Suresh Raina Information in Marathi
सुरेश रैना मराठी माहिती
सुरेश रैना – एक लढवय्या खेळाडू :
- भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक डावखुरा खेळाडू म्हणून सुरेश रैना प्रसिद्ध आहे.
- आय.पी.एल स्पर्धेत तो गुजरात लायन्सचा कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा तो उपकर्णधार म्हणून खेळला आहे.
- त्याच्या मध्यम गतीच्या फलंदाजीमुळे आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीमुळे त्याला बरेच यश मिळाले आहे. तो जगभरात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून देखील ओळखला जातो.
- याशिवाय सुरेशने काही काळासाठी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व देखील केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा एक तरुण कर्णधार म्हणून त्याने मान मिळवला आहे.
- तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
खडतर बालपण :
- सुरेश रैनाचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुरादनगर मध्ये २७ नोव्हेंबर १९८६ रोजी झाला.
- त्यांचे घराणे मुळचे जम्मू आणि कश्मीर मधील रैनावारी मधील काशिमिरी पंडितांचे आहे. त्याचे वडील त्रिलोकचंद रैना सैन्यात होते आणि आईचे नाव आहे परवेश रैना.
- सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर त्रिलोकचंद “ऑर्डनंस फॅक्टरी” मध्ये काम करत होते. सुरेशला चार भावंडे आहेत, मोठी बहिण रेणू आणि तिच्यापेक्षा लहान भाऊ दिनेश, नरेश आणि मुकेश.
- सुरेश रैना भावंडांमध्ये सर्वात लहान आहे.
- शिक्षणासाठी सुरेश लहान वयापासूनच हॉस्टेलमध्ये राहावे लागले होते. सुरेशला लहानपणा पासूनच या गोष्टीची खंत राहिली की वडील कामा निम्मित बाहेरगावी रहात असत व आईला त्याच्याकडे फारसे लक्ष देता येत नव्हते.
- हॉस्टेल मध्ये रहात असताना त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता ज्यामुळे सुरेश रैना अत्यंत निराश झाले होते. २००० साली सुरेश रैनाने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच आपल्या घरी निघून आले. इथे त्याने गव्हर्नमेंट स्पोर्ट्स कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले.
- सुरेशचा खेळ त्याचे कोच एस एन ख्रिश्चन व दिनेश शर्मा यांना आवडत असे आणि म्हणूनच सुरेशचे सिनियर्स त्याची खूप रॅगिंग करत असत.
- रैना आणि त्याच्या मित्रांना मारहाण करणे, त्याला कपडे धुवायला लावणे, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ घालणे, दुधात गवत टाकणे अश्या अनेक प्रकारे त्याला त्रास देण्यात आला होता.
- या त्रासाला कंटाळून ते घरी निघून आले परंतु त्यांचे कोच, दिनेश शर्मा व मुख्याध्यापक यांनी घरी येऊन असे पुन्हा होणार नाही याचे आश्वासन दिले.
- यानंतर ते पुन्हा कॉलेजमध्ये जाऊ लागले व त्याने ट्रेनिंग पूर्ण केली. त्यानंतर ते उत्तर प्रदेशच्या १६ वर्षाखालील संघाचे कर्णधार बनले.
क्रिकेटकडे वळला :
- आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर त्याला इंडियन क्रिकेट टिम मध्ये स्थान मिळाले. २००३ मध्ये तो इंडिया A टिम बरोबर जिम्ब्वाबे आणि केनया च्या दोर्यावर गेला. धोनीने सर्व सामन्यात २२३ रन्स केल्या त्याची सरासरी ७०.४ पडली.
- सौरव गांगुली आणि रवी शास्त्री ह्यांनी त्याचे गुण हेरले. फूटबॉल मुळे तो उत्कृष्ट गोलकीपर च उत्कृष्ट विकेटकीपर झाला. आणि दिनेश कार्तिक नंतर त्याचे संघात स्थान निश्चित झाले. BCCI ने त्याला B ग्रेड चे स्थान दिले. २००४/५ मध्ये त्याने बांगला देश आणि श्रीलंका ह्यांच्याबरोबर आपल्या खेळाचे खूप चांगले प्रदर्शन केले. ICC रॅंक मध्ये त्याला रिकी पोंटिंग च्या पुढे स्थान मिळाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासाची सुरुवात :
- २००२ साली संघाची निवड करणाऱ्यांचे लक्ष सुरेशने वेधून घेतले व केवळ १५ वर्षाचे असतानाच त्याची निवड १९ वर्षाखालील भारतीय संघामध्ये झाली.
- अंडर १९ संघामध्ये खेळताना त्याने दोन अर्धशतक देखील बनवले. याशिवाय ते अंडर १७ च्या संघासोबत श्रीलंका टूर साठी गेले आणि यशस्वी होऊन परतले.
- २००३ साली वयाच्या सोळाव्या वर्षी ते आसाम विरुद्धच्या सामन्यात रणजी करंडक खेळले. त्यानंतर अंडर-१९ च्या संघामधून पाकिस्तानच्या टूरवर गेले.
- रैनाचा खेळ पाहून २००४ साली अंडर १९ च्या वर्ल्डकप साठी त्याची निवड केली गेली.
- या वर्ल्डकप मध्ये त्याने तीन अर्धशतक केले होते आणि ३८ चेंडूंवर ९० धावा घेतल्या होत्या. त्यांचा खेळ पाहून ऑस्ट्रेलिया क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला बॉर्डर-गावस्कर स्कॉलरशिप मिळाली.
- २००७ मध्ये रणजी करंडक खेळत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला अतिशय काळजी वाटत होती की त्यांचे करियर धोक्यात येईल.
- पाच सहा महिन्यातच फ़िजिओथेरपिस्ट चंदन चावला यांच्या मदतीने आणि तासान तास व्यायाम व सराव करून ते पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये परतले.
- त्याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचमध्ये एक शतक केले.
- त्यानंतर सुरेशने मागे वळून पहिले नाही आणि भारतीय क्रिकेट साठी एका मागोमाग एक चांगले परफॉर्मन्स दिले.
- रैना आयपीएल मध्ये ३००० रन करणारे पहिले खेळाडू आहेत तसेच १०० पेक्षा जास्त सिक्सर मारणारे पहिले भारतीय आणि जगातील दुसरे खेळाडू आहेत.
- तसेच आयपीएलच्या ७ सत्रात ४००० हून अधिक रन करणारे एकमेव खेळाडू आहेत. एवढा त्रास सहन करून यश मिळवल्यामुळे त्याने आपल्या हातावर “Believe” हा टॅटू बनवून घेतला आहे ज्याचा अर्थ आहे विश्वास ठेवा.
पारिवारिक जीवन :
- ३ एप्रिल २०१५ रोजी सुरेश रैनानी प्रियांका चौधरी हिच्या सोबत विवाह केला.
- हे दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. प्रियांका चौधरीचे वडील सुरेश रैना यांच्या शाळेत शिक्षक होते व कोच देखील होते.
- तसेच या दोघांच्याही माता एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. लहानपणी त्याची ओळख असली तरीही मधल्या काही काळात त्यांचे एकमेकांसोबत काहीही संबंध नव्हते.
- रैना ऑस्ट्रेलिया मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप खेळत असताना त्याच्या आईने व प्रियांकाच्या आईने त्यांचे लग्न पक्के करून टाकले.
- रैना यांना एक गोंडस मुलगी देखील आहे जिचे नाव आहे ग्रासिया रैना. ग्रासियाचा जन्म १४ मे २०१६ रोजी एम्स्टर्डम, नेदरलँड मध्ये झाला.
- ग्रासियाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेश रैना आणि त्याच्या बायकोने ग्रासिया रैना फाउंडेशन नावाची विना-नफा संस्था सुरु केली.
- ही संस्था देशभरातील वंचित माता आणि त्याच्या मुलांच्या कल्याणासाठी कार्य करते.
मान सन्मान :
- रैनाला स्वतःच्या क्रिकेटच्या बॅट संग्रहित करण्याची खूप आवड आहे.
- आतापर्यंत त्याने जवळपास अडीचशे बॅट गोळा केल्या आहेत.
- त्याच्या वडिलांनी १९९८ मध्ये त्याला गिफ्ट म्हणून दिलेली बॅट देखील त्याने अजून सांभाळून ठेवली आहे.
- या शिवाय त्याला गाणे म्हणण्याची देखील आवड आहे. त्याने २०१५ साली बॉलीवुड मधील ‘मेरठिया गँगस्टर्स’ नावाच्या एका फिल्म साठी ‘तू मिला सब मिला’ हे गाणे म्हटले आहे.
- तसेच जानेवारी २०१८ मध्ये त्याच्या बायकोच्या ‘द प्रियांका रैना शो’ ह्या रेडियो शो साठी ‘बिटीया रानी’ हे गाणे देखील म्हटले आहे.
- तसेच चेन्नई सुपरकिंग्जच्या एंथम साठी देखील आवाज दिला आहे. सुरेश केवळ गाणेच म्हणत नाही तर त्याला सेक्सोफोन देखील उत्तम प्रकारे वाजवता येतो.
- सुरेशला बास्केटबॉल हा खेळ देखील खूप आवडतो. त्याचे म्हणणे आहे की ते जर क्रिकेटर झाले नसते तर बास्केटबॉल खेळाडू झाले असते.
- भारतीय क्रिकेट टीम मधील रवींद्र जडेजा आणि शिखर धवन हे त्यांचे सर्वात चांगले मित्र आहेत. पण एवढी प्रसिद्धी मिळून देखील ते अत्यंत नम्र आहेत.
- ते आजही त्याच्या मूळ ठिकाणी गेल्यावर त्याच्या मित्रांना आवर्जून भेटतात. एवढी प्रसिद्धी मिळून देखील त्याने डोक्यात हवा जाऊ दिली नाही हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे.