Sadafuli Information in Marathi
ऍस्टर फ्लॉवर माहिती
Introduction / परिचय :
- सदाफुली हा एक फुलझाडाचा प्रकार आहे आणि नावावरूनच आपण या फुलाचा अंदाज घेऊ शकतो कि वर्षांमध्ये बाराही महिने हे झाड फुललेले असते. साधारणपणे आपल्या जवळपास सर्वत्रच हि झाडे आढळून येतात.
- पांढरी, गुलाबी, जांभळी अत्यंत नाजूक अशी फुले याला असतात, नाजूक यासाठी कि ती उमलल्यानंतर एका दिवसातच कोमेजून जातात.
- सदाफुलीची रोपे अतिशय जलद गतीने वाढतात आणि एका रोपाचे अनेक रोपे तयार होत जातात अशा प्रकारे या झाडाचे जणू एक बेटच निर्माण होत असते. हिचे मूळ स्थान नेमके कोणते याबाबत अनेक तर्क असले तरीदेखील वेस्ट इंडिज हे यांचे मूळ असल्याचे मानले जाते.
- देवाच्या पूजेसाठी या फुलांचा वापर केला जात नाही. संपूर्ण भारतामध्ये आपण हि झाडे बघू शकतो, परंतु याची शेती वगैरे केली जात नाही. बाजारामध्ये या फुलाला काही मागणी नसते.
Description / वर्णन :
- सदाफुली चे झाड हे साधारणपणे २ – ३ फूटांपर्यंत वाढते, याला अनेक दाट फांद्या असतात.
- पानांचा आकार हा साधा लांबुळका असतो, ते काटेरी नसतात, हि पाने गडद हिरव्या रंगाची असून चमकदार असतात. पाने फांदीवर समोरासमोर आणि दाट येत असतात.
- फुलांमध्ये पांढरा, गुलाबी, जांभळा असे रंग असतात, फुलाला ५ चमकदार पाकळ्या असतात आणि त्या अत्यंत नाजूक व मुलायम असतात. हि झाडे साधारणपणे समूहामध्ये वाढलेली आढळून येतात. या झाडाच्या ५ प्रजाती आहेत.
- हि फुले एकटी किंवा २ – ३ च्या गुच्छामध्ये उमलतात. कळीचे फुल होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागतो पण फुलाचे आयुष्य १ दिवसाचे असते.
- बागेमध्ये किंवा घरातील कुंड्यांमध्ये आपण या झाडाची लागवड करू शकतो. या झाडाला सर्व प्रकारची माती उपयुक्त असते. हि फुले झाडावर असतानाच सुशोभनाचे काम करू शकतात, झाडावरून तोडल्यानंतर काही वेळातच हि कोमेजून जातात.
Medicinal properties / औषधी गुणधर्म :
- आपण जरी फक्त सुशोभनाचे झाड म्हणून सदाफुली या झाडाकडे बघत असलो तरीदेखील यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या वनस्पतीचे जवळपास सर्वच भाग कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी आहे.
- फुले, पाने, मूळ या सर्वांमध्येच औषधी गुणधर्म आढळून आलेले आहेत. आयुर्वेदामध्ये तसे वर्णन देखील आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब,कर्करोग, सर्दी अशा सर्वच आजारांवरती सदाफुली गुणकारी आहे.
- वात आणि पित्त अशा दोन्ही प्रवृत्तीसाठी हि फुले उपयोगी पडतात. मानसिक आजारांवर उपचारांमध्ये याचा वापर केला जातो ज्यामुळे मनाला शांती मिळते. रोज सकाळी सदाफुलीच्या २ ते ३ फुलांचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते आणि मधुमेह नियंत्रित ठेवता येतो.
- सदाफुलीच्या पाने, मूळ आणि फुलांचा उपयोग अनिद्रा अशांत चित्त यासाठी केला जातो.
- विषारी कीटक जसे विंचू चावल्यास सदाफुली च्या मुळाच्या सालींचा वापर केला जातो. लठ्ठ[पणा कमी करण्यासाठी रोज ३ पांढरी फुले चावून खावीत असे ८ ते १० दिवस केल्याने वजन कमी करण्यात नक्की फायदा होईल. गांधीलमाशी चावल्यास सदाफुलीच्या पानांचा रस तेथे लावून विष काढले जाते.
- माणसांसाठी सदाफुली गुणकारी असली तरीदेखील जनावरांसाठी ती विषारी असते, जनावरांच्या खाण्यामध्ये सदाफुली आल्याने ते काही काळासाठी अंध होतात.
Thank you for this information ❤️