंतर दिल्लीचे वास्तव्य. असे तीन खंड होते त्याला त्यांनी नावे दिली होती कृष्णा तीर, सागर तीर, आणि यमुना तीर. परंतु कृष्ण तीर पूर्ण झाल्यावर २५ नोव्हेंबर १९८४ मध्ये वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.
- असा हा धोरणी दूरदर्शी राजकारणी आणि साहित्य प्रेमी नेता हरपण्यामुळे महाराष्ट्राची खूपच हानी झाली.
Yashvantrao Chavan Information in Marathi Language Wikipedia : Biography
Related posts
Sonia Gandhi Information in Marathi || Biography, Mahiti and History
Rahul Gandhi Information in Marathi : Essay, Biography, Nibandh
Mother Teresa Information in Marathi ll मदर तेरेसा माहिती
Gautam Buddha Information in Marathi | गौतम बुद्ध माहिती
APJ Abdul Kalam Information in Marathi, Essay, Nibandh & Biography
Donald Trump Information in Marathi : डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती