Complaint Letter in Marathi
Patra Lekhan : Example 1 – Water leak Letter in Marathi Language
प्रति,
चेअरमन/ सेक्रेटरी, [अध्यक्ष/कार्यवाह],
सहयोग को-ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड,
जांभळी नाका,
ठाणे ४००६०२.
०४ जानेवारी २०२०.
विषय :- वरच्या मजल्यावरील बेसिन मधून पाणी गळण्याबाबत
महाशय/ महोदया,
मी, श्री वासुदेव श्रीकृष्ण परांजपे, आपली सोसायटीत पहिल्या मजल्यावर फ्लॅट नम्बर १०४ मध्ये राहतो. माझ्या वरच्या मजल्यावर श्री नीलकंठ दामले ह्यांचा फ्लॅट क्रमांक २०४ आहे. गेले कांही दिवस त्यांच्या घरातील बेसिन मधून आमच्या स्वयंपाकाच्या ओट्यावर पाणी गळत आहे.अगदी धार लागल्यासारखे पाणी गळत आहे. त्यामुळे सर्व ओट्यावर पाणी उडत आहे. अगदी स्वैपाकात पण त्या घाणेरड्या पाण्याचे तुषार उडतात. आम्ही त्यामुळे स्वैपाक पण करू शकत नाही. तसेच त्यांच्या बाथरूम मधून हि आमच्या बाथरूम मध्ये पाण्याचे सिपेज होत आहे. बाथरूम च्या भिंतीवर ओल आलेली आहे आणि त्यावर फंगस जमा झालेले आहे. त्याबद्दल पण त्यांच्या कडे तक्रार करून झाली .पण ते कांहीच प्रतिसाद देत नाही. आम्ही श्री दामले ह्यांना वारंवार त्याबद्दल सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला त्रास भोगावा लागत आहे. हे सर्व अस्वच्छ वाटते.
आता आमची सहनशक्ती संपलेली आहे. अनेकदा सांगून ही ते ऐकत नाही त्यामुळे हि तक्रार केली आहे. सोसायटीच्या बाय लॉ प्रमाणे जर एका सदनिकेत कांही दुरस्ती करावयाची असेल तर वरच्या व खालच्या सदनिकेतील मालकांनी अर्धे अर्धे द्यावयाचे आहेत. आम्ही अर्धे देऊ केले .पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. आम्हाला दिवसेन दिवस खूप त्रास होत आहे. तरी आपण त्याना समज देऊन आपल्या अधिकारात ताबडतोब दुरुस्ती करण्यास सांगणे नाहीतर सोसायटीने करून देणे. हे जर लवकरात लवकर झाले नाही तर ह्याबद्दल मी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठवीन. तरी ह्यावर त्वरित कार्यवाही अपेक्षित आहे.
कळावे लोभ असावा.
आपला,
वासुदेव श्री. परांजपे.
फ्लॅट नं १०४.
Sample 2 – Water Leaks from the Ceiling Letter Format
प्रति,
चेअरमन/ सेक्रेटरी [अध्यक्ष/कार्यवाह],
गुरुकृपा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड,
नौपाडा,
ठाणे- ४००६०२.
०६ जानेवारी २०२०.
विषय :- सिलिंग मधून पाणी गळती आणि ओल ह्याबद्दल तक्रार
महोदय / महोदया ,
मी, श्री अनंत महादेव पाटील, आपल्या, गुरुकृपा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड, येथे फ्लॅट क्रमांक ८०७ राहतो. मी सुरुवातीपासून सोसायटीचा मेंबर असून आपल्या सोसायटीला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. माझा फ्लॅट सर्वात वरच्या मजल्यावर आहे आणि वरती टेरेस आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून टेरेस मधून आधी ओल यावयास सुरुवात झाली आणि आता ह्या पावसाळ्यात पूर्णपणे पाणी गळण्यास सुरुवात झाली. पावसाळ्यात आमच्या तक्तपोशींतून टपटप थेंब गळतात आणि सर्व भिंतींना ओल येऊन त्यात फंगस जमा होतो. नुकताच आम्ही रंग दिला होता. तो पण खराब होऊन सर्व घराचे नुकसान झाले. आम्हाला पाणी गळते म्हणून त्याखाली बादल्या ठेवाव्या लागत आहेत. तसेच त्यामुळे आमचे सामान उदा. कॉम्प्यूटर, टीव्ही आणि कपाटे ह्यांचे नुकसान झाले.
ह्याबाबत मी मागच्या वर्षी सोसायटीस दिनांक ३०/०९/२०१९ ला तक्रार केली होती पण सोसायटीने त्यावर काहींच कार्यवाही केली नाही. ह्या पावसाळ्याच्या आधी टेरेस चे डांबरीकरण अथवा वॉटरप्रूफींग करून घेणे आवश्यक होते. आम्ही मेंटेनन्स मध्ये दुरुस्ती साठी रु.९००/- देतो. तरीही सोसायटी काहीही दुरस्त्या करीत नाही. ह्याप्रकारे जर पाणी गळत राहिले तर सिलिंग पडणे किंवा पंखे पडणे असा धोका होऊ शकतो. तसेच हे सिपेज/लिकेज खालीही जाऊ शकते. ह्या विषयी आपणास दोघांस तोंडी पण वारंवार सांगून पहिले. पण आपण ह्यावर कांहीच इलाज केला नाही. त्यामुळे वरची स्लॅब व खांबांची गंजून नुकसानी होऊ शकते जे सर्व बिल्डींगसाठी धोकादायक आहे. ह्यावर ताबडतोब कार्यवाही ह्याच वर्षी करून टेरेस वॉटरप्रूफींग करून घेणे तसेच सोसायटी बाय लॉज प्रमाणे कलम १६० अन्वये वरच्या मजल्यावरच्या सदनिकांच्या सिलिंगची दुरस्ती सोसायटीने करून देणे अपेक्षित असते. तरी ताबडतोब सिलिंगची दुरस्ती करून देणे.
हे जर निर्धारित वेळात झाले नाही तर मला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा घ्यावा लागेल. तरीही काही कार्यवाही झाली नाही तर नाईलाजाने मला को ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन किंवा ग्राहक मंचातर्फे दाद मागावी लागेल. तसेच ह्यापुढे मी मेंटेनन्स भरू शकणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
कळावे,
आपला,
श्री. अनंत महादेव पाटील.
फ्लॅट क्रमांक ८०७.
इंटरकॉम दूरध्वनी क्रमांक १२५.
संलग्न – मागील पत्राची स्थळप्रत.
➤➤ Click for more Letters in Marathi!
नवीन पाण्याची टाकी बसवण्याची लवकरात लवकर परवानगी मिळण्याबाबत