Skip to content

Sea Horse Information in Marathi | Sea Horse Mahiti, Info, Name

Sea Horse Marathi Mahiti

Sea Horse Information in Marathi

सी हॉर्स माहिती

घोड्यासारखा चेहरा, सरड्यासारखे वेगवेगळ्या दिशांना पाहणारे डोळे, आणि रंग बदलण्याची किमया ,कांगारू सारखी पोटाची पिशवी आणि गुंडाळलेल्या शेपटीची चकली असा हा जलचर पाहिलाय? सी हॉर्स म्हणजे आपण ह्याला पाणघोडा नाही म्हणू शकत. कारण पाणघोडा म्हणजे हिप्पो आहे. अर्थात समुद्री घोड्याची प्रजाती ही ग्रीक शब्दांप्रमाणे हिप्पोकॅम्पस अशी आहे ज्याचा अर्थ हिप्पो म्हंजे घोडा आणि कॅम्पस म्हणजे समुद्री राक्षस.

सी हॉर्स कुठे आढळतात:

समुद्रीघोडे उष्ण आणि समशीतोष्ण उथळ पाण्यात ते आढळतात. समुद्रातील गवताच्या आडोशाला, प्रवाळांच्या जगतात किंवा दलदलीच्या ठिकाणी ते राहतात. युरोपातील थेम्स एस्टय़ुअरी, उत्तर अमेरिकेपासून खाली दक्षिण अमेरिकेच्या समुद्रांत समुद्रघोडय़ांच्या वसाहती आहेत. त्यांचे आकारही अडीच सेंटीमीटरपासून एक फुटापर्यंत असे विविध असतात. त्याहीपेक्षा मोठे समुद्रघोडे उरुग्वेच्या समुद्रात आढळतात.समुद्रघोडय़ाच्या पन्नास प्रजाती आहेत. समुद्रघोडा हा खरं तर बोनफिश ह्या प्रकारातला मासा आहे. पण माशाप्रमाणे त्यांच्या अंगावर खवले नसतात. कातडीवर झेब्र्यासारखे पट्टे किंवा ठिपके असतात. खवाल्यांच्या ऐवजी त्यांच्या संपूर्ण शरीरावर असलेल्या कडय़ांमध्ये व्यवस्थित असलेल्या हाडांच्या पट्टय़ांतून त्यांची पातळ त्वचा ताणलेली असते. हे समुद्री घोडे नोवा स्कोटीया या समुद्रात आढळतात.

सीहॉर्सच्या प्रजाती :

प्रत्येक प्रजातीच्या समुद्रघोडय़ांच्या अंगावरची कडी वेगवेगळ्या संख्येची असते. समुद्रघोडे वरच्या बाजूने म्हणजे उभे पोहतात. बाकीचे मासे आडवे पोहतात. प्रत्येक समुद्रघोडय़ाच्या डोक्यावर तुरा असतो. मात्र आपल्या हातांच्या ठश्याप्रमाणे प्रत्येकाचा तुरा वेगळा असतो. संरक्षणासाठी किंवा भक्ष्याला कळू नये यासाठी समुद्र घोडा सरड्याप्रमाणे रंग बदलतो. त्या साठी तो रंग कणांना आकुंचन आणी प्रसरण करून आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे रूप बदलतो.

शारीरिक माहीती :

त्यांचे मुख्यत: पांढरा, पिवळा आणि सोनेरी असे रंग आहेत. समुद्रघोडय़ांना माशांप्रमाणे वेगाने आणि चांगल्या त-हेने पोहता येत नाही. त्यांचा वेग अतिशय कमी म्हणजे ५ फुट प्रत्येक तासाला इतका असतो. त्यांचे पाठीवरचे कल्ले त्यांना दिशा वळविण्यासाठी उपयोगात येतात.कदाचित म्हणूनच ते आपल्या घरात, शेपटी शैवाल किंवा पाणवनस्पतीला गुंडाळून आराम करतानाच जास्त दिसतात.त्यांची शेपटी माकडांप्रमाणे कशालाही पकडून शरीराला आधार देते. मात्र ती एकाच दिशेने चकली सारखी वळवता येते .उलट बाजूने कुत्र्यासारखी रिंग बनवता येत नाही. ते भक्ष्याच्या पाठीमागे धावत नाही तर बसून भक्ष्य जवळून जायची वाट पाहत बसतात. त्यांचे तोंड लांब असते. अन्न चोखण्यासाठी त्यांना उपयोग होतो पण त्यात दात नसतात.तसेच त्यांना पोट नसते. त्यामुळे अन्न सरळ खाली घसरते. त्यामुळे त्यांना सारखे खावे लागते. भक्ष्य पकडण्यासाठी आणि धोका ओळखण्यासाठी सरडय़ाप्रमाणे त्यांचे डोळे वेगवेगळ्या दिशांना एकाच वेळी पाहू शकतात. शिंपले, लहान मासे, कवचधारी जलचर आणि प्लँकटन हे या जलचरांचे मुख्य अन्न आहे.

सी हॉर्सच्या इतिहास :

समुद्रघोडय़ांची उत्क्रांती पाइप माशापासून झाली असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तीन कोटी वर्षापूर्वी हा प्राणी अस्तित्वात होता, असे मिळालेल्या जीवाश्मांवरून दिसून येते. समुद्रघोडा पाइप माशापासून उत्क्रांत झाल्याने त्याच्या सरळ शरीराशी समुद्रघोडय़ाच्या शरीराची तुलना शास्त्रज्ञांनी केली. त्यात त्यांना आढळून आलं की, आपल्या उभ्या आकारामुळे लांबचे भक्ष्यदेखील त्याला पकडणं शक्य होतं. शिकार करण्याच्या आणि अन्न खाण्याच्या दृष्टीने समुद्रघोडय़ांचा नाजूक वक्राकार उत्क्रांत झाला आहे.त्यांची शिकार करण्याची पद्धत पण मजेदार आहे. डोक्याच्या निमुळत्या आकारामुळे त्यांच्या हालचालीने पाणी हलत नाही आणि भक्ष्याला तो अगदी जवळ जाईपर्यंत सुगावा लागत नाही.अगदी जवळ गेल्यावर मानेला मजबूत स्नायुंमुळे गर्रकन गोलाकार फिरवून लांब चोच भक्ष्याजवळ आणतो आणि जबडा वासून भक्ष्य गिळतो.

सी हॉर्सच्या प्रजनन :

ह्या एव्हड्याश्या प्राण्याचे खूप शत्रू आहेत. समुद्री मोठे मासे, माणसे, आणि इतर प्राणी हे त्याची शिकार करतात. तसेच त्यांचे आयुष्य फारतर ४ ते ५ वर्षे एव्हडेच असते. म्हणूनच की काय त्यांचे प्रजनन खूप मोठ्या प्रमाणावर होते. ह्या बाबतीत अख्या जगात हा एकाच प्राणी असा आहे जो पुनरुतपत्ती मध्ये मादीच्या वाटेला येणारे सगळे हाल सोसतो. म्हणजे ह्यामध्ये नर गरोदर राहतो आणि पिल्लांना जन्म देतो.स्त्री मुक्तीचे एव्हडे उत्तम उदाहरण जगात कुठेच नाही. समुद्री घोड्यांचे नर मादी जन्मभर एकमेकांना साथ देतात.आणि एकनिष्ठ असतात. ह्या प्राण्यांमध्ये एरवी नर मादीच्या ज्या जबाबदार्या असतात त्या येथे उलट आहेत. म्हणजे नर, मादी सारखा एका जागी बसून असतो. फक्त १ चौरस मीटर पर्यंत फिरतो तर मादी १०० चौरस मीटर पर्यंत फिरते. नर मादी पुनरुत्पादनाच्या वेळी, नर आकर्षक रंगात सजून मादीला खुश करतो. मग ते दोघे जण हातात हात घातल्या सारखे शेपटीत शेपटी गुंडाळून ८ तास नृत्य करतात. त्याला DAWN DANCE म्हणतात. असे एक दोन दिवस होते. मादी दुसरीकडे असते आणि सकाळी गुड मोर्निंग करायला येते. शेवटी ती आपल्या पोटातील जवळ जवळ १५०० अंडी नराच्या “ब्रुड पाऊच” म्हणजे पोटाच्या पिशवीत टाकते .त्याबरोबर थोडे खारे पाणी पण जाते ज्याने अंडी सुरक्षित राहत्तात. ४५ दिवसात अंडी उबतात. नर स्वत: पण अंड्यांना प्रोटीन आणि कॅल्शियम सारखी इतर पौष्टिक द्रव्ये पुरवतो. अंडी उबल्यावर छोती छोटी पिल्ले लगेच पाण्यात सोडली जातात. त्यामुळे एक तर पाण्याच्या लोंढ्यामुळे किंवा शिकारी प्राण्यांमुळे ह्यातील फक्त ४ ते ५ पिल्ले मोठी होतात.म्हणूनच ते पुन्हा पुन्हा अंडी घालतात. आणि नर काळजीपूर्वक बाळंतपण सोसतो.

असा हा वैशिष्ठ्यपूर्ण प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण चीन, इंडोनेशिया, मलेशिया इथे त्याचा औषधांसाठी उपयोग करतात. एक किलो समुद्री घोड्यांची किंमत एक किलो सोन्यापेक्षा जास्त आहे कारण ते नपुंसकता, घरघर,झोपेत अंथरूण ओले करणे आणि बाळंतपण इत्यादी रोगावर औषध म्हणून वापरले जातात. म्हणून हल्ली ते अक़्वेरियम मध्ये पाळले जातात.

Wikipedia Essay, Information of Sea Horse in Marathi Language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *