Shark Information in Marathi
शार्क माहिती
आपण ‘जॉज’ हा सिनेमा पाहीलात ना? शिकारी हार्पून घेऊन शार्कला मारायला दबा धरून बसलेले असतात आणि अचानक पाठी मागून जोरात शार्क उसळून येतो आणि एकाला घेऊन जातो. अगदी नरभक्षक वाघासारखा कपटी, चतुर आणि बुद्धिमान असा प्राणी त्यात दाखवला आहे. प्रत्यक्षात शार्क असा आहे का? आणि काय आहे त्याची जीवन पद्धती, हे जाणून घेऊया.
शार्कच्या प्रजाती आणि इतिहास :
शार्क हा प्राणी जगातल्या कॉर्डेटा या वर्गात मोडतो. सस्तन असूनही तो जलचर आहे. ४२० मिलियन वर्षांपासून त्यांचे अस्तित्व समुद्रात असल्याचे आढळून आले आहे. ते समुद्रात २००० ते ६०००मीटर पर्यंत आढळतात. शार्क नदीच्या पाण्यात राहत नाही.१७ सेंटिमीटर पासून १२ मीटर पर्यंत (६.७ इंच पासून ४० फूट पर्यंत) त्यांच्या ५०० जाती आहेत. त्यापैकी ठळक जाती म्हणजे हॅमरहेड शार्क, टायगर शार्क, ग्रेट व्हाईट शार्क, व्हेल शार्क हे मुख्य भक्षक (अपेक्स प्रिडेटर) समजले जातात. त्या प्रकारांमध्ये शायनी डॉगफिश सुद्धा असतात. त्यांना श्वसनासाठी ५ ते ७ गिल्स (फटी) असतात आणि त्यांच्या हृदयाला २ कप्पे असतात. मुख्यत: बरेच शार्क मासे थंड रक्ताचे असतात, पण त्यांत काही जाती अशा आहेत, ज्या गरम रक्ताच्या सुद्धा असतात.
शार्कचे दात भक्ष बाहेर पडू नये म्हणून आत मध्ये वळलेले असतात. एका वर्षांत त्यांचे जवळ जवळ ३०,००० ते ५०००० दात पडून परत उगवतात. शार्कच्या पापण्या फडफडू शकत नाही त्यामुळे तो रात्री पण बघू शकतो, पण हिरव्या रंगासाठी तो कलरब्लाइंड आहे. विद्युत चुंबकीय फिल्डला संवेदनशील असल्यामुळे तो भक्ष्याचा मागोवा घेऊ शकतो. त्याच्या शेपटीचा विशिष्ट आकार प्रवेगासाठी उपयोगाला येतो. साधारणतः शार्कचे आयुष्य २० ते ३० वर्षांचे असते. पण स्पाईनी शार्क १०० ते २०० वर्ष जागल्याची ऐकिवात आहे. १६.५ फूट शार्क ३९२ वर्ष सुद्धा जगलेला आहे.
हवाई बेटावर पौराणिक कथांमध्ये शार्कमॅनची कथा आहे, आणि कामोहोआली-शार्कगॉड असे म्हणत होते. शार्क हा चित्रपट निर्मात्यांचा खूप आवडीचा विषय आहे. पण त्या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे नरभक्षक नसतो; तो फक्त धातु किंवा धातुचे अलंकार, आणि रक्त यांच्याकडे आकर्षित होतो, म्हणून तो हल्ला करू शकतो.
पुनरुत्पादन :
काही शार्क अंडी घालतात, आणि काही शार्क पिल्लांना जन्म देतात. शार्क मीलनासाठी हजारो मैल सुद्धा प्रवास करू शकतात. त्यांचा वेग १५ ते ३०की.मी/तास असतो. त्यांच्या अंड्यांना एक प्रकारच्या चामड्याचे संरक्षण असते. परंतु अंड्यातून पहिले आलेले पिल्लू इतर अंडी खाऊ शकते; त्यामुळे त्यांचे पुनरुत्पादनाचे प्रमाण कमी असते. अंडी उबविण्यासाठी १८ ते २४ महिने लागतात.
खाणे :
शार्कला खूप मोठ्या प्रमाणावर कुकीज कटर सारखे दात असतात आणि ते एंजल शार्क, वोब्बेगॉन्ग, स्क्विड, इतर छोटे मासे आणि कवचधारी प्राणी (खेकडे वगैरे) खातात.
शार्क माश्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होऊ लागल्यामुळे पर्यावरणासाठी हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. त्यामुळे २०१० मध्ये शार्क कॉन्सर्व्हेशन ऍक्ट अस्तित्वात आला आहे. शार्क माश्यांवरती जॉज, डीप ब्ल्यू सी, द रिफ, फाइंडिंग नेमो, बॅटमॅन त मूवी, डायनोशार्क आणि शार्कटोपस अशे सिनेमा निघाले आहेत. पण त्यात दाखवतात, तास शार्क नरभक्षक नसतो. हे कितीतरी पाणबुड्यांनी पाहीले आहे.