Palash Tree Information in Marathi
पळस माहिती
- ‘कुठे ही गेले तरी पळसाला पाने तीनच’ ह्या म्हणी बरोबर आपले पळस ह्या वृक्षावर नाते जोडलेले आहे. पुरातन काळापासून पळस आपली साहित्यात, रोजच्या जीवनात आणि आजारावर उपयोगी अशा सर्व बाबतीत पळस आपली जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. होळी हा रंगांचा सॅन आला कि पळसाची फुले आठवतात. भर उन्हाळ्यात रणरणत्या वातावरणात पळस, गुलमोहोर, आणि बोगन वेली आपल्या रंगीबेरंगी फुलांनी आपले मन शांत करतात. खरंच किती चमत्कार आहे नाही ह्या सृष्टीचा?
- पळस हा वनस्पती वर्गातील फॅबेसी [fabaceae] ह्या कुळातील वृक्ष आहे. त्याचे वनस्पती वागतील नाव आहे butea monosperma. भारतात त्याला पळस, काकराचा, ढाक, खाखरो, मुत्तुग इत्यादी नावाने ओळखतात. पळस भारतात कुठेही उगवतो. साधारण १४०० ते १५०० मीटर उंचीवर रेताड जमिनीत उगवतो. पळसाला ४५० ते ४५०० मी.मी. पाऊस वर्षाला पुरतो. हवा समशीतोष्ण लागते. हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील झाड आहे. हे झाड ५ ते १५ फूट उंच वाढते. पाने ४ ते ५ इंच लांब असतात. त्यांना खालच्या बाजूला लव असते. टोकाला गोलसर असतात. फुले फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात येतात. आणि झाडाला लाल भडक मुकुट घातला आहे असे वाटते. म्हणून ह्या झाडाला फ्लेम ट्री किंवा फायर ट्री असेही म्हणतात. होळी ह्याच [मार्च] महिन्यात येते तेंव्हा सेंद्रिय रंगाने ज्यांना होळी खेळायची असते, ते ह्या झाडाची फुले उकळवून त्या रंगाने होळी खेळतात. झाड सरळसोट वाढते. ह्या झाडाला चीक येतो त्याचा कमरकास हा औषधी डिंक निघतो.
- बहुतेक सर्व झाडांप्रमाणे हे झाड पण मानवाला सर्वार्थाने उपयोगी पडते. ह्याचे औषधी गुण धर्म खूप आहेत. डिंक कमरेच्या दुखण्यावरती स्त्रियांना उपयोगी पडते. ह्या झाडाच्या मुलांमध्ये खोडांमध्ये आणि पाने व बिया ह्या मध्ये ग्लुकोसाईड, पळसोनीन, प्रोटेओलीटीक आणि लैपॉलिटिक एंझाइमीन बुटरिन आणि इसोबट्रीन ही तत्व सापडतात. त्यामुळे बऱ्याचश्या औषधांमध्ये ह्याचा उपयोग होतो.
पळसाचे औषधी उपयोग :
- पळसाच्या बिया औषधी असतात. त्या जंतूंनाशक, कृमिनाशक आणि सारक असतात. तसेच त्याच्या बियांचे चूर्ण संधिवाताच्या वेदनेवर लाभदायक असते. विषारी प्राण्याच्या दंशावर चूर्ण दुधातून लावल्यास वेदना कमी होतात. नारू झालेल्या ठिकाणी लावल्यास नारूचे जंतु मरून जातात.
- पळसाचे मूळ पण औषधी आहे. त्याचा अर्क डोळ्यांच्या रोगावर मोतीबिंदू इत्यादि वर उपाय करतो. ताज्या मुळांचा अर्क आणि नगर वेली बरोबर घेतल्यास भूक वाढते. फुलांचे पोटीस बांधल्यास सूज उतरते. किडनी स्टोन फुलांच्या काढयाने बरा होतो. ह्या झाडाचा गोंद कमर कस म्हणतात. त्यामुळे कमरेचे दुखणे कमी होते.
पळसाचे व्यापारी उपयोग :
- झाडाच्या गोंदाला चांगला भाव मिळतो. फुले होळीला विकली जातात. लाकूड टिंबर म्हणून वापरतात. पळसाची पाने पत्रावळींसाठी वापरतात. त्यामुळे समारंभात, लग्नकार्यात त्यांचा खूप उपयोग होतो. म्हणून पानांना खूप मागणी आहे.
- पळसाचे आपल्या जीवनात व साहित्यात स्थान आहे. रविंद्रनाथ टागोर ह्यांनी पण त्यावर कविता केली आहे. झारखंड चे ते राज्य वृक्ष आहे. पश्चिम बंगाल येथे प्लासी ह्या वरून ह्या झाडाला पळस असे नाव पडले असे मानतात. तथापि पळस हा वृक्ष पुरातन काळापासून आपल्या उपयोगात येत आहे हे ही तितकेच खरे.
Uses of Palash Tree in Marathi Language / Flower Meaning
Related posts
Nilgiri Tree Information in Marathi, Medicinal Plants Information Eucalyptus
Babul Tree Information in Marathi | बाभूळ झाडाचे उपयोग व फायदे
Coconut Tree Information in Marathi | नारळाच्या झाडाची माहिती
Biogas Information in Marathi | गोबर गॅस प्लान्टची माहिती
Gulvel Benefits in Marathi | Giloy Plant Meaning | गुळवेल वनस्पती माहिती