Pansy Flower Information in Marathi
पॅन्झी – मनाला उल्हसित करणारे बागेतील फुल
ज्यांना बागकामची आवड आहे ,त्यांना बागेत सुवासिक मोगरा, जाई-जुई,पारिजताकाबरोबर रंगीबेरंगी फुले पण लावायला आवडतात.त्यासाठी बोगनवेल,चांदणी, कण्हेर,मधुमालती कृष्णकमळ अशी फुले पण हौसेने लावतात. तसेच आजकाल विलायती फुलांना पण खूप मागणी आहे. त्यामुळे बागेची शोभा वाढविण्यात अॅस्टर,झेंडू, वेल्वेट ,मनी प्लांट, ब्रह्मकमळ,9 टू 5 अशी अनेक उदाहरणे आहेत.त्याच रांगेतील पॅन्झी ह्या अनेक रंगांच्या फुलाला खूप पसंती आहे.
Information of Pansy Flower / पॅन्झीची माहिती :
- खरे तर हे फुल, वायोला ट्रायकलर ह्या रानफुलापासून संकरीत करून बनविलेले आहे.युरोप आणि पश्चिम आशिया ह्या ठिकाणी हि फुले आढळतात.
- यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. स्कॉटलंड ,जर्मन, स्कान्दिनिव्हिया येथे त्याला ‘स्टेप मदर’ सावत्र आई ,इटली मध्ये फ्लामोला [लिटल फ्लेम ] ,फ्रांस मध्ये ह्याचा अर्थ थॉट म्हणजे आठवणी चे चिन्ह,तर सेंट युफ्रेशिया येथे हार्ट – एज म्हणजे आनंदी मन असे म्हंटले जाते.
- कांही त्याला लव्ह इन आयडल म्हणजे कामधंदा न करता फक्त प्रेयसीचे चिंतन करणारा असे म्हंटले जाते.
Shape of Pansy Flower / पॅन्झीचा आकार:
- हि फुले 5 ते 8 से.मी. व्यासाची असून पाकळ्या 5 असतात.
- .तळाशी एक मोठी पाकळी असून दोन पाकळ्य बाजूला असतात आणि सर्वात वरती दोन पाकळ्या एकमेकांवर असतात. याची पाकळी अगदी मखमली तेजस्वी रंगाची असते.
- मध्ये पुकेसर आणि खाली स्त्रीकेसर असते. हे फुल अन्जिओस्पर्म किंगडम मधील, व्होयोलासी कुटुंबातील असून व्ही.ट्रायकलर जातीतील आहे.
- ह्या झाडाची उंची 23 से.मी. असते पण वेलीसारखे हे झाड आजूबाजूला पसरत जाते. ह्याची फुले सुंदर पिवळ्या, पांढऱ्या,जांभळ्या, आणि निळ्या रंगाची असतात.
- ह्या झाडाल वेगवेगळय तपमानाचा सूर्य प्रकाश लागतो आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन. हे बारमाही झाड आहे.पण मूळ झाड वर्षभरात कोमेजते.
History of Pansy Flower / पॅन्झीचा इतिहास:
- ह्याचा इतिहास मोठा मजेशीर आहे. एकोणिसाव्या शतकात इंग्लंड मधील टॅंकरव्हिलेच्या उमरावाच्या मुलीने त्यांच्या थेम्स नदीच्या तीरावर असलेल्या बागेतून माळ्याच्या साथीने व्हायोला ट्रायकलर च्या रोपांची लागवड केली.
- नंतर त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या संकरीत जाती निर्माण केल्या.हे बघून इतर लीकांनी पण स्वत:च्या नर्सरी मध्ये अशाच संकरीत जाती तयार केल्या.
- आणि अशा तऱ्हेने वेगवेगळ्या देशात अनेक बागायतदारांनी तऱ्हेतऱ्हेच्या रंगांची,आकाराची पँझी फुलझाडांची अनेक संकरीत वाणे तयार केली जी सर्वदूर लोकप्रिय झाली.
Types of Pansy Flower / पॅन्झीचे प्रकार:
- आधुनिक बागायतदारांनी विविध तर्हेचे पँझी फुलांचे रंग विकसित केले आहेत ज्यात पिवळा, सोनेरी, भगवा, जांभळा, अंजिरी आणि अती गडद अंजिरी ह्यांचा समावेश होतो. पँझी विशेषत: मोठ्या भडक खुणा दाखवतो. यात जोकर सिरीजला रॉयल होर्टीकल्चर सोसायटीचे अवार्ड फॉर गार्डन मेरीट हे बक्षीस मिळाले.
- अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या वनस्पती कडकडीत उन्हात किंवा साधारण उन्हात आणि निचरा होणाऱ्या मातीत छान वाढतात.
- ही रोपे सबंध वर्षभर टिकणारी असतात. पण सर्वसाधारणपणे वार्षिक किंवा द्वीवार्षिक वाढवली जातात. कारण त्यांची गुडघ्याएव्हडीच वाढ होते.पहिल्या वर्षी ही फुलझाडे फक्त हिरवाई निर्माण करतात.आणि दुसऱ्या वर्षापासून फुले आणि बिया येतात.
- नंतर तो वार्षिक रोपांसारखी मरतात.माणूस निवडकच जातीचीच पैदास करतात. त्यामुळे बरीचशी पँझी पहिल्या वर्षीच बहरतात आणि काही तर पेरल्यापासून 9 महिन्यातच बहरतात.
- पँझीची रोपे 6 च्या संचात मिळतात. आणि बागेमधल्या मातीत लागवड करतात. आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे 9 इंच वाढतात. आणि फुले 2 ते 3 इंच व्यासाची असतात.
- परंतु या आकाराच्या पेक्षा कमी किवा जास्त आकाराची पण असतात.
Pansy Flower in Season / पॅन्झीचे ऋतु:
- पँझी थंडीमध्ये टिकाव धरू शकतात तसेच काही वेळा बर्फ वृष्टीत पण तगून राहतात.
- परंतु जेथे बाराही महिने बर्फच असते तेथे ड्राय विंटर मल्चचे आच्छादन करण्याचा सल्ला देतात.
- उबदार वातावरणात पँझी हिवाळ्यात लावतात आणि त्या हिवाळ्यातच बहरतात. ह्या वातावरणात पँझी पु:बीजाची निमिती करतात आणि पुढच्या मोसमात पुन्हा उगवतात.
- हि फुले उष्ण वातावरणात टिकाव धरू शकत नाही. आणि जास्त तापमानात बहरत नाही.
- उष्ण आणि दमट वातावरणात ही कुजून मरतात. हलका पाऊस, सौम्य ऊन सर्वसाधारण तापमान या वातावरणात अतिशय उत्तम रीतीने वाढतात.
- हवामान आणि पर्जन्यमान ह्यांचा विचार करून आठवड्यातून एकदा भरपूर पाणी लागते. यामुळे त्यांची उत्तम वाढ होते. परंतु पाणी अती जास्त देऊ नये.
- जास्तीत जास्त बहर येण्यासाठी खताच्या प्रकाराप्रमाणे दर 15 दिवसांनी खत घालावे.तसेच नियमित छाटणी केल्याने बहराचा कालावधी लांबतो.
Pests and Diseases on Pansy Flower / पॅन्झीवर येणारे कीड आणि रोग:
- अॅफीड:हि ककंबर मोझाक व्हायरस पसरवणारी कीड काही वेळा पँझीवर उपजीविका करते.
- लीफ स्पॉट: हे पानांवर फंगस इन्फेक्शन होते. याची लक्षणे म्हणजे पानांच्या कडेला काळे डाग पडतात. नंतर पानांवर पंढरी जाळी तयार होते. हे साधारणपणे वसंत ऋतूत थंड आणि ओलसर हवेत होते.
- पँझी दाउती बुरशी: ही एक प्रकारच्या ओर्गानीझम पेरेनोस्पोरा व्हायोले मुळे होतो.यामुळे पानांवर तपकिरी जांभळे डाग पडतात, ज्याभोवती पिवळे वर्तुळ तयार होते. आणि पानांच्या खालच्या बाजुला करड्या रंगाचे उंचवटे तयार होतात. हे रोपाला अशक्त करते किंवा मारून टाकते.
- पाउडरी बुरशी: हा रोग एक किंवा जास्त बुरशींमुळे होतो ह्याची लक्षणे म्हणजे, जांभळी करडी पावडर पानांच्या कडेला आणि खालच्या बाजूंला येते. हे कुबट हवेमुळे होते आणि बुरशी प्रतिबंधक औषधाने अटकाव करता येतो. पण समूळ नष्ट होईलच असे नाही.
- गोगलगाय: या पाने आणि पालवी खाऊन टाकतात.
- स्टेम रॉट किंवा पँझी सिकनेस : हि मातीत तयार झालेली बुरशी असते. आणि निर्जंतुक न केलेल्या ,प्राणिज खतांना धोकादायक असते. रोप कोणत्याही तऱ्हेचे लक्षण न दाखवता बहराच्या मध्येच खाली पडते. पाने आणि पालवी फडफडते. आणि रंग उडालेला दिसतो. फुलांचा रंग उडतो. आणि ती आक्रसतात. रोपाचे खोड हात लावल्यावर मातीपासून तुटते. हे टाळण्यासाठी बुरशी प्रतिबंधक औषधे चेशंत किंवा बेनोमील लागवड करण्यापूर्वी मातीत पसरवतात. रोगट रोपे उपटून जाळून टाकतात.ज्यायोगे हा रोग बाकीच्या रोपांवर पडण्यापासून प्रतिबंध केला जातो.
- ककंबर मोझाक व्हायरस: हा ऑफीड किडीमार्फत संक्रमित होतो. ह्या व्हायरस ची लागण झालेल्या रोपांच्या पानांवर /पालवीवर बारीक पिवळ्या शिरा दिसतात. तसेच वाढ खुंटलेली पाने आणि विसंगत फुले दिसतात. व्हायरस सुस्त असतो .तो संपूर्ण रोपावर परिणाम करतो. पुढच्या लागवडीवर सुद्धा परिणाम करतो. आणि दुसऱ्या जातीच्या वनस्पतीवर याचा फैलाव होतो. याचा प्रतिबंध म्हणजे रोपे खरेदी करतांना ती पूर्ण निरोगी असली पाहिजेत.
Benefits and uses of Pansy Flower / पॅन्झीचे फायदे आणि उपयोग:
- या फुलांचा संबंध पावित्र्य नम्रता लीनता यांच्याशी जोडला जातो. तसेच याचा वापर कला, आणि संस्कृती यांच्याशीही जोडला जातो.
- ह्या फुलांची लोकप्रियता इतकी आहे की फुलांचा राजा गुलाब याच्यापेक्षा ह्याला जास्त मागणी आहे. आणि एव्हडी नावे आहेत जी शोभा,नाजुकपणा मायाळूपणा दर्शवितात.
- ह्याच्याबद्दल अशी गोष्ट सांगतात की ह्या फुलाला खूप छान सुगंध होता पण त्यापायी माणसांनी त्याची इतकी तोड केली की झाडे पण कापली गेली आणि गायींना खायला काही उरले नाही.
- तेंव्हा ह्या फुलाने देवाकडे मागणे मागितले की माझा सुगंध काढून घे. देवाने ऐकले आणि गायी ह्या झाडांना खाऊन परत धष्टपुष्ट झालाय.
- ह्या फुलांच्या पाकळ्य खाता येतात. ह्याचा उल्लेख शेक्सपियर ने सुद्धा त्याच्या काव्यात ‘ज्यूस ऑफ हार्टएज’ केला आहे.
- फुलांमुळे बरेच रोग बरे होतात. ह्या फुलाने सुद्धा त्याच्या अस्तित्वाने कितीतरी जणांना नैराश्यातून परत उभारी दिली असेल.
Information of Pansy Flower in Marathi / Pansy Flower Mahiti Wikipedia
Related posts
Zinnia Flower Information in Marathi, Favourite Flower Essay झिनिया माहिती
Tulip Flower Information in Marathi, ट्युलिप फुलांची माहिती मराठी Wikipedia
Rafflesia Flower Information in Marathi | Rafflesia Flower Essay | रैफ्लेशिया
Gerbera Flower Information in Marathi | जरबेरा फूल माहिती
Hippeastrum Flower Information in Marathi, हिप्पीस्ट्रम फुलाची माहिती मराठी
Daisy Flower Information in Marathi | डेझी फुल माहिती
Dahlia Flower Information in Marathi, डेलिया फुलाची माहिती
Chrysanthemum Flower Information in Marathi, शेवंती फुल माहिती