Table Tennis Information in Marathi
टेबल टेनिस एक विद्युत चपळाईचा खेळ
टेबल टेनिस अर्थात टे.टे. च्या मॅचेस म्हणजे फक्त डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे विजेच्या वेगाने होणार्या हालचाली पाहणे. इतक्या द्रुत गतीने चालणारा हा एकमेव खेळ आहे. ज्यांना मानेचा व्यायाम करायचा असेल त्याने हा खेळ पाहीला तर एका दिवसात त्याचे दुखणे बरे होईल! बघणाऱ्याची ही अवस्था तर खेळणारे किती महान असतील! खरोखर त्यांची सर्विस आणि प्रतिटोला हे डोळ्याचे पाते लवण्याच्या आत होते. ब्रिटन मध्ये उगम पावलेल्या ह्या खेळावर आता पकड मात्र चीनची बसली आहे. सध्या जास्तीत जास्त लोकप्रिय खेळाडू हे चीनचे आहेत. ब्रिटन मध्ये कसा उगम पावला हा खेळ बघू.
खेळाची ओळख :
- ब्रिटन मध्ये व्हिक्टोरीयन काळात अमीर उमरावांना मेजवानीनंतर एक पार्लर गेम म्हणून हा खेळ खेळला जात असे.
- पण हा खेळ भारतात १८६० ते १८७० ह्या काळात आलेल्या ब्रिटिश लष्करी अधिकार्यांनी विकसित केला होता. त्यावेळी मधील जाळी ऐवजी पुस्तकांची चळत ठेवली जायची. आणि रॅकेट म्हणून पण पुस्तके वापरली जायची. आणि गोल्फ बॉल पिंग पॉंग म्हणून वापरला जायचा. ह्या खेळाला त्याला ‘पिंग पॉंग’ म्हणत होते.
- १९०१ मध्ये पार्कर ब्रदर्स ने ह्या खेळाचा ट्रेड मार्क विकत घेऊन त्यात बदल करून १९२० मध्ये ह्याला ‘टेबल टेनिस’ असे नाव दिले.
- नंतर गिब्ज ह्या खेळाडूने सेल्युलॉइड बॉल बनवला आणि गुडे ह्याने रॅकेट बनवली. त्यानंतर टेबल टेनिस असोशिएशन ची स्थापना झाली, तीच पुढे जाऊन १९२६ मध्ये ‘दी इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन (ITTF)’ बनली आणि त्यांच्या तर्फे चॅम्पिनशिपच्या मॅचेस सुरू झाल्या.
- लंडन मध्ये पहिली मॅच १९२६ मध्ये खेळली गेली. ह्या पाठोपाठ ‘युनायटेड स्टेट टेबल टेनिस असोशिएशन (USATT)’ १९३३ मध्ये स्थापना झाली.
- काही वर्षात हा खेळ सर्व जगभर मुख्यत: कम्युनिस्ट देशात उदा. चीन आणि रशिया येथे लोकप्रिय झाला. आजही सर्वात जास्त टेबल टेनिस विजेते चीनचेच आहेत.
खेळाचे नियम :
- ह्या खेळाचे नियम टेनिस फेडरेशन बनवते. हा सिंगल आणि डबल्स मध्ये खेळला जातो. म्हणजे एकेरी आणि दुहेरी सामना, ह्यात परस्पर विरुद्ध बाजूला एकेकच खेळाडू असतात आणि दुहेरी मध्ये परस्पर विरुद्ध बाजूला दोन खेळाडू असतात.
- दुहेरी मध्ये टेबलाचे चार भाग पडलेले असतात ज्यायोगे प्रत्येक खेळाडूचे क्षेत्र ठरविले जाते.
- एक पूर्ण सामना 3 किंवा 5 ‘गेम’ साठी खेळला जातो. प्रथम ११ गुणांवर पोहोचणारा खेळाडू “गेम” जिंकणारा असतो.
- खेळाची सुरुवात नाणेफेकीने किंवा चेंडू लपवून तो ओळखून सर्विस कोणाकडे येते हे ठरवून होते. सर्विस करणारा खेळाडूने प्रथम बॉल निदान 16 से.मी तरी हवेत उडवायचा असतो आणि त्याला टोलवून प्रथम त्याच्या कोर्ट मध्ये एक टप्पा पडून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्ट मध्ये दुसरा टप्पा पडला पाहिजे आणि हे करताना बॉल मधील जाळीला स्पर्श न करता गेला पाहिजे.
- बॉल इतकाच जोरात मारला पाहिजे की समोरच्याच्या कोर्ट मधील एंड लाईन च्या आत पडला पाहिजे. हे चुकले तर समोरच्याला पॉइंट मिळतो.
- सर्विस बरोबर झाली तर त्वरित तो बॉल टोलवायला जमल पाहिजे नाहीतर सर्विस करणार्याला पॉइंट मिळतो.
- सर्व्हिस चेंडू जाळीला स्पर्श करून गेला किंवा फॉउल सर्विस मध्ये काही अपरिहार्य कारणाने समोरच्याला बॉल ला प्रतिटोला मारता नाही आला तर त्याला लेट म्हणतात.
- दर दोन पॉइंटनंतर सर्विस बदलली जाते. जोपर्यंत सर्विस करणारा आणि प्रतिस्पर्धी ह्यांचा सिक्वेन्स सारखा राहतो आणि प्रत्येक खेळाडू फक्त एकाच पॉइंटसाठी सर्व्ह करतात. त्याला ड्यूस म्हणतात.
पॉइंट देताना लक्षात ठेवा :
- प्रतिस्पर्धी बॉल परतवू शकला नाही,
- बॉल परतविण्या अगोदर तो नेटशिवाय इतर गोष्टींना लागला
- समोरच्याने बॉल टोलवल्या नंतर सर्विस करणार्याच्या कोर्ट मध्ये न पडता एंड लाईन च्या बाहेर पडला.
- समोरच्याने बॉल ला अडथळा केला.
- बॉल दोनदा टोलवला, ज्या हाताने खेळले जाते त्याशिवाय दुसरा हात बॉल ला सर्विस शिवाय लागला नाही पाहिजे.
- प्रतिस्पर्ध्याने बॉलला रॅकेटच्या कडेने टोला लगावला.
- प्रतिस्पर्ध्याने कोर्ट हलवले किंवा नेटला स्पर्श केला.
- प्रतिस्पर्ध्या चा मोकळा हात कोर्टला लागला.
- एकावेळी 13 चेंडू खेळले गेले पाहिजे.
- फाउल करणाऱ्या खेळाडूला दोन वार्निंग दिल्या जातात आणि तिसर्या वेळी त्याच्या प्रतिस्पर्ध्याला २ गुण मिळतात.
- खेळ जिंकण्यास ११ गुणांची गरज असते सामना ५ किंवा ७ खेळांचा असतो आणि त्यात जास्त गुण मिळवणाऱ्या खेळाडूस विजयी घोषित केले जाते.
दुहेरी सामना :
- दुहेरी सामन्यात नियम सारखेच असतात फक्त टेबल दुभागणाऱ्या रेषेचे आडवे दोन भाग पडलेले असतात. अशा रीतीने टेबलचे चार भाग पडलेले असतात.
- सर्विस करणाऱ्याने उजव्या चौकोनातून अशा रीतीने सर्विस करायची की एक टप्पा उजव्या चौकोनात पडेल आणि त्यानंतर समोरच्याच्या उजव्या चौकोनात दुसरा टप्पा पडेल.
- नाहीतर प्रतिस्पर्ध्याला १ पॉइंट मिळतो. सर्विसचा क्रम अशा रितीने करतात. A आणि B एका बाजूला आणि X णि Y दुसऱ्या बाजूला असतील तर सर्विस A-X-B-Y. बदल होतांना X-B-Y-A. दुसऱ्या सामन्यात क्रम बदलून X-A-Y-b किंवा Y-B-X-a असा करतात. ५ पॉइंट पर्यंत खेळ आल्यावर जोडी जागा बदलते.
- खेळ जर १० मिनिटात संपला नाही आणि १८ पेक्षा कमी पॉइंट मिळाले तर एक्स्पेडाइट सिस्टीम अमलात आणतात एका पॉइंटसाठी सर्व्ह केला जातो समोरच्यानी १३ प्रति टोले हाणायच्या आत पॉइंट करायचा असतो. नाहीतर समोरच्यांना पॉइंट मिळतो.
Playing Style / खेळाची पद्धत :
- रॅकेट पकडण्याच्या दोन पद्धती आहेत त्या म्हणजे पेनहोल्ड आणि शेकहॅंड. चेंडू टोलवण्याच्या पण पद्धती आहेत त्या म्हणजे हिट, लूप, काउंटर हिट, फ्लिप, स्मॅश हे आक्रमक स्ट्रोक आहेत. त्यांच्या वेगाने प्रतिस्पर्ध्याला तो टोलविता येत नाही. आणि बचावात्मक स्ट्रोक म्हणजे पुश, चॉप, ब्लॉक, लॉब.
- त्याच प्रमाणे बॉल स्पिन पण करतात – त्यांत टॉप स्पिन, साइड स्पिन, कॉर्क स्पिन असे प्रकार आहेत.
सामने, संघटना आणि खेळाडू :
- टेबल टेनिस चे वर्ल्ड कप चॅम्पियनशिप. ऑलिंपिक आणि ITTF World Tour असे आणि युरोपियन चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप युरोप टॉप-१६ आणि एशियन गेम्स असे सामने होत असतात.
- १९८८ पासून ह्या खेळला ऑलिंपिक मध्ये स्थान मिळाले.
- १९५९ पासून चिनी खेळाडूंचे वर्चस्व ह्या खेळावर आहे. त्यामध्ये लक्षणीय खेळाडू म्हणजे डेंग यापिंग हिने २ ऑलिंपिक ३ वर्ल्ड आणि १ वर्ल्ड कप जिंकला आहे.
- त्या खालोखाल लिऊ गुओलीयांग, कोंग लीन्घू, वंग नान, झांग यीनिंग, झांग जैक, ली झिओझिया, दिंग निंग आणि मा लोंग असे खेळाडू आहेत.
- भारतीय खेळाडू पण टेबल टेनिसमध्ये नाव कमावून आहेत. ते म्हणजे अंतोनी अमलराज, संतोष अर्स्वीली, चेतन बाबुर., वेणुगोपाल चंद्रशेखर, हरमीत देसाई, अख्तर अली फैझी सोम्याजीत घोष, साथियन ज्ञानशेखरण, हसन अली फैझी, डी.जी. हाथीरामानी, के. श्रीवास्तव, शरथ कमाल, मीर खासिम अली कमलेश मेहता, गुल नासिकवाला, इंदू पुरी, आर. राधिका सुरेश, सुब्रमनियान रामन.
- सुभाजित साहा, सनिल शेट्टी, आणि अभिषेक यादव. मुलींमध्ये माणिक बात्रा, नेहा अग्रवाल, आणि अंकिता दास.
- सगळ्यात उच्च स्थान आहे ते जान डी. वाल्ड्नेर याचे. तो म्हणजे टेबल टेनिस मधील सचिन तेंडूलकर समजतात.
- जगात मान्यवर टीम ह्या चीन, साउथ कोरिया, जर्मनी आणि स्वीडन येथील आहेत.
- जरी क्रिकेट इतकी लोकप्रियता नाही मिळाली तरी हा खेळ भारतात खूप लोकांच्या आवडीचा आहे. कुणी सांगावे उद्या ऑलिंपिक मध्ये पण आपले भारतीय चमकतील.
Wikipedia Information about Table Tennis in Marathi / Few Lines
Related posts
Judo Information in Marathi | जुडो खेळाची माहिती
Football Information in Marathi, Rules History & Wikipedia// फुटबॉल माहिती
Olympic Information in Marathi | Olympics History in Marathi, Games
Badminton Information in Marathi बॅडमिंटन खेळाची माहिती
Kabaddi Information in Marathi, Game Kabaddi Essay l कबड्डी खेळाची माहिती
Volleyball Information in Marathi, Game Volleyball Rules
Kushti Information in Marathi, Game History & Rules ll कुस्ती माहिती
Kho Kho Information in Marathi, Game Kho Kho Rules l खो-खो खेळाची माहिती