Turkey Information in Marathi
टर्की- एक दिमाखदार पक्षी
देवाने प्रत्येक प्राण्याला काहीतरी वैशिष्ठ्ये दिली आहेत. हा शिल्पकार विविध रंगांची उधळण करणारे प्राणी बनवतो, तर पूर्ण काळा कावळा पण निर्माण करतो. त्याची लीला टर्कीसारखा पक्षी पाहिल्यावर खूप पटते. किती रुबाबदार पक्षी आहे हा! त्याचा पिसारा, चोच, त्यावर लाल रंगाची दाढी हे सगळं पहिले की ब्रिटीश संसदेत येणारे अमीर उमराव आहेत असे वाटते. ते कसे डोक्यावर वेगवेगळे टोप आणि लांबलचक कोट घालून फिरतात तसे हे पक्षी रंगीबेरंगी शेपटीचा पिसारा आणि चोचीवरची दाढी हलवित चालतात तेंव्हा असेच वाटते की पक्षी राज्यातील अमीर उमराव आले आहेत. इतक्या सुंदर पक्ष्याला टर्की असे विद्रूप नाव का बरे पडले? त्याच्या व्युत्पत्ती बद्दल दोन वंदता आहेत.
Turkey Habitat / टर्की निवासस्थान :
- टर्की फार पूर्वीपासून मेक्सिको मध्ये ख्रिस्तपूर्व 800 वर्षांपासून कोंबड्या पाळतात तसे पाळले जात होते. आणि त्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ केले जात होते.
- मेक्सिकोत 100 वर्षांपासून टर्कीच्या स्वादिष्ट पाककृती बनवल्या जात होत्या त्यात ‘टमेल’ नावाचा मस्त पदार्थ होता. ज्यात टर्कीचा वापर केला जात होता.
- युरोपियन लोकांना जेंव्हा अमेरिकेत टर्की दिसले तेंव्हा त्यांना ते गुनिफौल सारखे वाटले जे तुर्की व्यापार्यांकडून कॉन्स्ंटटीनोपालमार्गे युरोप मध्ये आणले जात होते.
- बऱ्याच युरोपियन राष्ट्रांचा असा समाज होता की ते भारतातून निर्यात केले जातात म्हणून त्यांना हिंदी,दिंडे असे पण नाव होते. म्हणून त्यांचे नाव तुर्की कोंबडे किंवा तुर्की असे पडले तुर्कीचा अपभ्रंश टर्की झाला.
- दुसरी वंदता अशी की टर्की मध्य पूर्वेकडून आयात केले जात होते. तेंव्हा आयात करणाऱ्या व्यापार्यांना टर्की मर्चंट म्हणत असत. म्हणून त्या पक्ष्यांना टर्की कॉक आणि टर्की हेन म्हणू लागले. आणि शेवटी टर्की हे नाव रूढ झाले.
- टर्की हा पक्षी जगतातील फॅसिआनीडी कुटुंबातील मेलीग्रीदिनी ह्या उप कुटुंबातील पक्षी आहे.
- त्याचे जीवशास्त्रीय नाव मेलीग्रीस आहे आणि मेलीग्रीस गालापावो आणि मेलीग्रीस ओसेलता अशा दोन जाती आहेत.
- हा पक्षी १९३० मध्ये जवळ जवळ नामशेष होण्याच्या मार्गावर होता पण योग्य ती खबरदारी घेऊन त्यांचे संवर्धन केले गेले. आता 7 मिलीयनच्या वर टर्की आहेत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये आहेत.
People & Turkey Bird / लोक आणि टर्की पक्षी :
- पूर्ण सोललेला टर्की मसाला भरून आणि सजावट करून मोठ्या समारंभात ठेवतात. जून मध्ये ह्याचे मांस आवडीने खाल्ले जाते.
- टर्कीचे मांस कमी चरबी असलेले आणि जास्त प्रोटीन असलेले असते त्यामुळे इतर मांसापेक्षा हे मांस आवडीने खाल्ले जाते.
- विशेषत: थॅंक्स गिव्हीन्गच्या वेळी. कधी कधी विनोदी कलाकार तो सोललेला टर्की डोक्यावर हॅटसारखा घालून विनोद निर्माण करतात.
- हा पक्षी अमेरिकेत विशिष्ट वेळी छान डेकोरेशन करून शिजवितात. ख्रिसमसला आणि थॅंक्स गिव्हिंग साठी म्हणून ह्याचा उपयोग करतात.
- अमेरिकेत राष्ट्रप्रमुखाला हा भेट देण्याची प्रथा आहे आणि प्रेसिडेंट त्याचा स्वीकार करून त्याला मोकळे सोडतात. जवळ जवळ 46 मिलियन टर्की थॅंक्स गिव्हिंग समारंभाला मारले जातात.
Turkey Information / टर्की माहिती:
- तो थोडा मोरासारखा आणि कोंबड्यासारखा दिसतो. त्याला पण पिसांचा फुलोरा आहे आणि विविध अंगाने नटलेला अर्धवर्तुळाकार पिसारा खूप मनोहर दिसतो.
- टर्की नराला टॉम आणि मादीला हेन म्हणतात. पिल्लाला पोल्ट म्हणतात. साधारण मोठ्या नर पिल्लाला जेक्स आणि मादी पिल्लाला जेनी म्हणतात.
- मात्र टर्की च्या फार्ममध्ये टर्की पांढरे ठेवतात. टर्कीच्या पिसार्याचा उपयोग बाणाच्या टोकाला लावण्यासाठी आणि सजावटीसाठी करतात.
- त्याचे क्षेत्रफळ १.२ ते १.४ मीटर भरते. टर्की ५ ते १० किलो इतक्या वजनाचा असतो. त्याची लांबी 100 ते 120 से.मी. असते.
- पाळीव टर्की हे जंगली टर्कीचे सुधारित रूप आहे. त्याचे मांस जगभर चवीने खाल्ले जाते. टर्की २० वेगवेगळे आवाज काढू शकतात ह्यात नर टर्कीचा एक विशिष्ट आवाज आहे त्याला गॉबल म्हणतात तो मैलावरून पण ऐकू येतो. प्रत्येक टर्कीचा एक विशिष्ट आवाज असतो. त्यावरून प्रत्येक टर्की ओळखू येतो.
- टर्की अत्यंत बुद्धिमान, प्रेमळ आणि भावनाप्रधान असतात. ते एकमेकात अतूट सामाजिक बंध निर्माण करतात. टर्कींना 1000 एकर पर्यंत जागेची माहिती असते ते मोठे होईपर्यंत आईबरोबर सगळा थवा जिथे आराम करतो तेथे राहतात.
- जंगली टर्की तशी 55 मैल वेगाने उडतात पण पाळीव टर्की त्यांना अतिशय पोसले गेल्याने उडू शकत नाही.
- टर्कीच्या मानेजवळचा आणि डोक्याचा चा उघडा भाग ह्यांचे रंग त्याच्या भावनेप्रमाणे बदलतात. म्हणजे जेंव्हा तो उत्तेजित असतो तेंव्हा निळा आणि जेंव्हा लढायला येतो तेंव्हा लाल होतो.
- त्याच्या चोचीवरच्या लांब मांसल भागाला ‘स्नुड’ म्हणतात.
- टर्की नर मादीची जोडी मोर आणि लांडोर सारखीच असते. नर टर्की आकाराने मोठा असून मादीला आकर्षित करण्यासाठी रंगीत पिसारा फुलवतो. त्यावर लाल, जांभळा, हिरवा विटकरी, कांस्य आणि सोनेरी रंगांची उधळण असते. ही पिसे जवळजवळ 5000 ते 6000 असतात.
- मादीची पिसे फिकट उडी रंगाची आणि तपकिरी असतात. असे म्हणतात की बेन्जामिन फ्रॅन्कलीनला टर्की हा राष्ट्रीय पक्षी व्हावा असे वाटत होते. प्राचीन मेक्सिकन लोक त्याला पवित्र पक्षी मानत होते. माया, अझ्टेक, आणि तोल्तेक त्याला ‘ग्रेट झोलोती’ म्हणजे जडजवाहीर असलेला पक्षी असे मानत होते.
- टर्की कधी कधी हिंसक पण बनतात. टर्की शाकाहारी तसेच मांसाहारी पण आहेत. त्यांचे आयुष्य 10 वर्षापर्यंत असते. टर्की युरोप, न्यूझीलंड ,उत्तर अमेरिका आणि हवाई बेटांवर आढळतात.
Nesting / प्रजनन :
- टर्की मादी 7,8 अंडी घालते पण एकावेळी नाही. रोज एक अंडे घालते आणि सगळी अंडी घातल्यावर ती उबवते.
- पण आश्चर्याची गोष्ट अशी की वेगवेगळ्या वेळी घालून पण सगळी अंडी एकाच वेळी उबतात.
- तसेच पिल्ले पण लगेच पळायला लागतात.16 आठवड्याच्या टर्कीला फ्रायर म्हणतात.
- 5 ते 7 महिन्याच्या टर्कीला यंग रोस्टर आणि एक वर्षाच्या टर्कीला यार्लिंग म्हणतात.
- 15 महिन्याच्या टर्कीला पूर्ण वाढ झालेला टर्की म्हणतात.
- टर्कीचे अंडे खूप महाग असते कारण टर्कीच्या मासाला खूप मागणी असल्याने आणि मादी अंडी कमी घालते त्यामुळे अंडी विकत नाही.
युरोपियन लोकांच्या आनंद आणि समारंभ ह्यासाठी बिचारा हा सुरेख पक्षी बलिदान देतो.