Robin Information in Marathi
पक्षी सृष्टीतील गंधर्व -रॉबिन उर्फ दयाळ
दयाळ माहिती
- “आला वसंत आला वसंत” असे गोड गळ्याने सगळ्या जगाला गाऊन सांगणारा पक्षी म्हणजे रॉबिन ! अमेरीका खंडात ह्या पक्षाचे खूप कौतुक आहे. आपण गंधर्व म्हणतो तसे तिकडे त्याला स्वर्गीय पक्षी म्हणतात.
- त्याच्या अंड्याच्या रंगावरून निळीला रॉबिन ब्ल्यू म्हणतात. अंडे जरी निळे असले तरी हा पक्षी पूर्ण रंगीबेरंगी आहे. इतका छोटा असला तरी तीन चार रंग दाखवतो.
- त्यामुळे त्याला पाहिल्यावरच वसंताचा भास होतो. आपल्याकडे त्याला वर्षा ऋतुच्या आगमनाचा दूत म्हणतात. अर्थात आपल्याकडचे रॉबिन आणि अमेरिकन रॉबिन वेगळे दिसतात.
रॉबिन निवासस्थान :
- सर्वसामान्यपणे अमेरिकेत जास्त आढळणारा रॉबिन हाच रॉबिन मनाला जातो. म्हणूनच मिशिगन, कनेक्टिकट आणि व्हीस्कॉन्सीन ह्या राज्याचा तो “स्टेट बर्ड” मानला जातो कॅनडाच्या २ रु.च्या नोटेवर पण त्याचे चित्र होते.
- आपल्याकडे जे रॉबिनसारखे गाणारे पक्षी आहेत त्यांना दयाळ किंवा डोमिंगा, चीरक,काळोखी, म्युझीकापिडी वर्गातील पक्षी म्हणून संबोधिले जाते.
- अमेरिकन रॉबिन हा पक्षी वर्गातील ट्युरिडी कुटुंबातील तुर्डूस जातीचा प्राणी आहे.त्याचे बायोलॉजीकल नाव आहे, टुर्डूस मायग्रेटोरीयस .म्हणजे हा स्थलांतर करणारा पक्षी आहे.
- इंडियन रॉबिनचे नाव आहे सॅक्सीकोलॉईडस फुलीकॅटस आणि हा जलपकाद्य कुटुंबातील आहे.
रॉबिन वर्णन:
- हा चिमणीसारखा जरी असला तरी शेंदरी लाल रंगाची छाती आणि शेपटीखाली लाल ठिपका ही त्याची वैशिष्ठ्ये आहेत.
- दुसरे म्हणजे त्यांचे एकसारखे शेपटी हलविणे. ते ओरडताना त्यांची शेपटी इतकी मजेदारपणे हलते की शेपटीने ताल धरला आहे असे वाटते.
- काही रॉबिनची पंखे फिकट राखाडी किंवा उदी रंगाची असतात आणि छाती सोडली तर इतर भागपण राखाडी रंगाचा असतो. मादीच्या छातीचा रंग जरा फिकट असतो. ह्या पक्ष्याची लांबी २३ से. मी ते २८ से.मी असते आणि पंख पसरल्यावर होणारी रुंदी ३१ से.मी ते 41 से.मी असते. वजन अंदाजे सरासरी 77 ग्राम असते. चोच फिकट पिवळी आणि टोकाला गडद असते.
रॉबिन पक्ष्यांचे खाद्य :
- छोटे किडे, आळ्या, गांडुळ, नाकतोडे, आणि कुजलेल्या बेरी बोरे वगैरे खातात. बेरी किंवा बोरे खाल्यानंतर महाशय थोडे झिंगतात पण.
- भक्ष्य शोधताना त्यांना किडे, गांडुळ ह्यांची थोडीशी सुद्धा हालचाल टिपता येते इतकी त्यांची दृष्टी आणि कान तिखट असतात. उन्हाळ्यात जमीन नांगरली की त्यांना खूप किडे मिळतात.
- तसेच फेब्रुवारी ते मार्च में ह्या महिन्यात बेरी सारख्या फळांचा पण हंगाम असतो त्यामुळे त्यांना भरपूर खाद्य मिळते. बागांना पाणी दिले की पण किडे बाहेर येतात त्यामुळे हे पक्षी बागांमध्ये पण राहतात. समुद्रकिनारी छोटे शिंपले, लहान बेडूक असे खाद्य त्यांना मिळते.
गाता राहे मेरा दिल :
- हा पक्षी खूप मधुर गातो आणि त्याच्या सर्व भावना गाण्यातूनच व्यक्त करतो. सर्वात पहाटे उठून मधुर गाणारा हा पहिलाच पक्षी आहे. बेडरूमच्या बाहेर त्याचे मंजुळ गाणे ऐकले की सकाळ सुंदर झाली असे वाटते.
- भारतीय दयाळ हे महाशय झाडाच्या उंच टोकावर बसून विना तिकीट खुल्या रंगमंचावर मैफल जमवतात. मादी आणि नर दोघंही गातात.
- कधी कधी दोन रॉबिन जुगलबंदी पण करतात आणि शेवटी ज्याचा स्वर थकत नाही तो रॉबिन जिंकतो. गाण्यामध्ये वेगेवेगळे प्रकार करतात.
- तसेच जितक्या रॉबिनच्या जाती आहेत तितक्या त्यांच्या गायकीचे प्रकार आहेत. जसे आपल्याकडे किराणा घराणे, जयपूर घराणे आहेत तसे.
- गम्मत म्हणजे हे गाणे ते त्यांची सरहद्द सांभाळण्यासाठी पण असते. कोणी चुकून जरी त्यांच्या क्षेत्रात घुसला तरी एका उंच आवाजात आणि सतत ते ओरडत राहतात.
पुनरुत्पादन :
- ह्या पक्ष्याचा विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असतो. त्यावेळी घरटे करताना ते गातात पण. त्यांचे घरटे काड्या तंतू, गवत, कागदाचे तुकडे, केस पंख इत्यादी ने बनवलेले असते.
- अमेरिकन रॉबिन त्याला मातीने लिंपतो आणि आत मऊ गादीसारखे कुशन करतो. भारतीय रॉबिन पानांना जोडून गवताच्या काड्यांनी वाटीसारखे घरटे करतात. मादी प्रत्येक विणीसाठी वेगळे घरटे करते. त्यांचे घरटे पानांच्या आडोशाला असते.
- रॉबिन मनुष्य वस्तीतील बागांमध्ये पण घरटे करतात. फक्त अट एकच,त्यांच्याजवळ जायचे नाही. अमेरिकन रॉबिन तीन ते पाच निळसर रंगांची अंडी घालतात.
- अंडी 14 दिवसात उबतात. मादी अंडी उबवते. आणि पुढील दोन आठवड्यात पिल्ले बाहेर पडतात. सुरवातीला त्यांना रंगीबेरंगी कोट नसतो आणि डोळे मिटलेले असतात. खूप थोडी पिल्ले जगतात. जगले तर त्यांचे आयुष्य 14 वर्षे असते.
वर्तणूक:
- रॉबिनचे शत्रू म्हणजे साप,मोठे पक्षी, आणि मांजरी. पण त्यांच्या चाहुलीने ते मोठ्या मोठ्याने चित्कारतात त्यामुळे पूर्ण थवा जागरूक होतो.
- रॉबिन १७७कि.मी. वेगाने उडतात. अमेरिकन रॉबिन हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतात. म्हणून त्यांना टुर्डूस मायग्रेटोरीयस म्हणतात. सर्व रॉबिनची खूण म्हणजे शेपटीखाली लाल ठिपका.
- भारतात त्यांचा वेल्व्हेटसारखा मस्त काळा रंग असतो. आणि शेपटी काटकोनात उभी करून तुरूतुरू चालणे मनोहारी दिसते. असे हे छोटे मित्र आपले जीवन आनंदमयी बनवतात.
Information of Robin in Marathi Language / Wikipedia
Related posts
Ostrich Information in Marathi | Shahamrug Bird Mahiti
Turkey Information in Marathi | Bird Turkey Essay | टर्की पक्षी
Humming Bird Information in Marathi | हमिंग बर्ड (गुंजन पक्षी ) माहिती
Phoenix Information in Marathi Language | फिनिक्स Essay, Mahiti, Info
Swan Information in Marathi | Essay on Swan Bird, Nibandh, Mahiti
Kingfisher Information in Marathi, किंगफिशर पक्षाची माहिती