Triphala Churna Information in Marathi
त्रिफळा चूर्ण चे फायदे
- बेहडा, आवळा आणि हरडा यांच्या एकत्रित चूर्णाला त्रिफळा चूर्ण असे म्हणतात. आयुर्वेदानुसार हे खूप प्रभावशाली आणि विविध रोगांवर लाभदायक असे चूर्ण आहे.
- त्रिफळा चूर्णाच्या नियमित सेवनाने फुप्फुसांसंबंधी रोग होत नाहीत आणि श्वासोच्छवासाच्या साऱ्या समस्या दूर होतात.
- जाडेपणा किंवा वाढती चरबी यामुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर रोज न चुकता त्रिफळा चूर्ण सेवन करा आणि थोड्याच दिवसात तुम्हाला जाणवेल कि तुमचे वजन आणि जाडेपणा हळूहळू कमी होत आहे.
- त्रिफळा चूर्ण मधुमेहात सुद्धा लाभदायक ठरते. या चूर्णाच्या नित्य सेवनाने पॅनक्रियाज प्रभावित होतात आणि जास्त इन्सुलिन निर्माण करतात जे मधुमेह आटोक्यात आणण्यास उपयुक्त ठरते.
- त्रिफळा चूर्ण रोज खाल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि परिणामी तुम्ही वारंवार आजारी पडत नाहीत.
- त्रिफळा चूर्णात असे काही अँटीऑक्सिडंट आहेत जे तुम्हाला लवकर वयस्क दिसण्यापासून वाचवितात आणि याच्या नित्य वापराने तुम्ही दिवसेंदिवस तरुण दिसू लागता.
- हे चूर्ण रक्तातील विषारी घटकांना बाहेर टाकायला मदत करते त्यामुळे तुमचे रक्त साफ होते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते.
- तसेच रक्त साफ झाल्यामुळे तारुण्यपिटिका किंवा मुरुमांचा त्रास सुद्धा कमी होतो.
- काही कारणामुळे पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास रोज सकाळी गरम पाण्यातून किंवा दुधातून त्रिफळा चूर्ण घ्यावे, शौचास साफ होईल.
- त्रिफळा चुर्णाने नजर सुद्धा तेज होते. रोज रात्री त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजत ठेवावे व सकाळी वस्त्रगाळ करून राहिलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. किंवा त्याचे नित्य सेवन केले तरीही चालेल.
- जर तुम्हाला मुख दुर्गंधीचा त्रास असेल तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण दोन ते तीन तास भिजत ठेवावे. नंतर या पाण्याने गुळण्या कराव्यात. तोंडाची दुर्गंधी दूर होईल किंवा तुम्ही ब्रश सुद्धा करू शकता.
- जर तुम्हाला एनिमिया असेल म्हणजेच शरीरात रक्त कमी असेल तर त्रिफळा चूर्ण रोज खावे. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढते.
- केस गळत असल्यास त्रिफळा चूर्ण थोड्याशा पाण्यात मिसळून केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून टाका यामुळे केस तर मजबूत होतीलच पण अवेळी केस पिकण्यापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल.
- याच्या नित्य सेवनाने कोलेस्टेरॉल कमी होतो म्हणून मधुमेही आणि हृदयरोग असणाऱ्या रुग्णांनी त्रिफळा चूर्ण रोज घेतले पाहिजे.
- फक्त लहान मुलांना आणि गर्भवती स्त्रियांना हे चूर्ण देऊ नये.