Sarod Information in Marathi
सरोद माहिती
परिचय / Introduction :
- सरोद असा नाव असणारा हे एक तंतूवाद्य आहे, सितार किंवा इतर तंतुवाद्य प्रमाणे यामध्ये देखील ताणलेल्या तारांच्या माध्यमातून संगीत निर्मिती केली जाते.
- कदाचित या वाद्याचे नाव तुम्ही प्रथमच ऐकत असाल कारण सांगितेतर लोकांमध्ये ही वाद्य तेवढे असे प्रसिद्ध नाही.
- थोडेसे व्हायोलिन सारखे दिसणारे ही वाद्य भारतीय शास्त्रीय संगीतात प्रचलित आहे. वाजवण्यासाठी अत्यंत कठीण आणि आवाहनात्मक असे हे वाद्य आहे.
- उत्तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये जिथे भारतीय शास्त्रीय संगीताची घराणे आहेत तिथे हे वाद्य प्रसिद्ध आहे.
- वाद्य वाजवणाऱ्या वादकाला हे वाद्य आपल्या मांडीवर ठेवून वाजवावे लागते. आणि वाजवताना दोन्ही हातांच्या बोटानी तारांना कौशल्यपूर्ण रीतीने वाजवावे लागते ज्यामुळे त्यातून संगीताची निर्मिती होते.
इतिहास / History :
- सरोद हा शब्द प्राचीन भाषा फारसी मधून घेण्यात आलेला आहे, या शब्दाचा अर्थ गाणे किंवा गीत असा होतो. किंवा अफगणिस्तान मधील सरोदय वरून घेतला गेला आहे असे म्हंटले तर याचा अर्थ सुंदर आवाज किंवा पर्शिअन भाषेमध्ये मेलडी असा होतो.
- अफगाण ‘राबब’ या वाद्यांच्या विकासातून या सरोदची निर्मिती झाली आहे अशी इतिहासामध्ये नोंद आहे. परंतु सरोदच्या नेमकी निर्मितीबाबत अनेक प्रकारचे तर्क केले जातात. तरी साधारण्पणे १६ व्या शतकात हा राबब भारतात आला असावा.
वर्णन / Description :
- संगीतातील विविध घराण्यानुसार त्यांच्या वाद्याची रचना बदलत असते, त्याचप्रमाणे सरोदचे देखील आहे. परंतु पारंपरिक सरोद मध्ये १८ ते २५ एवढ्या तारा असू शकतात. यातील ५ ते ६ तारा या गायनाला चाल देण्यासाठी वापरल्या जातात.
- ध्वनी निर्माण करण्यासाठी किंवा संगीत निर्माण करण्यासाठी तारांना बोटांच्या मदतीने वाजवावे लागत असते, बोटाच्या टोकाच्या मदतीने हे वाजवले जाते.
- सरोद च्या तारा या स्टील किंवा कास्य पासून बनवलेल्या असतात. या व्यतिरिक्त असणारी रचना लाकडापासून बनवलेली असते, ज्यावरती नक्षीदार काम केलेले असू शकते ज्याला वूड पॉलिश ची जोड दिलेली असते. त्याचप्रमाणे यामध्ये एक साऊंड बोर्ड असतो जो प्राण्यांच्या चामडी पासून बनवलेला असतो.
- एका पारंपरिक सरोदची लांबी ही १०० से.मी म्हणजेच ४० इंच एवढी असू शकते तर वजन ३ किलो ते ६ किलो असते. सरोद विविध रंगामध्ये देखील उपलब्ध असते परंतु यामध्ये मिळणारे रंग हे नैसर्गिक लाकडी रंगांशी मिळते जुळते असतात.
सरोद घराणं / Sarod families :
- सरोद वादनामध्ये काही प्रसिद्ध घराणी आहेत, यांनी आपल्या सोयी नुसार पारंपरिक सरोदच्या रचनेमध्ये अनेक बदल केलेले आहेत जसे बुद्धदेव दासगुप्ता हे स्टील पासून बनवलेल्या फिंगर बोर्ड ला पसंती देतात तर अमजद अली खान हे पारंपरिक निकेल पासून बनवलेल्या फिंगर बोर्ड ला पसंती देतात.
- अल्लाउद्दीन खान आणि त्याचा भाऊ अय्यत अली खान यांनी बनवलेला सरोद हा पारंपरिक सरोद पेक्षा काहीसा वेगळा आहे, याचा आकार हा सामान्य सरोद पेक्षा मोठा आहे, यामध्ये २५ तारा आहेत.
- ब्रिज नारायण, राधिका मोहन मैत्र, बुद्धदेव दासगुप्ता, कल्याण मुखर्जी, वसंत राय हे आजपर्यंत प्रसिद्ध सरोद वादकांची नाव आहेत.
Information about Sarod in Marathi – Wikipedia Language
Lessons : Learn Sarod Notations & Notes in Marathi