Skip to content

Resignation Letter in Marathi, Rajinama Patra Format, Resign Letter PDF

Rajinama Letter Patra Resign

Application Letter in Marathi

Patra Lekhan : Example 1 – Rajinama Letter in Marathi Language

सौ. माधुरी अनंत देशमुख
२०१ कपिलवस्तू सोसायटी,
म.गांधी रोड,
नगर १.
२६ ऑक्टोबर २०१९.

प्रति,
प्रिन्सिपाल / महाव्यवस्थापक,
शारदा इंजिनियरिंग प्रा.लि.,
म.गांधी रोड,
नगर २.

विषय :- पदाचा राजीनामा

माननीय महाव्यवस्थापक / प्रिन्सिपाल,

मी, सौ. माधुरी अनंत देशमुख, वरिष्ठ लिपिक, व्यथित अंत:कारणाने अर्ज करिते कि, काही घरगुती कारणांमुळे कामावर येणे शक्य होणार नाही. म्हणून मी दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ पासून वरिष्ठ लिपिक ह्या पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या कंपनीच्या नियमांप्रमाणे मी एक महिन्याची नोटीस देत आहे.

गेल्या वीस वर्षात आपण दिलेल्या मदतीने आणि संधीने मी येथे अतिशय चांगला काळ व्यतीत केला आणि माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगती झाली. त्याबद्दल मी आपले आणि माझ्या सहकाऱ्यांचे अगदी मनापासून आभार मानते आणि त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन.

माझ्या जागेवर येणाऱ्या व्यक्तीला माझ्या कामाची माहिती आणि जबाबदाऱ्या समजवून सांगायला माझी मदत होणार असेल तर मला आनंद होईल. नंतरही गरज असेल तर मला बोलावल्यास मी तत्परतेने हजर होईन.

माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास किंवा कोणाचे मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व.

आपली स्नेहांकित

माधुरी देशमुख (सही),
माधुरी अनंत देशमुख.

Sample 2 – Rajinama Letter Format

श्री. माधव अनंत देशमुख
२०१, दिनकर आशिष सोसायटी,
एलबीएस मार्ग,
नगर १.
दि. ११ ऑक्टोबर २०१९.

प्रति,
महाव्यस्थापक,
हेरंब इंजिनियरिंग कं. प्रा.लि.,
एम.आय.डी.सी.,
सातपूर,
नगर २.

विषय :- पदाचा राजीनामा

माननीय महाव्यवस्थापक ,

मी, श्री. माधव अनंत देशमुख, अर्ज करू इच्छितो कि, मी दि. ११ नोव्हेंबर २०१९ पासून माझ्या पर्यवेक्षक ह्या पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या कंपनीच्या नियमांप्रमाणे मी ही एक महिन्याची रीतसर नोटीस देत आहे.

मी गेले वीस वर्षे आपल्या कंपनीत इमाने इतबारे काम करीत आहे. माझ्या कुशलतेची आणि प्रामाणिकपणाची खात्री असून देखील गेली कित्येक वर्षे मला कुठलीही बढती दिली गेली नाही हे मी अत्यंत दुखा:ने कळवीत आहे. माझ्यापेक्षा कनिष्ठ लोकांना विचारात घेतले गेले. गेल्या वर्षी वेतनवाढीसाठी केलेली माझी विनंतीसुद्धा नाकारली गेली. त्यामुळे इच्छा नसतांनाही मी ही कंपनी सोडून जात आहे. मला कुणा बद्दलही आक्षेप नाही तसेच वाईट भावना नाही आहेत.

माझी भविष्य निर्वाह निधी (PF) ची जी काही रकम येणे आहे ती मला लवकरात लवकर द्यावी ही विनंती. तसेच माझ्यानंतर काम करणाऱ्या व्यक्तीला काही मदत हवी असल्यास मी द्यायला तयार आहे.

माझ्याकडून गेल्या वीस वर्षात काही चुका झाल्या असल्यास किंवा कोणाचे मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व.

आपला,
माधव देशमुख (सही)
माधव अनंत देशमुख.

➤➤ Click for more Letters in Marathi!

Naukri Job Resignation Letter Format in Marathi / Few Lines

7 thoughts on “Resignation Letter in Marathi, Rajinama Patra Format, Resign Letter PDF”

  1. 10वर्षे कारखान्यात नोकरी केली पण सोडताना आधी नोटीस पाठवली नाही. कंपनी ने नाव कमी करण्यासाठी नोटीस पाठवले परंतु उत्तर दिले नाहि. ग्राजुटी नाकारत आहेत काय करावे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *