Sunil Gavaskar Information in Marathi
लिटिल मास्टर – सुनील गावस्कर
- सुनील मनोहर गावस्कर उर्फ ‘सनी’ उर्फ ‘लिटिल मास्टर,’ भारतीय क्रिकेटचा ध्रुव तारा. ज्याच्या खात्यात अनेक विक्रम आहेत की जे अजूनही अनेकांना मोडता आले नाही.
- आजही त्याच्या मताला जगभर किंमत आहे. जगाच्या पाठीवर कुठेही “सुनील गावस्कर” नाव ऐकले की लोक आदराने झुकतात. हे कौतुक विदेशातून मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठी साधना लागते आणि ती गावस्करने केली आहे.
- क्रिकेटची पंढरी मुंबईत जन्माला येऊन त्याने मुंबई बरोबरच भारताचे नाव रोशन केले आहे. क्रिकेट हा जंटलमन गेम आहे असे पूर्वी म्हणायचे आणि तो खरा जंटलमन होता. त्यावेळी भारतीय टीम मध्ये पतौडी, अजित वाडेकर, जडेजा, अंशुमन गायकवाड, संदीप पाटील असे मोठे मोठे आणि उंच खेळाडू होते तेंव्हा हा साडे पाच फुटाचा लहानसा मुलगा टीम मध्ये आला आणि त्याने सगळ्यांचे मन जिंकले.
- त्यावेळी भारताकडे बोलिंगचा फक्त एकच प्रकार होता तो म्हणजे गुगली! पण वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड ह्यांचे ताड माड उंच बोलर ज्या भयंकर वेगाने आणि उसळी घेणारे चेंडू टाकत होते त्याला बाजी प्रभूप्रमाणे तोंड देणारा फक्त आणि फक्त सुनील गावस्करच होता. तेंव्हापासून ओपनिंग बॅट्समन म्हणून त्याचे स्थान पक्के झाले.
- त्यावेळी पाच दिवसाचे ‘टेस्ट’ सामने जास्त व्हायचे आणि ओपनिंगला येऊन गावस्कर इनिंग संपेपर्यंत एका बाजूला ठाम उभा राहायचा. बाकीचे येऊन तोंड दाखवून निघून जायचे आणि संघाची पूर्ण धुरा तो आपल्या खांद्यावर पेलायचा.
- जिंकायचे असेल तर इतर संघ फक्त सुनील गावस्करला आउट करायची रणनीती आखायचे आणि तो आउट झाला की उरलेले कोंबडी रोग झाल्यासारखे तंबूत परतायचे असे तेंव्हा पेपर मध्ये छापून यायचे. असा हा सुनील आहे तरी कोण आणि कसा झाला ते बघू.
सुनील गावस्कर यांचे जन्म, कुटुंब आणि शिक्षण :
- गावस्करचा जन्म दि. 10 जुलै 1949 ला गौड सारस्वत कुटुंबात झाला. वडील मनोहर गावस्कर आणि आई मीनल गावस्कर.
- त्याच्या जन्माची पण एक मजेदार घटना आहे. हॉस्पिटल मध्ये एक दिवस त्याची एका कोळ्याच्या मुलाबरोबर अदलाबदल झाली. सुनील एक कोळी बाईच्या कुशीत ठेवला गेला.
- त्याच्या मामानी ओळखले की हा त्यांचा भाचा नाही आणि परत सुनील आई कडे आला. नाहीतर आज सुनील मोठ्या फिशरीजचा मालक झालाच असता. कारण कुठलेही क्षेत्र असो सुनील त्यात प्रभाव पडू शकत असे.
- त्याचे शिक्षण सेंट झेवियर स्कूल आणि कॉलेज मध्ये झाले. लहानपणा पासूनच सुनीलला क्रिकेटचे वेड होते. मामा माधव मंत्री हे पण क्रिकेटर होते.
- लहान सुनील आई बरोबर खेळायचा आणि गल्लीत लोकांच्या खिडकीच्या काचा फुटू नये म्हणून आई त्याला स्ट्रेट बॉल टाकायची. त्यामुळे त्याला कुठलाही चेंडू टोलवायची सवय लागली.
- आकाशवाणीला मुलाखत देतांन त्याने त्याचे आवडते गाणे सांगितले होते, “चांदसी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था, हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था “त्याप्रमाणे दिल्लीला सामना झाल्यावर त्याला त्याची जोडीदारीण मार्शनील मेहरोत्रा मिळाली.२३ सप्टेंबर 1974 ला ते विवाहबद्ध झाले.
- त्याला मुलगा झाला त्याचे नाव त्याने त्याच्या आवडत्या क्रिकेटर रोहन कन्हाय आणि जयसिंह वरून रोहन जय असे ठेवले. पण रोहन हेच नाव प्रचलित झाले.
क्रिकेटमध्ये प्रारंभ :
- मामा माधव मंत्री क्रिकेट खेळत होते म्हणून तो पण क्रिकेट कडे आकृष्ट झाला आणि शाळेतच त्याला “बेस्ट स्कूल बॉय क्रिकेटर “ चा किताब मिळाला. नंतर रणजी ट्रॉफी साठी खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने मागे वळून नाही बघितले. राजस्थान विरुद्ध त्याने ११४ रन्स केल्या आणि त्याला इंडियन टीम मध्ये निवडले गेले.
- वेस्ट इंडीज विरुद्ध 65 आणि 67 रन्स काढून पहिल्यांदा वेस्ट इंडीज विरुद्ध भारताला जिंकून दिले. त्यानंतर संघाची सर्व मदार त्याच्यावरच पडली. त्याने फक्त रन्स काढायच्या आणि जिंकून द्यायचे.
- त्याचे एकावर एक शतक होत गेले आणि टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वात जास्त शतकांचा, 34 शतकांचा तो पहिला मानकरी ठरला जे रेकोर्ड बऱ्याच वर्षांनी सचिनने मोडले.
- वेस्ट इंडीज विरुद्ध केलेल्या धावसंख्यांचे महत्व खूपच जास्त आहे कारण त्यावेळी वेस्ट इंडीजचे राक्षसासारखे धिप्पाड आणि ताड माड बोलर होते आणि ते शरीरवेधी गोलंदाजी करीत.
- ह्या पार्श्वभूमीवर गावस्करने दिलेल्या तिखट प्रतिकाराची आणि पराक्रमाची कल्पना यावी. त्याने आपल्या ‘सनी डेज’ ह्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, तो फलंदाजीला आला तेंव्हा वेस्ट इंडीज चे लोक“ किल दॅट मॅन “ असे ओरडत होते आणि अक्षरश: जंगली आरोळ्या ठोकत होते अशा परिस्थितीत दोन दोन दिवस फलंदाजी करणे खरोखर कठीण होते. पण त्याने आपल्या वागणुकीने क्रिकेट हा जंटलमन गेम आहे हे सिद्ध केले.
- त्यावेळी पाच दिवसाचे सामने व्हायचे आणि ओपनिंगला येऊन गावस्कर इनिंग संपेपर्यंत एका बाजूला ठाम उभा राहायचा. बाकीचे येऊन तोंड दाखवून निघून जायचे आणि संघाची पूर्ण धुरा तो आपल्या खांद्यावर पेलायचा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुनील गावस्कर:
- 1971 मध्ये त्याच्या क्रिकेट करिअरचा शुभारंभ झाला तोही वेस्ट इंडीज बरोबरच आणि आल्या आल्या २ शतके ठोकल्याने तो राष्ट्राचा हिरो झाला. त्यानंतर त्याने धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली एक दिवसीय सामन्यात पण त्याने शतके ठोकली.
- त्या नंतर 1971 ते 1987 पर्यंत हा सूर्य तेजाने तळपत होता. 1983 ला वर्ल्ड कप जिंकण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.
- 1973 पासून त्याने वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान,ह्यांच्याबरोबर सामने खेळला आणि पाच पाच दिवस ठाम उभा राहून शतके ठोकली. पण बाकी कोणाची साथ नसल्याने त्याची उत्कृष्ट खेळी वाया जायची.
- इम्रान खान, क्लाइव्ह लॉइड, आणि जगातील सर्व बॉलर्सनी त्याची स्तुती केली की, अशा फलंदाजाला बॉलिंग करणे ही खरच भाग्याची गोष्ट आहे.
- 1978-79 मध्ये पाकिस्तान बरोबर खेळतांना त्याने एकाच टेस्ट मध्ये 2 शतके काढून पॉली उम्रीगर चे रेकॉर्ड मोडले.
- त्याच वेळी त्याला कॅप्टन पण केले गेले. नंतर कपिल देव उदयास आला आणि त्याच्या अष्टपैलू खेळामुळे त्याला कॅप्टन करण्यात आले. त्याच वेळी सर्वांनी एक होऊन भारताला 1983 मध्ये वर्ल्ड कप मिळवून दिला.
- 1987 मध्ये पाकिस्तान बरोबर सामना खेळून तो निवृत्त झाला. पण क्रिकेट सोडले नाही. तो कॉमेंटेटर म्हणून यशस्वी झाला. त्याचे मत अजून ही ग्राह्य धरले जाते हे परवाच्या भारत पाक सामन्याच्या वेळी कळले.
सुनील गावस्करची इतर माहिती :
- सुनील गावस्करच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. तो मिश्किल आहे, नकलाकार आहे, चांगल्या स्वभावाचा आहे.
- कोणाचीही मदत करणारा आहे. ड्रेसिंग रूम मध्ये तो असला तर चैतन्य असते. पण तितकाच तो स्पष्ट किंवा परखड स्वभावाचा पण आहे.
- खेळाडूंना बक्षिसाच्या रकमेत वाटा मिळायला हवा हे त्यानेच प्रथम प्रतिपादन केले. त्यानंतर खेळाडूंचे मानधन प्रचंड वाढले. तो क्रीडा विषयात स्तंभ लेखन पण करत.
- आणखी एक विशेष गुण म्हणजे त्याने “सावली प्रेमाची” ह्या सिनेमात, नासिरुद्दींच्या मालामाल ह्या सिनेमात आणि देव आनंदच्या हरे राम हरे कृष्ण ह्या सिनेमात कामे केली आहेत.
- सावली प्रेमाची मध्ये तो नायक होता. तसेच “सनी डेज” ‘आयडॉल” आणि “रन -न- रुईन” हि पुस्तके लिहिली. खरोखर गुणांच्या बाबतीत परमेश्वराने त्याला छप्पर फाडके दिले आहे.
- त्याने शांताराम नांदगावकर ह्यांनी लिहिलेले गाणे “ इथे थांबायला वेळ आहे कुणाला” हे म्हंटले आहे.
- 1994 मध्ये त्याला मुंबईचे शेरीफ केले होते. तसेच त्याला पद्मविभूषण हा भारताचा मनाचा किताब पण मिळाला आहे.
- सध्या नागार्जुन ह्या नटाबरोबर इंडियन बॅडमिंटन लीग मध्ये भागीदारी केली आहे. त्याला खरे म्हणजे मुष्टीयोद्धा व्हायचे होते. मारुती वडार सारखे.
- वानखेडे स्टेडीयम मध्ये त्याचा नावाचे गेट आहे. आणखी किती सांगायचे? तो सर्वश्रेष्ठ होता, आहे आणि असेल. कारण रेकॉर्ड पुढच्यांनी मोडले तरी पहिला तो पहिलाच.
पुरस्कार आणि इतर यश :
- टेस्ट मध्ये 10,000 रन्स करणारा पहिला भारतीय.
- 34 शतके ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटर.
- सलग एकाच सामन्यात 2 वेळा 4 सलग शतके करणारा एकमेव पहिला भारतीय.
- 58 शतकी भागीदारी आणि 18 खेळाडून बरोबर शतकी भागीदारी.
- प्रवेशाच्या सामन्यातच 774 रन्स काढणारा पहिला भारतीय.
- 100 झेल घेणारा पहिला भारतीय.
- वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वात जास्त रन्स घेणारा, [774] एकमेव खेळाडू.
- वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वात जास्त रन्स 2749 आणि शतके
- मैदानात बॅट मिरवण्याचा मान मिळालेला पहिला भारतीय.
- 1980 मध्ये विसडेन क्रिकेटर ऑफ द इयर चा मान मिळालेला पहिला भारतीय.
- MCC Spirit of cricket Country मध्ये व्याख्यान देणारा एकमेव भारतीय.