PV Sindhu Information in Marathi
पी. वी. सिंधु मराठी माहिती
- पी. वी. सिंधु. बॅडमिंटन च्या क्षितिजावर एक चमकता तारा. पी. वी. सिंधु .म्हणजे पुसर्ला वेंकट सिंधु ऑलिंपिक मध्ये सिल्वर मेडल मिळवणारी पहिली महिला. वर्ल्ड बॅडमिंटन क्रमवारीत पाचवी .अगदी लहान वयात डेप्युटी कलेक्टर बनणारी.
- अगदी लहान वयात इतके पराक्रम करून दाखवणार्या मुलीला परमेश्वराचा चमत्कारच म्हटले पाहिजे .मागच्या रिओ ऑलिंपिक मध्ये जेव्हा तिने सेमी फायनल पर्यन्त धडक मारली आणि तिला सिल्वर मेडल मिळाले,तेव्हा ती अचानक प्रकाश झोतात आली. सगळ्यांच्या तोंडात तिचेच नाव यायला लागले. पण हे तिने एका रात्रीत चमत्कार करून नाही मिळवले. त्यामागे तिची आठव्या वर्षापासून केलेली साधना होती, मेहनत होती.
- पुसर्ला ५ जुलै १९९५ ल हैदराबादला जन्मली. पुसर्ला चे आई आणि वडील दोघंही वोलीबॉलपटू आहेत. त्यामुळे जन्मापासूनच घरात खेळाचे वातावरण मिळाले. पण तिने मात्र बॅडमिंटन निवडले. अर्थात आई आणि वडील दोघंही शिकलेले आणि समंजस असल्याने तिला पूर्ण मोकळीक होती. तिच्या वडीलांना अर्जुन अवॉर्ड मिळाले होते. प्रथम तिला महबूब आली ह्यांच्याकडे इंडियन रेल्वे इन्स्टीटयूट ऑफ सिग्नल इंजिनियरिंग अँड टेलीकम्यूनीकेशन सिकंदराबाद येथे शिक्षण मिळाले. तिचा आदर्श होता पुलेला गोपीचंद ज्यांनी २००१ मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप मिळवली होती. तिने गोपीचंद ह्यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला. रोज सरावासाठी तेथे येण्यास तिला ५६ किलोमीटर प्रवास करावा लागे. तेही दहाव्या वर्षी. पण तिच्या ह्या कष्टाची गोपीचंद ह्यांनी दाद दिली. त्यांच्या मते तिचा मुख्य गुण म्हणजे “Never-Say-Die-Spirit” आणि खरच दहाव्या वर्षापासून तिने मिळवलेली पदके आणि तिने जिंकलेले सामने बघताना हे जाणवते.
उंच माझा झोका :
- २००९ मध्ये कोलंबोला सब जुनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप मिळवली. २०१० ला इराण फज्र इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज मध्ये सिल्वर मेडल मिळवले. तसेच मेक्सिकोला जुनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये क्वार्टर फायनल पर्यन्त पोहोचली. २०१२ मध्ये आशिया यूथ अंडर 19 मध्ये चॅम्पियनशिप मिळवली. ह्या वेळी तिने जपानी चॅम्पियन नाजोमी ओखुरला नमविले. बॅडमिंटन मध्ये चीन जपान आणि कोरिया ह्यातील महिलांचे वर्चस्व असताना तिने त्यांना सरळ धडक देऊन हरवले. २०१२ ची लंडन च्या ओलिम्पिकची जगत्जेती चीनची Li Xuerui हिचा पराभव केला. २०१३ मध्ये मेडन ग्रँट प्रीक्ष गोल्ड टायटल मिळवले आणि त्याच वर्षी तिला अर्जुन अवॉर्ड पण मिळाले.
- २००८ पासून एकही वर्ष न थकता ती एकावर एक विजय मिळवित गेली आणि पदके मिळवित गेली. तिचा उत्साह, आणि जोश कौतुकास्पद आहे. त्यात तिची जबरदस्त उंची आणि स्ट्रोक वरच्या पकडी मुळे तिच्या पुढे प्रतिस्पर्धी नामोहरम होतात. २०१४ मध्ये तिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप मिळवली आणि हे मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली. २०१५ मध्ये डेन्मार्क ओपन मध्ये ती फायनल पर्यन्त पोहोचली. विशेष म्हणजे त्यात तिने 3 सिडेड खेळाडूंना धूळ चारली. त्या म्हणजे TAI Tzu Ying, Wang Yihan आणि Carolina Marin. पण त्याच वर्षी तिने लागोपाठ तिसर्यांदा मकायु ओपन ग्रँड प्रिक्स जिंकली आणि डेन्मार्कच्या पराभवच वचपा काढला. ह्या लागोपाठच्या यशामुळे तिला पद्मश्री मिळाली.
ऑलिंपिकची वारी आणि मेडल :
- छोट्या मॅच जिंकत ती ऑलिंपिक ला मानांकीत झाली. आणि तिने तिच्यावरचा विश्वास खोटा नाही ठरू दिला. तिने आधी हरवलेल्या सिडेड खेळाडू करोलीना मरीनशी कडवी झुंज दिली. पण ती हरली आणि तिला सिल्वर मेडल मिळाले. तरीही ती एकमेव आणि सर्वात लहान [२१व्या वर्षी] भारतीय होती जिने ऑलिंपिकला सिल्वर मेडल मिळवले. भारताचा झेंडा अखेर ऑलिंपिक मध्ये फडकला. सगळ्या भारतात जल्लोष झाला. त्यासाठी तिला राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड मिळाले.
- आपल्याकडे क्रिकेटला जेव्हडी राज मान्यता आहे तेव्हडी इतर खेळांना नाही असे वाटले तरीही सिंधुच्या ह्या झळझळीत यशाने सरकारला तिला तिच्या यशाचे श्रेय आणि बक्षीस द्यावेच लागले. सिंगल्स मध्ये खेळलेल्या ३२६ मॅच मध्ये तिने २२७ जिंकल्या. म्हणजे ८४.९ % मॅच तिने जिंकल्या. हा स्कोअर तर क्रिकेटचा पण नाही. बर्याच मॅच मध्ये ती सेमी किंवा क्वार्टर फायनल पर्यंत खेळली आहे. नाहीतर इतर खेळांमध्ये आपणाला परदेशात मॅच सुरू झाल्या झाल्या इंडिया आऊट हे वाचावे लागते. त्यामुळे भारताची मान उंचावण्यात नक्कीच तिचे योगदान आहे.
- सिंधुचे एव्हडे घवघवीत यश बघून आंध्र आणि तेलंगण दोन्ही सरकारांनी तिचा मान सन्मान केला. पहिल्या गोल्ड मेडल २०१३ लाच तिला भारत पेट्रोलियम मध्ये नोकरी मिळाली. रिओ ऑलिंपिकच्या यशामुळे तिला डेप्युटी मॅनेजर म्हणून बढती मिळाली. ब्रिजस्टोन ची ती राजदूत झाली. Ficci ने तिला स्पोर्ट्स्पर्सन म्हणून निवडले. २०१४ मध्येच ती “NDTV Indian of the Year” म्हणून निवडली गेली. मकायु मधील चॅम्पियनशिप नंतर तिला बॅडमिंटन असोसिएशन तर्फे १० लाख रूपयांचे पारितोषक मिळाले. मलेशिया मास्टर्स मध्ये जिंकल्याबद्दल तिला ह्याच असोसिएशन ने ५ लाख रुपये बक्षीस दिले.
अभिमान आणि सन्मान :
- तिचे यश इथेच थांबत नाही. २०१६ च्या रियो ऑलिंपिक मध्ये तिने भारताला रौप्य पदक जिंकून दिले. त्याबद्दल तेलंगण सरकारने तिला तब्बल ५ करोड रुपये आणि जमीन खरेदी करण्याची अनुमती दिली. आंध्र प्रदेश सरकार ने तिला ३ करोड बक्षीस, १००० स्क्वेअर यार्ड जमीन खरेदी करण्याची अनुमती आणि डेप्युटी कलेक्टर चे पद सुद्धा प्रदान केले. दिल्ली सरकारने २ करोड रूपयांचे बक्षीसही दिले. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, जिथे ती काम करीत होती, त्यांनी तिला ७५ लाखांचे बक्षीस तर दिलेच; पण असिस्टंट डेप्युटी स्पोर्ट्स मॅनेजरची बढती ही करून दिली. तसेच हरयाणा सरकार, मध्य प्रदेश सरकार, यूथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स मंत्रालय, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि मुकाटू सबेस्टियन नावाच्या अनिवासी भारतीय व्यावसायिक या सर्वांनी तिला प्रत्येकी ५० लाखांची बक्षिसे दिली.
- शेवटी चमत्काराशिवाय नमस्कार नाहीच. पण किती वेळा तिला फायनल प्रांत जाऊन गोल्ड हुकले आहे. न थकता ती खेळते आहे. आपल्या देशात खेळाडूंना नोकरी करून सामने खेळावे लागतात. पण बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ ह्या खेळणं सरावासाठी पूर्ण वेळ दिला गेला पाहिजे. तरच आपण ऑलिंपिक मध्ये सगळी गोल्ड मेडल घेऊन येऊ.कारण तितके कौशल्य निश्चितच आपल्या खेळाडूंमध्ये आहे.
Best information