Ulysses Butterfly Information in Marathi
युलिसिस बटरफ्लाय – उज्ज्वल निळ्या रंगाचा बादशहा
पॅपिलीओ युलिसिस ह्या चमकदार निळ्या रंगाच्या फुलपाखराला “ब्लू एम्परर” असेही म्हणतात इतका त्याच्या निळ्या रंगाचा रुबाब आहे. हे चांगलेच मोठ्या आकाराचे आणि सुंदर निळे काळे मिश्रण असलेले फुलपाखरू ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय फुलपाखरू आहे. त्याला ऑस्ट्रेलियाने पर्यटनाचे प्रतिक म्हणून मान्यता दिलेली आहे. देशोदेशींचे लोक हे सुंदर फुलपाखरू बघायला येतात. हे सामन्यात: ऑस्ट्रेलिया, इंडोंनेशिया, पापुआ, न्यू गियाना आणि सोलोमन बेटांवर आढळतात. ह्याचे युलिसिस हे नाव होमर ह्या लेखकाच्या ओदेसीस ह्या कथेतील हिरो ओडेसीस वरून पडले. ह्याचा रंग खरतर काळा आणि विटकरी आहे पण ह्याच्या पंखांवरील अतिसूक्ष्म खवल्यांमुळे एकंदर रंग सूर्यकिरणांच्या परावर्तनामुळे उज्वल निळाशार दिसतो. ह्याला “ स्टक्चरल कलरेशन” म्हणतात. मादीच्या मागच्या पंखात नीळा रंग जास्त प्रमाणात असतो तर नराच्या मागच्या पंखात काळा रंग जास्त असतो.
ह्यांच्या पंखांची लांबी 10 ते 14 सें.मी एव्हडी असते. आणि शरीरापासून पंखांच्या टोकापर्यंत काळ्या रेषा असतात. टोकाला काळी किनार रुंद असते. जशी एका साडीची डिझाईन असते तशी पार्श्वभाग गडात चमकदार नीला रंग आणि त्यावर काळ्या रेषा व किनारीची नक्षी ह्यामुळे एखादी कांजीवरम साडी नेसून कोणी बसले आहे आहे वाटते. नराला निळ्या रंगाचे जास्त आकर्षण असते त्यामुळे तो कुठल्याही निळ्या वस्तूकडे आकर्षित होतो मादी समजून आणि फसतो.ह्यांचे रक्त हिरवे असते. आणि हा कीटक पायाने चव बघतो आणि अन्तेनाने वास घेतो. ह्यांचे आयुष्य फक्त आठ महिने असते.
ह्या फुलपाखराचे जीवशास्त्रीय वर्गीकरण असे :- प्राणी जगत- संधिपाद प्राणी- कीटक जमात- फायालम लेपीडोप्तेरा – स्पेसी जात -पपिलिओनिडी आणि नांव – पी. युलिसिस. हि फुलपाखरे युरोडिया झाडावर जास्त असतात कारण अंडी हलणे आणि त्यांच्या आळ्याचे पोषण करणे ह्यासाठी हे झाड आदर्श आहे.तथापि मादीला लहान उंचीची झाडे अंडी घालण्यास जास्त सोयीस्कर वाटतात. त्याचबरोबर हि फुलपाखरे केरोसीन वूड, लिंबू वर्गातील झाडे, आयक्सोरा अशा झाडांवर पण असतात. ह्यांना गुलाबी आणि लाल फुलांची झाडे खूप आवडतात. ह्यांचे पाकोळ्या, मुंग्या, साप, सरडे, ड्रगनफ्लाय फार काय माकडे दुश्मन आहेत. तरीही ह्यांचे दर्शन झाले म्हणजे शुभ असते असे समजतात. ह्यांना पुनर्जन्म आणि प्रेमाचे प्रतिक मानतात.
इतर किटकांप्रमाणेच ह्यांच्या उत्पत्तीच्या चार अवस्था आहेत. अंडी, आळी, कोश आणि पूर्ण फुलपाखरू. मादी एकेक असे 3 ते 5 अंडी घालते आणि स्वत: देखरेख करते. अंडे पांढरी चंदेरी रंगाची असतात.3 ते 8 दिवसांनी आळी बाहेर पडते. आळी आधी पिवळसर हिरवी आणि नंतर हिरवी आणि पंढरी होते.कारण ज्या झाडावर ती पोसली जाते त्याच्या प्रमाणे रंग सोयीस्कर करून घेते. [कामाफ्लेज] आळीच्या पाठीवर काळा ठिपका असतो आणि शरीराच्या बाजूने काटे असतात. कोश शंखासारखा असतो. कोशातून फुलपाखरू बाहेर पडते.
हि जात हल्ली नामशेष होण्याच्या मार्गावर आली होती पण ऑस्ट्रेलियन सरकारने खास संगोपन करणारे मंडळ स्थापन करून ह्यांची संख्या वाढविली. आता हे ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय बटरफ्लाय आहे.नॅशनल जॉग्रफीतर्फे कांही लोक फक्त फुलपाखरांवर संशोधन करतात. त्यानाही ह्या फुलपाखराची कायम भुरळ पडते. खरोखरच हे फुलपाखरू निळा बादशहा आहे.
Nice information in Marathi and nice pic of butterfly