Rahul Gandhi Information in Marathi
राहुल गांधी माहिती
- राहुल गांधी, एका प्रचंड मोठ्या राजकारणी घराण्यातील पाचव्या पिढीतील राजकुमार! युवराज राहुल हा गांधी घराण्याचा तिसरा वंशज.
- आजी इंदिरा गांधी ,वडील राजीव गांधी आजोबा जवाहरलाल नेहरू आणि पणजोबा मोतीलाल नेहरू असे एक् से बढकर एक थोर, देदीप्यमान आणि वादळी व्यक्तिमत्वाच्या घराण्यात जन्म घेतलेला युवराज. पण ह्यांच्यापैकी कोणाचेही गुण अंगी नसलेली सौम्य आणि शांत व्यक्ती आहे.
- त्याच्या मध्ये जवाहरलाल नेहरूंची तडफ नाही, इंदिरा गांधीसारखे प्रभावी वादळी व्यक्तिमत्व नाही. धारदार नाक आणि त्यावर फुलणारा राग पण नाही. हा अगदी आपल्यातला सामान्य माणूस वाटतो. म्हणतात नं मोठ्या झाडांच्या सावलीत लहान झाडे कोमेजून जातात.
- तसे त्यांच्याकडे कोणाचे लक्षच गेले नाही. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधी सर्व कॉंग्रेस जनांच्या आग्रहा खातर पंतप्रधान झाले. त्यांनी सहानुभूतीच्या लाटेबरोबर आपल्या मनमिळाऊ आणि प्रसन्न व्यक्तिमत्वानी लोकांचे मन जिंकले आणि भारताला सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये अग्रणी बनवले.
- पण त्यांचीही हत्या झाली आणि राहुल पोरका झाला. आई सोनिया ह्यांना कॉंग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी लागली आणि राहुलकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले. अशा परिस्थितीत ते कसे वाढले त्यावरून त्यांचे व्यक्तिमत्व बनले.
जन्म आणि शिक्षण
- राहुल गांधी ह्यांचा जन्म १९ जून १९७० ला दिल्ली येथे झाला. ते मोठे आणि बहीण प्रियांका लहान. त्यांचे शालेय शिक्षण सेंट कोलंबिया स्कूल दिल्ली येथे आणि डून स्कूल डेहराडून येथे झाले.
- १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेंव्हा ह्या दोन्ही मुलांच्या जीवाला शीख कट्टर वाद्यांकडून धोका निर्माण झाला आणि त्यांचे पुढील शिक्षण घरून झाले.
- १९९१ मध्ये ते हार्वर्ड युनिवर्सिटीत शिकत असताना राजीव गांधीची पण तमिळ टायगर्स कडून आत्मघातकी बॉम्ब स्फोटात हत्या झाली.
- त्यामुळे सुरक्षिततेसाठी त्यांना नाव बदलून शिक्षण घ्यावे लागले. त्यांनी राउल विन्सी [Raul Vinci] हे नाव घेऊन रोल्लींस कॉलेज अमेरिकेतून बी.ए. केले आणि ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज मधून एम.फील केले.
- लंडन मध्ये नोकरी केल्यानंतर ते मुंबईला एक ओउटसोअर्स कंपनी चे डायरेक्टर झाले.
राजकारण गळ्यात पडले
- २००४ ला ते राजकारणात पडले आणि त्यांनी गांधी घराण्याच्या नेहमीच्या मतदारसंघातून अमेठीतून निवडणूक लढवली. नव्या दमाच्या तरुणाला बघून लोकांनी त्यांना सहज निवडून दिले.
- कॉंग्रेसच्या जुनाट खोडांपेक्षा हा नव्या विचारांचा आणि मोठ्या घराण्यातील युवराज लोकांना आवडला. कार्यकर्ते त्याच्याकडे आशेने पाहू लागले. सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष तर राहुल गांधी जनरल सेक्रेटरी आणि यूथ कॉंग्रेसचे नेते तसेच नॅशनल स्टुडन्टस यूनियन ऑफ इंडियाचे पण नेते झाले.
- काँग्रेसजन त्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहू लागले. लवकरच त्यांना उपाध्यक्षाची जागा मिळाली. त्यांच्यामुळे यूथ कॉंग्रेसच्या सभासदांमध्ये विलक्षण वाढ झाली.
- २००९ मध्येही त्यांनी अमेठीतुंच निवडणूक लढवली आणि जिंकले. सहा आठवड्यात त्यांनी १२५ रॅली काढल्या आणि कॉंग्रेसला उत्तर प्रदेश मध्ये परत स्थान मिळवून दिले.
- २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अमेठीतून स्मृती इराणीला हरवून जागा अबाधित ठेवली. पण शेतकरी आणि मजदूर ह्यांच्या रॅलीत भाग घेतला. त्यावेळी त्यांना तुरुंगवास घडला.
- गांधी घराण्यात थोडे दिवस अज्ञातवासात जायची पद्धत आहे. तेथे राहून ते मन:शांति आणि आरोग्य मिळवून परत जोमाने काम करत्तात.
- तसेच राहुल गांधी पण फेब्रुवारी महिन्यात अज्ञातवासात जाऊन राहिले आणि परत येऊन सक्रिय झाले. त्यांनी मोदी सरकार वर आपले टीकास्त्र सोडले.
- लोकांना भ्रम होऊ नये म्हणून त्यांच्या राजकारणात व परमिट देण्यात घोळ आहे असे म्हंटले. भाजप ने सुद्धा त्यांच्या लहान मुलांसारखे वागण्यावरून त्यांना पप्पू म्हणायला सुरवात केली.
- बऱ्याच वेळा त्यांचे बोलणे भाजपाने पुराव्याशिवाय बोलले असे म्हंटले आणि त्यामुळे त्यांचे हसे व्हायला लागले. एम.फील झालेला माणूस अशी बिना पुराव्यानिशी बोलेल असे वाटत नाही पण राजकारण्यांनी बोलायची एक पद्धत असते, एक प्रोटोकॉल असतो ते राहुल गांधी वापरत नाही.
- ते सामान्यात जेवतात, बोलतात हे शिष्ट राजकारणी लोकांना खटकते. अण्णा हजारेंच्या लोकपाल बिलासाठी असलेल्या उपोषणाच्या वेळी त्यांनी असेच उलट विधान केले की हे बिल कॉन्स्टेट्युशनल बॉडी व्हावे आणि इलेक्शन कमिशन सारखे ते लोकसभेला अकाउंटेबल असावे. आणि ज्यामुळे अण्णा चिडले आणि म्हणाले की राहुल गांधींनी बिल कमजोर आणि असमर्थ केले.
- गरिबी बद्दल देखील ते असेच बोलले की गरिबी हि मनाची अवस्था आहे. त्यामुळे त्यांनी गरीबांची थट्टा केली असे भाजपा ने उठवले.
- असे असले तरी त्यांनी वूमन्स रिझर्वेशन बिल ज्यायोगे बायकांना लोकसभेत ३३% आरक्षण मिळते हे पास झाले.
- नुकत्याच झालेल्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव सदर करतांना त्यांनी प्रथम मोदींना मिठी मारून नंतर जागेवर येऊन डोळा मारून लोकांचा रोष ओढवून घेतला.
- आता जेंव्हा २०१९ च्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि ते आता कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत असे असताना त्याना हे वागणे शोभले नाही असे सर्वजण म्हणत आहेत. पण जर दोन राष्ट्राध्यक्ष मिठी मारू शकतात तर दोन पक्षातील माणसे का नाही असा पण त्यांच्या पाठीराख्यांनी सवाल केला आहे.
- त्यांची कितीही जणांनी थट्टा केली तरी एक गोष्ट ते विसरतात की राहुल गांधी घराण्याचे वारस आहेत आणि अशीच थट्टा इंदिरा गांधींची गुंगी गुडिया म्हणून केली गेली होती पण त्यांनी आपले कर्तुत्व दाखवून दिले तसेच वेळ येताच राहुल पण दाखवतील अशी आशा करूया.