Sweet Potato Information in Marathi
रताळे माहिती
रताळे – एक बहुगुणी उपवासाचा कंद
- आषाढी एकादशी आली की बाजारात रताळ्यांचे ढीग दिसायला लागतात. उपवासासाठी कंदमुळे खावी अशी आपली धारणा आहे. म्हणून रताळी घेतली जातात. पण आपल्याला वाटते रताळे बटाट्यासारखी, म्हणून त्यात पण बटाट्यासारखे वजन वाढायचे गुणधर्म असतील. आणि आपण चटकन हात मागे घेतो. हीच आपली मोठी चूक आहे. कारण रताळे वजन वाढवित नाही तर वजन कमी करतात. दचकलात नं?
- रताळ्यामध्ये किती गुणधर्म आहेत हे ऐकाल तर थक्क व्हाल. हा बिचारा दुर्लक्षिला गेलेला कंद संपूर्ण युरोप मध्ये मात्र नाश्त्याचा प्रमुख पाहुणा आहे. ते लोक ह्याचे महत्व ओळखून इतक्या प्रकारे खातात की बस्स!
मुख्य जाती
- रताळे हे वनस्पती वर्गातील ‘अॅन्जिओस्पर्म’ प्रवर्गातील ‘कन्व्होव्हलेसी’ कुटुंबातील वनस्पती आहे. आणि त्याचे बायोलॉजीकल नाव आहे “आयपोमिया बटाटास”. गम्मत म्हणजे सर्व जगात रताळे हा ‘बटाटा’ ह्या नावाने ओळखला जातो. अर्जेटिना, व्हेनेझुएला, प्युरेटो रिको आणि डॉमिनीक रिपब्लिक येथे ‘बटाटा’ असे म्हणतात आणि मेक्सिको, पृ, चिली, मध्य अमेरिका आणि फिलिपाईन्स येथे त्याला ‘कामोटे’ असे म्हणतात.
- भारतात विविध प्रदेशात विविध नावे आहेत जसे, लाकडा दुम्पा [तेलगु] सर्कारेवल्ली किझांकू [तमिळ] गेनासू [कन्नड] रताळे [मराठी] कंदमुळा [ओरिया] मथुरा किझान्गु [मल्याळम] शक्कारिया [गुजराती] शक्कर [पंजाबी] रंग आलू [बंगाली]. ह्या कंदाला जी फुले येतात ती मॉर्निंग ग्लोरी ह्या जातीची असतात. ही फुले खूप आकर्षक दिसतात. ह्या कंदाला कधी कधी याम ह्या फळासारखा दिसल्याने गोंधळ उडतो.
भौगोलिक आवश्यकता
- रताळे ५७००० वर्षापूर्वी पॉलिनेशिया ह्या बेटांच्या समूहात पिकत होते. त्याला प्रथम कोलंबसच्या तुकडीने १४९२ मध्ये चाखले. नंतर वसाहतवाद्यांनी त्याचा प्रचार केला. आणि तेथून सर्व अमेरिकेत ह्याचा प्रसार झाला १५९४ मध्ये चीन मध्ये आणि १६०० मध्ये जपान मधे दुष्काळाशी सामना करण्यास ह्याचा उपयोग केला गेला. कारण रताळ्याची अत्यंत कमी गरजेत होणारी वाढ.
- रताळे २४ डिग्री तपमान, ७५० ते १००० मी.मी पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाशात पिकते. ह्याला जास्त पाणी किंवा ओलसरपणा चालत नाही, कारण त्याने मांसल भाग कमी होतो. कंद २ ते ९ महिन्यांमध्ये तयार होतो. रताळे कशाही जमिनीत उगवते. आणि त्याला जास्त खत पाणी किंवा कीटकनाशके वापरावी लागत नाही. तसेच त्याच्या वेलींमुळे गवत किंवा तण पण फारसे माजत नाही. अमेरिकेत रताळे साठा करण्यास “क्युअर” केले जातात. ते १३ ते १५ डिग्री तपमान १३ महिन्यांपर्यंत साठवून ठेवले जातात.
- रताळ्यांच्या उत्पादनात चीनचा पहिला नंबर आहे. तो ७०.६ मिलियन टन उत्पादन करतो. त्या खालोखाल नायजेरिया – ३.९ मी.टन, टांझानिया ३.८ मी.टन, इंडोनेशिया – २.३ मी.टन आणि युगांडा २.१ मी.टन. सेनेगल जातीचे रताळे सर्वात जास्त पिक देतात.
एका हेक्टर मध्ये रताळ्याचे ४० ते ५० हजार रोपे लावू शकतो. ते जून ते जुलै महिन्या मध्ये लावली जातात आणि ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्यात बागायती शेतीत लावली जातात. २५ ते ३० से.मी. लांबीच्या वेलींचे तुकडे त्याचे २/३ डोळे नांगरलेल्या जमिनीत खुपसून लावली जातात. त्याला सेंद्रिय खते टाकतात. - पाने पिवळी पाडली की रताळे तयार झाली असे समजतात. रताळ्याच्या ५० जाती आहेत. त्यापैकी काही पिवळी, तांबूस, केशरी, जांभळी, आणि तपकिरी सालीची असतात. आतील गर पांढरा, लाल, गुलाबी, जांभळा, पिवळा, केशरी, आणि पर्पल रंगाचा असतो. सामन्यात: आढळणारी जात ही आयपोमिया बटाटा ही आहे.
Uses / पोषण
रताळ्यात १५ प्रकारची पोषक द्रव्ये असतात.
१. नैसर्गिक साखर “low glycemic index” असते जी मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त असते. ती शोषली जाऊन इन्सुलिनचा स्तर वाढतो.
२. त्यात उच्च प्रकारचे तंतू फायबर असतात त्याने बद्धकोष्ट आणि कोलोन कॅन्सर ला प्रतिबंध होतो.
३. A विटामिन्स असते त्याने श्वासासम्बंधित त्रास कमी होतो.
४. विटामीन D असते. त्याने दात ,हृदय हाडे आणि थायरोइड ची समस्या दूर होतो.
५. पोटॅशियम खूप असते ते उच्च रक्तदाबासाठी उपयुक्त असते. ते सोडीयमची मात्रा नियंत्रित करते. टिश्यू आणि स्नायूंसाठी चांगले.
६. विटामिन्स B-६ असल्याने स्नायू आणि हृदयासाठी चांगले असते त्यामुळे मेंदूचे संदेशवहन सुधारते.
७. बीटा केरोटीन असते. ते अॅंटी ऑक्सीडंट असल्याने त्याने स्तनांचा आणि फुप्फुसाचा कॅन्सर बरा होतो.
८. फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, आणि लोह असते. त्याने ताण तणाव कमी होतो.
९. रताळ्याचे उकळलेले पाणी त्वचेसाठी चांगले असते. त्याने जळजळ खाज कमी होते. डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे व त्वचेच्या वळ्या कमी करते.
रताळ्यामधे युनिक अॅंटी टॉक्झीडंट असते. आणि anthocyanins peonidin and cyanidins तसेच vitamin A असते. २००gm उकडलेले रताळे खालील गोष्टी देते :-
• कॅलरी – १८०
• कर्ब – १०४ ग्राम
• प्रोटीन- -४ ग्राम
• फॅट – ०.३ ग्राम
• फायबर-६.६ ग्राम
• व्हिटामिन A – एका दिवसाच्या गरजेच्या ७६%
• व्हिटामिन C – एका दिवसाच्या गरजेच्या ६५%
• मॅंगनिज – एका दिवसाच्या गरजेच्या ५०%
• व्हिटामिन B६ – एका दिवसाच्या गरजेच्या २९%
• पोटॅशियम – एका दिवसाच्या गरजेच्या २७%
• पॅंन्टोथेनिक अॅसिड- एका दिवसाच्या गरजेच्या १८%
• कॉपर -एका दिवसाच्या गरजेच्या १६%
• नियासिन – एका दिवसाच्या गरजेच्या १५%
• अॅंटी टॉक्झीडंट जे आपल्या शरीराला फ्री रॅडीकलपासून बचाव करतात.
Sweet Potato Ratale Recipe / कशे खाऊ शकतो
- रताळ्याचे आपण बरेच प्रकार करून खातो, जसे, रताळे उकडून गूळ घालून खाणे, रताळे कीस फोडणी देऊन खाणे.
- बटाट्यासारखे रताळ्याचे काप करून तव्यावर भाजून सोया सॉस बरोबर खाणे. रताळे कबाब सारखे तुकडे करून भट्टीत भाजून खातात.
- युरोपियन देशात नाश्त्याला रताळे हमखास असलेच पाहिजे. ते पण रताळे भाजून सोयाबरोबर खातात.
- गुजराथी लोक रताळ्यांचे वेफर्स करतात त्याला ते रताळू म्हणतात.
अशा रीतीने हा बहुगुणी कंद आपण अति परिचयात अवज्ञा ह्या न्यायाने दुर्लक्षित करतो.