Swine Flu Information in Marathi
स्वाईन फ्लू – एक संसर्गजन्य रोग
सर्दी, पडसे, टायफॉईड, कावीळ, मलेरिया आणि असे अनेक रोग पावसाळा आला की थैमान घालतात. त्यात आणखी नवीन नवीन रोगांची भर पडतच आहे, आणि इतक्या औषधांचे शोध लागून सुद्धा कमी न होता वाढतच आहे. त्यामध्ये सगळ्यात संसर्गजन्य म्हणजे स्वाईन फ्लू. ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात माणसे बळी पडतात. दुर्दैवाने फार थोड्या केसेस मध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला कळतो. तोपर्यंत बरेच लोक सामान्य ताप किंवा जास्तीत जास्त टायफॉईड पर्यंत निदान करतात आणि सेल्फ मेडिकेशन करीत राहतात. जेंव्हा दवाखान्यात जातात तोपर्यंत उशीर झालेला असतो. ह्याचे कारण म्हणजे टायफॉईड, कावीळ, मलेरिया, फ्लू, इत्यादी सर्व रोगांची प्राथमिक लक्षणे एकच असतात, ती म्हणजे खूप ताप, अंग दुखणे सर्दी, थकवा, भूक न लागणे इत्यादी. त्यामुळे औषधे घेताना फक्त अॅन्टी बायोटीक्स घेतले जातात. आणि संसर्गाने बाकीच्यांना पण ह्याची लागण होते. काय आहे हा स्वाईन फ्लू आणि ह्याची लक्षणे? आणि होऊ नये म्हणून किंवा झाला तर काय काळजी घ्यायची? बघूया.
Swine Flu Information / स्वाइन फ्लू माहिती :
- स्वाईन फ्लू हा फ्लूचाच एक प्रकार आहे. त्याला H1N1 व्हायरस ने बाधित असे पण म्हणतात.
- हा डुकरांना होतो आणि मग माणसांमध्ये पसरतो. ह्याचे सूक्ष्म जीवाणू जेथे डुकरे पाळली जातात अशा फार्म मध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. आणि तेथे काम करणाऱ्या लोकांमध्ये तो आजार पसरतो.
- माणसांमध्ये संसर्गाने फार मोठ्या प्रमाणात पसरतो. मोठ्या शहरांमध्ये [मेट्रो सिटीज] त्याला लागून असणाऱ्या उपनगरात गलिच्छ झोपडपट्टी दाटीवाटीने वसलेली असते आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे डुकरे सुखेनैव हिंडत असतात.
- कांही लोक हि डुकरे पकडून खातात पण मग आजार झाला की दारिद्र्य आणि अज्ञान ह्यामुळे रोग झपाट्याने पसरून माणसे पटापट मरू लागतात.
- ह्याची लक्षणे सध्या फ्लूची किंवा टायफॉईड, कावीळ, मलेरिया आणि चिकन गुनिया ह्यासारखीच असल्याने मृतांची संख्या वाढते.
Swine Flu Symptoms / स्वाइन फ्लू ची लक्षणे :
- जोराचा ताप,[100 डिग्रीच्या F वर], स्नायूंमध्ये वेदना, अंगदुखी, कफ. सर्दी, शिंका, ओकाऱ्या थकवा, भूक न लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि जुलाब.
- अशी स्वाईन फ्लू ची लक्षणे आहेत.
Treatment / उपचार :
- ज्वर खूप चढल्यावर लगेच डॉक्टरांना भेटल्यास ते कफाची किंवा नाकातील श्लेष्माची तपासणी करतील आणि वरील पैकी कुठल्या रोगाची लागण झाली आहे ते सांगतील.
- स्वाईन फ्लू असल्यास रुग्णाला ताबडतोब वेगळे ठेवणे ज्यायोगे इतरांना लागण होणार नाही.
- रुग्णाची काळजी घेणार्याने तोंडाला मास्क आणि हात जंतुनाशक पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. ह्या रोगाची लागण झाली हे नगरपालिकेला कळवावे म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करणे सोपे जाईल.
- नगरपालिकेकडे आणि डॉक्टरांकडे टॅमी फ्लूच्या गोळ्या मिळतात. त्या रुग्णाला तसेच खबरदारी म्हणून त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना देणे. हा ताप आल्यास रुग्णाला पूर्ण विश्रांतीची गरज असते. तसेच त्याला वेगळे ठेवणे जरुरीचे असते. त्याने शिंकताना आणि खोकतांना तोंडावर रूमाल घेणे किंवा मास्क लावणे.
- ह्या आजारात शरीरातील पाणी खूप कमी होते. म्हणून भरपूर पाणी पिणे. किंवा फळांचा रस घेणे म्हणजे अंगात शक्ती राहते. ज्यांच्या अंगात प्रतिकार शक्ति कमी असते त्यांना थकवा, रक्त आणि रक्तातील घटक कमी होणे हे प्रकार जाणवतात. त्यांनी रक्तातील हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स आणि पांढर्या पेशी वाढविणे जरुरीचे असते.
- प्लेटलेट्स पपईच्या पानांच्या रसाने वाढतात. तसेच पपईने ग्लुकोज, विटामिन्स मिळतात. म्हणून पपई आणि सी विटामीन असलेली फळे खावी जसे, संत्री, लिंबू मोसंबी इत्यादी. पपई च्या पानांच्या गोळ्या पण मिळतात. अंगदुखीवर डॉक्टर वेदनाशामक गोळ्या देतात.
Swine Flu Prone to / स्वाईन फ्लूचा जास्त धोका कोणाला?:
- सर्वसाधारणपणे ह्या रोगाला म्हातारी माणसे, 5 वर्षाखालील मुले, जास्त काळापर्यंत अस्पिरीन घेणारे, एड्स,किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती काही आजारांमुळे कमजोर झाली असेल तर ,गरोदर स्त्रिया, आणि दुर्घर रोगाने पिडीत असलेले,ह्या व्यक्ती बळी पडतात.
- यांना होणारा स्वाईनफ्लू गंभीर रुप धारण करण्याची शक्यता अधिक असते.
- हा रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे जरुरीचे असते.
Prevention Tips / स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा:
- नगरपालिका त्यांचे कर्तव्य करीत असतात. पावसाळा आल्यावर जसे मलेरिया, डेंग्यु च्या विरुद्ध जनजागृती करतात. फवारे मारतात. जास्तीची झाडे काढून टाकतात. तसेच दवाखान्यात पुरेसा औषध पुरवठा ठेवतात. पण नागरिकांनीही आपले योगदान आपल्याच स्वास्थ्यासाठी द्यायला हवे.
- आपला परिसर स्वच्छ ठेवणे, कुठेही घाण, कचरा, खरकटे न टाकणे. भटक्या जनावरांना आकर्षित करतील अशा गोष्टी रस्त्यावर उघड्यावर न टाकणे.
- कुणालाही ताप जास्त असेल तर लगेच नगरपालिकेला खबर देणे. हल्ली प्रत्येक नगरपालिकेचे अॅप असतात. त्यावरही आपण खबर देऊ शकतो.
- तरीही काही बाबतीत काही लोकांना अत्यंत घाण सवयी असतात ज्यामुळे सबंध समाजाचेच स्वास्थ्य बिघडते उदा. रस्त्यावर थुंकणे, खाकरून बेडके टाकणे, तोंडावर रूमाल न घेता जोरात शिंकणे, तोंड उघडे ठेवून खोकणे रस्त्यावर घाण करणे.
- परदेशात आपल्या घरापेक्षाही लोक सार्वजनिक स्वच्छतेला अत्यंत महत्व देतात. आणि आपल्या देशाला थुंकणारा देश म्हणतात. किती लांच्छनास्पद आहे नं हे? कितीही जनजागृती केली तरी पिढ्यान पिढ्या चालत आलेले हे घाणेरडे संस्कार लोक विसरत नाही.
- ह्या रोगांच्या बाबतीत दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे शहरात येणारे लोंढे. हे लोक स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय अज्ञानी असतात आणि त्यामुळे शहराचे स्वास्थ्य धोक्यात येते.
- ते कमी पाण्याच्या प्रदेशातून आल्याने त्यांना स्वच्छतेचे महत्व ठाऊक नसते. आणि अशा रीतीने रोगराई पसरते. ह्या रोगाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम वाईट होतात जसे न्यूमोनिया, दम किंवा हृदयरोग.
- ह्या रोगाची लस पण असते. खबरदारी म्हणून ती पावसाळ्याच्या तोंडावर घेणे चांगले. तथापि रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हे सगळ्यात उत्तम. त्यासाठी हिरवा भाजीपाला आणि लिंबू वर्गातील फळे खाणे चांगले.
- पण पावसाळ्यात हिरव्या भाजीपाल्यावर जंतु आणि किडे असतात. तेंव्हा पपई च्या गोळ्या आणि लिंबू वर्गातील फळे खाणे चांगले. ह्याच दिवसात आवळे पण येतात. आणि आवळ्यासारखे रोग प्रतिकार शक्ती वाढविणारे दुसरे कुठलेच फळ नाही. त्याचा च्यवनप्राशपण हेच काम करतो.
Raising Awareness / स्वाइन फ्लू बाबत जनजागृती:
- त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृतीही करणे गरजेचे आहे.
- शाळांमधून ह्या गोष्टी शिकवल्याच तर आयुष्यभर लक्षात राहतात.
- तसेच टीव्ही पण उत्तम मध्यम आहे ज्यायोगे खेड्यापाड्यात लोकांना ह्याचे गांभीर्य कळेल आणि शौचालयाचे जसे महत्व आता कळत आहे तसेच तोंडावर रुमाल धरून खोकणे, कुठेही न थुंकणे ह्याचे हि लोक पालन करतील अशी अशा करूया .तेंव्हाच आपला देश निरोगी होईल.