Taj Mahal Information in Marathi
ताजमहाल माहिती
बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुना काठी ताजमहाल सुधीर फडके सम्राट यांनी हे भावगीत अमर केले. ताजमहाल अमर प्रेमाचे प्रतिक म्हणून गणला जातो. जगातील सात आश्चर्यापैकी तो एक आहे.
UNESCO च्या WORLD HERITAGE SITE मध्ये त्याला 1983 मध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. शुद्ध संगमरवरी इमारत अशी त्याची ख्याती आहे. आणि कितीतरी गोष्टी त्याच्याबद्दल सांगण्यासारख्या आहेत. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्या प्रेमीजनांना स्फूर्ती देणारी गोष्ट म्हणजे एक बादशहा, सम्राट याने आवडत्या राणीच्या प्रेमा खातर बांधलेली ही समाधी.
राजवाड्यातील गौरवान्वित व्यक्ती मुमताज महाल :
- मुमताज महाल चे खरे नाव अर्जुमन बानू बेगम होते. खुर्रम उर्फ शहाजहान याच्याशी 13 वर्षी लग्न झाल्यानंतर तिला ही पदवी दिली गेली जिचा अर्थ राजवाड्यातील सन्माननीय व्यक्ती असा होता. आणि खरोखरच ती इतकी सुंदर होती.
- अर्जुमन ही एका सरदाराची मुलगी आणि नूर जहानची भाची होती. तिच्या वडिलांचे नाव अबुल हसन असाफ खान व आईचे नाव दिवाणी बेगम होते.ती सुफी पंथाची व पर्शियन राजकुमारी होती.
- खुर्रम उर्फ शहाजहान चे 15 व्या वर्षी तिच्याशी लग्न झाले त्या अगोदर त्याला दोन राण्या होत्या. पण हिच्यावर त्याचे निरतिशय प्रेम होते. ती त्याला युद्धात पण साथ देत असे. तिला अरेबिक आणि पर्शियन भाषा खूप चांगल्या येत होत्या.त्यात ती कविता करीत असे. तसेच तिला युद्ध शास्त्र आणि राजनीतीची पण माहिती होती. त्यामुळे ती शहाजहानची सल्लागार,प्रे मिका गृहिणी आणि त्याच्या मुलांची आई अशा सगळ्याच भूमिका वठवीत होती.
- पंचवीस वर्षाच्या संसारात तिने 14 मुलांना जन्म दिला, तेही कधी युद्धभूमीवर तर कधी महालात. शेवटच्या मुलीच्या जन्माचे वेळी ती अवघ्या 38 व्या वर्षी मरण पावली.तेंव्हा शहाजहान ने तिला वचन दिले की तिच्या स्मरणार्थ तो एक जगातील अजोड महाल बांधील. तोच हा ताजमहाल !
भव्य दिव्य कलाकृती :
- जहांगीरच्या मृत्यू नन्तर शहाजहान बादशहा झाला होता. अफाट संपत्ती आणि जडजवाहीर तसेच प्रचंड मुलुखाचा तो सम्राट झाला.
- त्याने उस्ताद अहंमद लाहौरी यास आराखडा करायला सांगितला. त्याने 1632 मध्ये कामाला सुरुवात केली. त्याने ही समाधी पूर्ण संगमरवराची करायचे ठरविले. असे म्हणतात की या कामाला पांढरा मार्बल राजस्थान मधील मकराना येथून मागविला. जास्पर पंजाब मधून जेड आणि क्रिस्टल चायना मधून, कार्नेलीयान अरबस्तान मधून, सफायर श्रीलंका मधून, फिरोझा तिबेट मधून आणि नील रत्न अफगाणिस्तान मधून मागविले.
- ह्या कामांसाठी एक हजार हत्ती आणि वीस हजार मजूर वीस वर्ष काम करत होते. ह्या सगळ्या कामाचा खर्च रुपये ३२ मिलियन झाला. म्हणजे आजच्या काळातले ८.५२ बिलियन एवढा खर्च झाला. मधली समाधी १६४३ पर्यंत पूर्ण झाली आणि आजूबाजूचे बांधकाम १६५३ पर्यंत पूर्ण झाले. दोन इमारती आणि मधली समाधी मिळून ४२ एकराचा ताज महाल तयार झाला.
- असे म्हणतात की अशी इमारत पुन्हा कोणीही करू नये म्हणून शहा जहान ने कारागीरांचे हात तोडले आणि डोळे फोडले. शहाजहानला त्याची समाधी ताजमहालच्या समोर यमुनेच्या दुसर्या तीरावर करायची होती. आणि मध्ये पूल बांध्याचा होता. पण त्याच्याच मुलांमध्ये बंड होऊन औरंगझेबने बाकी तीन भावांना मारून गादी बळकावली. आणि शहाजहानला महालात नजर कैदेत ठेवले.
- अंथरुणावर पडून आरशात ताज महालचे प्रतिबिंब बघत शहाजहानने डोळे मिटले. त्यानंतर ताज महाल दुर्लक्षित राहिला आणि जाट लोकांनी दिल्लीवर आक्रमण करून १८५७ मध्ये ताज महालचे किमती जड जवाहीर आणि सोने काढून नेले. ब्रिटीशांच्या राज्यात लॉर्ड कर्झनने १९०८ मध्ये ताज महालची डागडुजी केली आणि त्याला चांगले रूप दिले.
मुघल, पर्शियन, आणि हिंदू स्थापत्य शास्त्राचा अनोखा संगम :
- ताज महाल च्या मुख्य इमारतीकडे जाताना सुरुवातीला लाल दगडाच्या प्रवेश द्वारातून जावे लागते. चारही बाजूंनी संगमरवराचे पदपथ आहे, समोर कारंजे, पुष्करिणी आणि मुघल गार्डनची प्रतिकृती आहे. इथून मुख्य समाधी कडे जावे लागते. मुख्य समाधी ५५ मीटर उंच आहे. ती मोठ्या चबुतर्यावर आहे.
- मधली समाधीची इमारत अष्टकोनी असून वरती मोठा डोम आहे. मधल्या समाधीच्या चारी बाजूंना चार मिनार आहेत. मिनार मधल्या समाधीवर कधी पडू नये म्हणून प्लिंथच्या थोडे बाहेर आहेत. मीनारांची उंची ४० मीटर आहे, आणि ते तीन भागात विभागले आहेत.
- मधल्या इमारतीत शहा जहान आणि मुमताज महाल यांच्या खोट्या कबरी ठेवलेल्या आहेत. खऱ्या कबरी तळघरात आहेत. मुस्लिम धर्माप्रमाणे कबरींवर जास्त सजावट नसावी म्हणून त्या साध्याच आहेत. पण त्याच्यावर त्यांच्या देवाची ९९ नावांचे नक्षीकाम केले आहे. या कबरींचे तोंड मक्के कडे आहे. परंतु त्यावर कुराणातले आयत नक्षीकामात लिहिलेले आहेत.
- संपूर्ण इमारतीत मुघल नक्षी कामाची अप्रतिम कारागिरी आहे. यात झाडे, पाने, फुले आणि पक्षी यांचे उत्तम समप्रमाणात चित्रे आहेत. डोमच्या आतली पोकळ बाजू सुद्धा सुंदर, रंगीत नक्षीकामाने मढवलेली आहेत. डोम बाहेरच्या बाजूनी सोन्याने मढवला होता, जो आता पितळ्याचा आहे.
- मधल्या डोमच्या चारी बाजूला चार छोटे डोम आहेत आणि कोपऱ्यात अजानच्या हाकेसाठी टॉवर आहेत. बाहेर एका बाजूला मशीद आणि त्यासमोर जवाब म्हणून इमारत आहे. ताज महाल शुक्रवार सोडून इतर दिवशी पर्यटकांना खुला आहे. एका वर्षात ७-८ मिलियन पर्यटक ताज महालाला भेट देतात.
- ताज महाल सकाळी गुलाबी, दुपारी दुधी आणि चांदण्या रात्री सोनेरी दिसतो. पावसामध्ये थोडेसे थेंब मुमताजच्या कबरीवर पडतात. हा वास्तु शास्त्राचा चमत्कार आहे.
ताज महाल की तेजो महा आलय :
- ओक नावाच्या एका माणसाने काही पुराव्यानिशी सांगितले आहे की ताज महाल हे पूर्वी शंकराचे मंदिर होते. ते पाडून ही इमारत बांधली आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ताज महाल च्या पुढे कासव आहे, म्हणजे हे मंदिर असावे. नक्षी कामामध्ये चोचीत एक तुरीचा दाणा घेतलेल्या एका चिमणीचे चित्र आहे, जे हिंदू धर्मातले लक्षण आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यानंतरसुद्धा दोन वेळा अशी याचिका करण्यात आली. परंतु कोर्टाने ती फेटाळली.
- ताज महाल सध्या मथुरा ऑइल रिफायनरीमुळे आणि प्रदूषणामुळे पिवळा पडायला लागला आहे. त्यावर सरकारने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. काहीही झाले तरी ताजमहाल हे आपल्या देशाचे गौरवस्थान आहे हे नक्की!
Thanks very much