Weight Loss Tips & Upay Marathi
- जाडेपणा किंवा वाढते वजन हि मोठी समस्या भारतातच नाही तर संपूर्ण जगाला आहे. ह्या लेखात तुम्ही शिकाल, जाडेपणा कमी करण्याचे १० सोपे आणि नैसर्गिक उपाय.
- सर्वात प्रथम, जाडेपणा कमी करण्यासाठी मानसिक रीत्या तैयार होणे आवश्यक आहे. हा एक प्रवास आहे आणि ह्या साठी आपले पूर्ण समर्पण गरजेचे आहे. तसेच, तुम्हाला तुमचे स्वास्थ, जीवन शैली आणि दाबून खाण्याच्या सवयीला बदलावं लागेल.
- जास्तीत जास्त पाणी पिणे तुमचे वजन कमी करण्यात खूप फायदेशीर ठरते. फक्त ह्या एका नियमाचे पालन करून तुम्ही तुमच्या दैनंदिन कॅलरीज कमी कराल. जेवण जेवण्यापूर्वी अर्धा तास आधी १ ग्लास पाणी जरूर प्या. रोज २ – ३ लिटर पाणी जरूर प्यावे.
- सकाळची न्याहरी सोडू नका – बहुतेक वेळा लोक डाएटिंग च्या चक्कर मध्ये खाणे बंद करतात. पण खाणे सोडल्याने जाडेपणा कमी नाही होत तर शरीराला कमजोरी येऊ लागते. सकाळच्या न्याहारीत दुधा सोबत कोर्न फ्लेक्स, फळे, पोहे किंवा उपमा घ्या.
- दुपार आणि रात्रीच्या जेवणात मैद्याचे ब्रेड किंवा पोळी आणि भात खाण्याऐवजी तपकिरी तांदूळ किंवा तपकिरी ब्रेडचा उपयोग करा. पोळ्या घरगुती गव्हाच्या पिठापासून बनवणे जास्त लाभदायक आहे. भाताच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा आणि भाज्या व सलाडच्या सेवनाचे प्रमाण वाढवा.
- जास्त तळलेले, मसालेदार आणि फास्टफूड खाणे टाळा. ह्या पदार्थांमध्ये अनैसर्गिक तत्व आणि जास्त कॅलरीज असतात, ज्यांचे पचन होण्यासाठी शरीराला खूप वेळ लागतो.
- अभ्यासावरून कळले आहे की – जेवण हळूहळू चावून खाणे आपल्या पाचक क्रियेला मदत करते आणि तुम्ही कमी कॅलरीज खाता. ज्यामुळे वजन कमी करणाऱ्या हार्मोन्स चे निर्माण वाढते.
- वजन कमी करण्यात काही पदार्थांचा विशेष फायदा होता. ह्या पदार्थांचे सेवन अशा प्रकारे करा – लिंबू पाणी (कमी साखरेचे, रोज एक ग्लास); आल्याचा रस (रोज २ चमचे) आणि ग्रीन टी (दिवसातून १ -२ वेळा)
- काही शोधाकर्त्यांचे म्हणणे आहे – जेवताना छोट्या प्लेटचा उपयोग करून स्वनिर्धारित मार्गाने कमी कॅलरीज खाण्यात मदत होते. विचित्र रीत आहे परंतु बऱ्याच लोकांसाठी उपयोगी ठरते.
- रात्री उशिरा जेवण्याने तुमच्या कॅलरीजचे सेवन खूप प्रमाणात वाढते, असे टेक्सास युनिव्हर्सिटी ने केलेल्या परीक्षणातून समजले आहे. रात्रीचे उशिरा खाणे टाळून तुम्ही ३०० किंवा त्याहून अधिक कॅलरीज कमी करू शकतात.
- वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करने खूप गरजेचे आहे. तुम्ही रोज जेवढ्या कॅलरीज खातात तेवढ्या दैनंदिन शारीरिक हालचाली आणि व्यायामाने खर्च झाल्या पाहिजेत. एरोबिक व्यायाम जसे पळणे, सायकलिंग करणे आणि पोहणे हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम आहेत आणि तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम करतात. जर तुम्ही रोज सक्रीय व्यायाम नाही करू शकलात, तरीही जिने चढणे किंवा ३०-४० मिनिटे वेगाने चालणे अशा हालचाली जरूर करा.
- संतुलित आहार आणि व्यायाम सोबतच पुरेशी झोप घेणे सुद्धा गरजेचे आहे. झोप पूर्ण न झाल्याने शरीरात तणाव वाढवणारे हार्मोन्स तयार होतात जे तुम्हाला जास्त खाण्यासाठी प्रेरित करतात. रात्री सात – आठ तास झोप घेणे जरुरी आहे.
Related posts
Vastu Shastra Tips in Marathi, Vastu Shastra for Flats, Kitchen, Money
Hair Care Tips in Marathi I ' केसांची निगा ' माहिती
Skin Care Tips in Marathi : Dry, Oily & Glowing Healthy Skin Tips
Pimple Upay in Marathi, Face Pimple Treatment & Removal
Gomutra Benefits in Marathi |गोमूत्राचे गुणधर्म(फायदे)
Amla Information in Marathi | Benefits (फायदे) आवळा
Nice tips in you are website. Thank you so much