Kanya Bhrun Hatya in Marathi
Stri Bhrun Hatya Nibandh in Marathi माहिती / निबंध
‘स्त्री भृण हत्त्या’ हे शब्द ऐकल्यावर अंगावर काटा येतो. आपल्या भारतात व आपल्या समाजात कुणी खून केल्यावर त्याला फाशीची शिक्षा होते, किंवा त्याला कैद केली जाते. पण बाळ जन्माला येण्याआधीच जर का कोणी त्याची हत्या करत असेल तर त्याला काय शिक्षा दिली पाहिजे? काही लोक आपल्या बाळाला कसे मारू शकतात?? मुलगा असो किंवा मुलगी हे आपलच बाळ आहे हे लोक कसे विसरतात. स्त्री भृण हत्या होत असताना, आपल्याच बाळाची हत्या होत असताना त्या आईला काय वाटत असेल. आणि एखाद्या आईला असे करण्यास भाग पडणाऱ्या व्यक्तीला काय शिक्षा दिली पाहिजे. असे लोक हे कसे विसरतात की ते देखील अश्याच एका स्त्रीच्या उदरातून जन्माला आले आहेत जर का त्या वेळी ती मुलगी आहे म्हणून जर तिची हत्या केली गेली असती तर आपण ह्या दुनियेत जन्माला आलो असतो का?
अश्या अनेक गोष्टी आपल्या देशात आजही घडत असताना आपण आपल्या देशाला सुधारित देश कसे म्हणायचे? ज्या जीवाला देवाने जन्म द्यायचे ठरवले आहे तो जीव आपण कसा घ्यायचा आणि असे करणाऱ्यांना फक्त काही रुपयांचा फाईन देवून सोडतात. आपल्या जगात मातेवाचून कोणी जन्माला आले आहे का? आपण सगळे असा विचार का करत नाही की ज्या बाळाची म्हणजेच ज्या मुलीची हत्या आपण करतो आहोत ती पुढच्या पिढीची माता आहे.
“स्त्री भृणहत्या टाळा, माणुसकी सांभाळा”
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सौजन्य यांची मूर्ती आहे. आताची स्त्री ही कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्र सुद्धा आता ती काबीज करत आहे. पूर्वीच्या काळात स्त्री म्हणजे चूल व मुल सांभाळणारी. तिचे स्वतःचे असे काही आस्तित्व नसे. पण आता तस नाही. परिस्थिती हळू हळू बदलत चालली आहे. आताची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करू लागली आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे स्त्रिया कार्यरत नाहीत. पण बदलत्या काळात व बदलत्या वैद्यानिक प्रगतीमुळे माणूस बदलत गेले आहे. ह्या काळात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत चालली आहे. आणि परीस्थिती जर का अशीच राहिली तर आपल्या मुलांना राखी कोण बांधणार आणि आपल्या मुलांची लग्न कसे होणार ह्याचा विचार स्त्री भृणहत्या करणाऱ्या लोकांनी केला पाहीजे.
“पहिली मुलगी तूप रोटी,” “पहिली मुलगी धनाची पेटी” ह्या फक्त म्हणीच होऊन बसल्या आहेत. आपल्या समाजात पहिली मुलगी झाली की नाक मुरडणारी माणसेच अनेक आहेत. तर त्या उलट काही लोक आनंद साजरा करणारी देखील आहेत. पण वाईट ह्याच गोष्टीचे वाटते की आपल्या समाजातील काही लोकांना स्त्री भृणहत्या करू नये हे कधी समजणार.
कठोर शिक्षा
स्त्री भृणहत्या करणाऱ्यांना खूप भयंकर शिक्षा दिली पाहिजे. एका लहान मुलीचा हत्या करताना त्यांना हे कसे लक्षात येत नाही की आपण पण एका आईची, एका पिढीची हत्या करत आहोत. मला इतकेच वाटते की स्त्री भृणहत्या बंद झाली पाहिजे. आज सरकारने मुलींसाठी कितीतरी नव-नवीन योजना तयार केल्या आहेत. आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करायची काहीही गरज नाही. प्राचीन काळापासून भारतीय समाजातल्या स्त्रियांना त्यांच्या कुटूबांसाठी व समाजासाठी शाप मानले जाते. या कारणामुळे तांत्रिक प्रगतीच्या काळात भारतात अनेक वर्षपासून स्त्री भृणहत्या होत आहे.
आपण जर जनगणने नुसार स्त्री व पुरुष ह्याचे प्रमाण पहिले तर आपल्या लक्षात येईल. काही वर्षांपूर्वी जन्माच्या आधी बाळाच्या लिंग निदान परीक्षेचा सर्रास वापर कण्यात आला होता. गर्भ मुलगी असेल तर गर्भपात करून घेणे अटळ असे. याचे एक कारण होते हुंडा पद्धत. विचार करा एखादा गरीब माणूस असेल तर आणि त्याच्या घरात एखादी मुलगी जन्माला आली की त्याला सर्वात पहिले हा विचार पडेल की हिच्या लग्नासाठी हुंडा कसा जमा करायचा, याउलट जर मुलगा जन्माला आला तर मोठा झाल्यावर तो हुंडा घेऊन येणार शिवाय कमावता झाल्यावर आपल्याला घरखर्चात मदत करणार. या मानसिकतेमुळेच मुलींपेक्षा मुलांना प्राधान्य देण्याची प्रथा रुजू झाली. ज्या दिवशी आपल्या देशातून हुंडा पद्धतीचे समूळ निर्मुलन होईल त्यादिवशी मुलगा किंवा मुलगी या मध्ये भेदभाव करण्याचे काही कारणच राहणार नाही. या शिवाय सर्व समाजाने एकत्र येऊन स्त्री भृणहत्ये विरुध्द चळवळ उभारली पाहिजे. कोणीही गर्भ निदान केले आहे असे लक्षात येताच अश्या लोकांची व डॉक्टरांची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. मुलींसाठी सरकार ज्या योजना राबवत आहे त्या बद्दल जाणून घेऊन त्याची माहिती इतरांना पटवून दिली पाहिजे.
जेव्हा लोकांना समजेल की मुलगी ही एक ओझ नसून मानवजातीला आधार देणारा महत्वाचा पाया आहे. तेव्हा स्त्री भृणहत्या नक्कीच थांबेल. कारण विज्ञान कितीही पुढे गेले तरी आईविना मूल जन्माला घालण्याइतके प्रगत नक्कीच झाले नाही. शिवाय आईच्या, बहिणीच्या मायेशिवाय हे जग किती निरस होऊन जाईल.
Really is this?
I am very inspring essay………
thanks to you………?
nice…….