Shatavari Kalpa Information in Marathi
शतावरी कल्प
- गर्भवती महिलांसाठी शतावरी कल्प हे एक वरदानच आहे. या चूर्णामुळे गर्भाची वाढ उत्तम प्रकारे होते. तसेच गर्भपाताचा धोका पण शतावरीच्या सेवनाने कमी होतो.
- बाळंतपणात देखील मातांनी शतावरी कल्पाचे सेवन चालू ठेवावे कारण या चूर्णामुळे मातांमध्ये जास्त दुध निर्मिती होते आणि दुधाची गुणवत्ता सुद्धा वाढते. एक चमचा शतावरी कल्प एक ग्लास दुधासोबत रोज सकाळी घ्यावे.
- शतावरी कल्पाच्या नित्य सेवनाने मासिक पाळीच्या बऱ्याचशा तक्रारी दूर होतात. ज्यांची पाळी अनियमित आहे त्यांनी शतावरी चूर्ण नक्की घ्यावे.
- मासिक पाळीच्या वेळेस शतावरी कल्प खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- शतावरी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी रोज शतावरी कल्प खाल्ले पाहिजे.
- मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीचा त्रास होत असेल तरी सुद्धा शतावरी कल्प खाल्ले पाहिजे. रोज खाल्ल्याने लवकरच अर्धशिशीपासून सुटका मिळते. शतावरीच्या खोडाचा रस काढावा आणि त्यामध्ये समान प्रमाणात तिळाचे तेल घालून उकळवावे. या तेलाने मालिश करावी. अर्धशीशीचा त्रास कमी होतो.
- शतावरी मुळे तुमची त्वचा देखील तरुण दिसू लागते आणि सुरकुत्या कमी होतात.
- शतावरी कल्प मानसिक तणावापासून सुद्धा मुक्ती देते आणि ज्यांना तणावामुळे झोप येत नाही त्यांना देखील शांतपणे झोप येते. शतावरीच्या खोडाची खीर बनवावी आणि त्यात थोडे गाईचे तूप घालून त्याचे सेवन करावे. शांत झोप येईल.
- ज्या स्त्रियांना श्वेतप्रदरचा त्रास आहे त्यांनी रोज सकाळी शतावरी कल्प खाल्ले पाहिजे. अंगावरून पांढरे पाणी जाणे आणि ओटीपोटात दुखणे या सारख्या रोगांमध्ये सुद्धा शतावरी आराम देते. 5 ग्राम शतावरी कल्प घेऊन त्यात दुप्पट तूप घालावे आणि चाटून चाटून खावे. वरून थोडेसे कोमट दुध प्यावे.
- शतावरी थंड गुणधर्माची असल्यामुळे ताप आल्यानंतर शतावरी कल्प घ्यावे. शतावरी चूर्ण एक चमचा मधासोबत सकाळ संध्याकाळ घ्यावे.
- पित्त आणि अजीर्ण झाल्यास ५ गरम शतावरी चूर्ण एक चमचा मधासोबत घ्यावे. त्यामुळे छातीत जळजळणे, दुखणे अश्या त्रासापासून सुटका होते.
- सर्दी आणि खोकला जास्त झाला असेल तरी सुद्धा शतावरी चूर्ण खाल्यानंतर आराम मिळतो.
- शतावरी कल्प रोज सकाळी दुधातून घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच हि बुद्धीवर्धक देखील आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना शतावरी कल्प रोज द्यावे.
- मूतखड्याच्या रोगात देखील शतावरी कल्प नियमितपणे घेतल्यास चांगला आराम मिळतो.