Shiv Sena History in Marathi
Shivsena / शिव सेना- गर्व से कहो हम हिंदू है :
- जेंव्हा मराठी मनांना मरगळ आली होती, मुंबई महाराष्ट्राची असूनसुद्धा मराठी माणसांची परवड होत होती, तेंव्हा एका माणसाला हे पाहवले गेले नाही. तो एकटा काहीच करू शकत नव्हता पण इच्छा दुर्दम्य होती. ती व्यक्ती म्हणजे प्रबोधनकार ठाकरे.
- मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून १०५ मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना ‘मुंबई तुमची, भांडी घसा आमची’ असे सुनावले गेले. ती व्यक्ती आपला क्षोभ फक्त आपल्या कुंचल्याच्या सहायाने बाहेर टाकत होता. ते अतिशय मार्मिक कार्टूनिस्ट होते. त्यामुळे सुशिक्षित समाज त्यांच्याकडे ओढला गेला आणि सम विचारांच्या लोकांची एक पार्टी तयार झाली.
- प्रबोधनकारांचा मुलगा बाळ ठाकरे स्वत: पण मार्मिक ह्या नियतकालिकात कार्टूनिस्ट होते. त्यांनी १९ जून १९६६ ला एक पार्टी स्थापन केली. ते आणि इतर सहकारी शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त होते. म्हणून प्रबोधनकारानी पार्टीचे नाव शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे असे नाव दिले. पार्टीचा झेंडा भगवा ठरला. आणि निशाणी धनुष्यबाण ठरली.
बिंदूचा सिंधू झाला :
- पार्टीने पहिला घाव घातला तो काही संस्थांच्या चुकीच्या धोरणांवर. सरकारी नोकरी हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते आणि तो संविधानाने दिलेला हक्क पण आहे. पण काही संस्थांच्या जाहिराती फक्त टाइम्स ऑफ इंडिया मध्येच यायच्या त्यापण महाराष्ट्राबाहेरील पुरवणी मध्ये. साहजिकच ती मुले अर्ज करून इंटरव्ह्यू देऊन नोकरीला पण लागायची आणि मराठी मुलांना कळायचे पण नाही. हे न्याय्य नव्हते आणि कायदेशीरपण नव्हते.
- शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना केली आणि सरकारला ह्या गोष्टीचा कायदेशीर जाब विचारला. नियमाप्रमाणे कुठल्याही नोकर भरती मध्ये स्थानिक भूमि पुत्रांना ठराविक जागा मिळाल्याच पाहिजे असे ठणकावून सांगितले. हा तरुणांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने खूप तरुण शिवसेनेकडे आकर्षित झाले आणि शिवसेना फोफावत गेली. पण त्यामुळे खरोखरच हुशार मुलांना चांगल्या नोकर्या लागल्या. प्रत्येक सरकारी संस्थांमध्ये स्थानीय लोकाधिकार समितीची कामगार सेना रजिस्टर झाली.
ठाणे जिंकले :
- शिवसेनेला कडवे सहकारी मिळाले. ठाण्यात मराठी बाहुल्य असल्याने शिवसेनेने १९६७ मध्ये ४० पैकी १७ जागा जिंकल्या. त्यानंतर लगेच सिविक इलेक्शन मध्ये १२१ पैकी ४२ जागा जिंकल्या. हळूहळू नगरसेवक, आमदार, खासदार असे शिवसेनेचे चढत्या क्रमाने उत्कर्ष व्हायला लागले. ह्यामध्ये कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि बाळासाहेबांची घणाघाती भाषणे ह्यांचे मुख्य योगदान होते.
- बाळासाहेबांच्या भाषणांना तुफान गर्दी होत असे. मुंबईत जरी मराठी माणसे दादर, लालबाग परळ गोरेगाव माहीम ह्या उपनगरांपर्यंतच सीमित होते तरी मुंबईला वेढलेल्या ठाणे जिल्ह्यात बहुसंख्य मराठीच माणसे आहेत आणि ते विरार पासून कल्याण कर्जत पर्यंत विखुरलेली आहेत. त्यामुळे ठाण्यापासून सुरु झालेला भगवा मुंबईत स्थिरावला.
अभिमान आणि सन्मान :
- १९८५ मध्ये शिवसेनेने ७५ जागा जिंकून BMC वर म्हणजे बृहन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवला. शिवसेनेने मराठी लोकांसाठी शिव उद्योग ची सुरुवात केली. मराठी माणसांनी धाडस करून पैसा मिळविला पाहिजे असे बाळासाहेबांचे म्हणणे होते. मराठी माणूस संतांच्या शिकवणीमुळे पैशांच्या बाबतीत उदासीन होता पण शिवसेनेमुळे बरीच मराठी माणसे व्यवसायात पडली. विशेष म्हणजे शिवसेनेचे अध्यक्ष कुठलीही निवडणूक लढवित नाही की पद घेत नाहीत. ते किंगमेकर म्हणूनच काम करतात.
- विधानसभा आणि लोकसभा १९९० मध्ये शिवसेनेने ५२ जागा जिंकल्या आणि विधानसभेवर भगवा फडकवला. शिवसेनेचे मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीशी भागीदारी करून लोकसभेच्या पण जागा जिंकल्या.ह्यावेळी मराठी हा अजेंडा न ठेवता हिंदुत्व हा अजेंडा ठेवला. कारण १९९३ च्या बॉम्ब स्फोटांमुळे शिवसेना देशद्रोही मुसलमान तसेच पाकिस्तानचा कट्टर दुष्मन झाली. बाळासाहेब दहशत वाद्यांच्या hit लिस्टवर गेले. तसेच २०१४ मध्ये BJP आणि शिवसेना ह्यांनी प्रचंड बहुमतांनी विधानसभेवर ताबा मिळविला. पण त्यात शिवसेनेला फायदा नाही झाला. त्यामुळे शिवसेनेने BJP शी २५ वर्षांची भागीदारी मोडली. आता दोन्ही पक्ष २०१९ मध्ये स्वतंत्र निवडणूक लढतील.
- पार्टीचा जसा विस्तार वाढला तसा लोकांचे वेगवेगळे गट आणि मतभेद सुरु झाले. निष्ठावंत आणि आयाराम गयाराम ह्यांच्यात तेढ वाढली तसे एक एक शक्तिमान पुढारी फुटून दुसर्या पक्षांमध्ये गेले. त्यातच २००४ ला बाळासाहेबांनी उत्तराधिकारी घोषित केला तसे त्यांचा उजवा हात त्यांचा पुतण्या राज ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. शिवसेना आता उद्धव ठाकरे आणि युवा सेना आदित्य ठाकरे पाहत आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ चे संजय राऊत ह्यांचे पण खूप कार्य आहे.
- अशा प्रकारे स्थानिक लोकांच्या मदतीसाठी उभारलेली पार्टी भारताच्या नकाशात आली. आज जगात सर्वत्रच स्थानांतरीत आणि भूमि पुत्र ह्यातील तेढ विकोपाला गेलीच आहे. आणि हा संघर्ष अटळ आहे. ह्यावर उत्तर म्हणजे रोजगाराच्या सर्व ठिकाणी समान संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक रोजगार वाढविणे. हे झाले तर कोणाला हौस आहे आपला गाव सोडून जाण्याची ?
Balasaheb Thakre Marathi Status / Quotes
ShivSena Latest News / Slogan / Quotes / Information in Marathi
Related posts
Nitin Bangude Patil Wiki Biography, Bhashan, Wife, Info, Family, Cast
Eknath Shinde Thane, Shivsena, MLA, Minister, Contact, Wiki
Subhash Desai Minister Shivsena, MLA, Wife, Contact, Wiki
Pratap Sarnaik Thane, Shivsena, MLA, Dahi Handi, Contact, Wiki
Ramdas Kadam Wiki, Son, Family, Contact, Biography, Caste, Profile