Sachin Tendulkar Information in Marathi
क्रिकेटचा देव!
- जेव्हा भारतीय क्रिकेटर सचिन तेंडूलकरने वयाच्या सोळाव्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध त्याचा पहिला कसोटी सामना खेळला, तेव्हा जगातील कोणालाही वाटलं नसेल की कुरळ्या केसांचा हा तरुण एकदिवशी ह्या खेळातील एक प्रख्यात व्यक्ति बनेल.
- भारतात, सचिन फक्त एक प्रसिद्ध खेळाडूच नाही, तर तो स्वतःच एक संस्था आहे. त्याचे चाहते त्याला “क्रिकेटचा देव” मानतात.
- तो जगभरात उत्तम क्रिकेटर म्हणून मानला जातो, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर शतके केलेला तो एकमेव खेळाडू आहे.
- क्रिकेटमधील त्याचे अढळ स्थान असूनही, साचिन खूप सरळमार्गी आणि तत्वनिष्ठ स्वभावाचा म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे त्याच्या प्रसिद्धीत अधिक भर पडते.
बालपण आणि लहानपण
- त्याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला जिथे तो चार भावंडामध्ये सर्वात लहान होता, त्याचे वडील रमेश तेंडूलकर मराठी कादंबरीकार आणि आई रजनी विमा कंपनीत कामाला होती. त्याचे नाम त्याच्या वडिलांच्या आवडत्या सचिन देव बर्मन ह्या संगीत संचालकाच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
- लहानपणी तो दांडगट मुलगा होता. भांडणापासून त्याचे दुर्लक्ष करण्याकरीता त्याचा मोठा भाऊ अजित ह्याने त्याला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन आणि रमाकांत आचरेकर प्रशिक्षण देत असलेल्या अकादमीत भरती केले.
- आचरेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला, कारण त्या शाळेला क्रिकेटची चांगली परंपरा होती. तो शाळेत क्रिकेटचा तारा म्हणून चमकला.
- १९८८ मध्ये झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत, सेंट. झेवियर शाळेविरुद्ध, विनोद कांबळी सोबत त्याने ६६४ धावांच्या भागीदारीचा विक्रम केला.
कारकीर्द
- १९८८ मध्ये मुंबईसाठी खेळून आणि पहिल्याच सामन्यात शतक बनवून, त्याच्या प्रथम-श्रेणीच्या कारकिर्दीची सुरवात झाली. त्या हंगामातील तो सर्वोच्च धावा करणारा ठरला.
- प्रथम-श्रेणी सामन्यातील त्याची कामगिरी इतकी उत्तम होती की, त्याच वर्षी त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली. त्याने नोव्हेंबर १९८९ मध्ये, वयाच्या सोळाव्या वर्षी, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
- जरी ह्या मालिकेमध्ये त्याला पुरेशा धावा नाही करता आल्या तरीहि त्याने स्वतःच्या विलक्षण फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
- १९८९ साली त्याने वन-डे क्रिकेट मध्ये सुद्धा सामन्यात पदार्पण केले.
- १९९४ मध्ये ओडीआय सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध फलंदाजीला सुरवात करून त्याने ४९ चेंडूमध्ये 82 धावा केल्या. त्याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची पहिले ओडीआय शतक केले.
- सचिनच्या प्रसिद्ध दौऱ्यापैकी एक म्हणजे १९९८ चा भारताचा शारजा दौरा. त्याच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत शतकामुळे या दौऱ्यातील भारताच्या विजयात सचिनचा महत्वाचा वाटा होता.
- सचिनला दोनदा कर्णधारपदाची संक्षिप्त संधी मिळाली पण दोन्ही वेळा तो अयशस्वी ठरला. १९९६मध्ये तो प्रथम कर्णधार झाला पण संघाच्या वाईट कामगिरीमुळे त्याने १९९७ मध्ये राजीनामा दिला. १९९९मध्ये त्याला पुन्हा कर्णधार बनवले गेले पण परत त्याला यश आले नाही आणि १९९९ मध्ये त्याने राजीनामा दिला.
- २००३ च्या जागतिक क्रिकेट कपमध्ये ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा करून तो उत्तम खेळला आणि भारताला अंतिम फेरीत नेण्यास मदत केली. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना भारतीय संघ हरला. सचिनला ‘मॅन ऑफ द टूरनामेंट’ म्हणून गौरविण्यात आले.
- काही दुखापती आणि कठीण काळातून गेल्यानंतर २००७ मध्ये, ११००० कसोटी धावा पूर्ण करून भारताचा अग्रगण्य धावपटू बनून त्याने त्याचा मान पुन्हा मिळवला.
- २०११ च्या जागतिक कप मध्ये सचिनने उत्तम कामगिरी केली, त्याने दोन शतके पूर्ण करून एकूण ४८२ धावा केल्या. भारतासाठी जागतिक कप जिंकण्याचे त्याचे खूप मोठे स्वप्न पूर्ण झाले.
- जागतिक कप नंतर त्याला वाईट काळातून जावे लागले. नोव्हेंबर २०१३ मध्ये त्याने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला भावपूर्ण निरोप दिला. त्याने शेवटचा सामना त्याच्या शहरात म्हणजे मुंबईत खेळला जो बघण्यासाठी त्याची आई आली होती.
पुरस्कार आणि यश
- त्याच्या नावावर बरेचसे विक्रम आहेत त्यातील काही खालीलप्रमाणे
- ओडीआय मध्ये सर्वप्रथम द्विशतक
- १०० शतके पूर्ण करणारा एकमेव खेळाडू
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांमध्ये मिळून ३०००० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू
- आतापर्यंत २०० कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू.
- सचिन भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे जसे की, १९९७-९८ मध्ये राजीव गांधी खेलरत्न, भारतातील सर्वोच्च खेळ पुरस्कार आणि २०१४ मध्ये भारतरत्न, भारतातील सर्वात लोकप्रिय पुरस्कार. हा पुरस्कार मिळवणारा तो सर्वात पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे.
वैयक्तिक आयुष्य
- १९९० मध्ये तो सर्वप्रथम डॉक्टर अंजलीला भेटला आणि पाच वर्ष एकत्र काळ घालविल्यानंतर १९९५ मध्ये लग्नाची गाठ बांधली. त्याला दोन मुले आहेत, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा.