Skip to content

Octopus Information in Marathi Language | ऑक्टोपस | Essay, Mahiti

Octopus Marathi Mahiti

Octopus Information in Marathi

ऑक्टोपस समुद्री कबंध

तुम्हाला रामायणातील कबंध राक्षस माहित आहे? त्याला फक्त धड आणि लांबच लांब पसरले जाणारे हात होते. त्याला रामाने मारून मुक्ती दिली होती. असाच दिसणारा एक प्राणी समुद्रात आहे त्याचे नाव ऑक्टपस.

पालथ्या घमेल्या सारखे डोके, त्यावर दोन बटबटीत डोळे आणि खालून वळवळणारे आठ पाय असा त्याचा थाट आहे. आणि पोहायला लागला की घमेले पुढे आणि मागे वळवळ करणाऱ्या पायांचा पिसारा असतो. असे वाटते की, ‘पायरेट्स ऑफ कारीबियान’ ह्या सिनेमातील चाच्यांच्या कप्तानाच्या मिशीच्या बाजूने वळवळणारे टेंटॅकल्स (tentacles) हे ऑक्टोपस ह्या प्राण्यांकडूनच कल्पना घेऊन बनविले असावेत.

परिचय :

  • आपल्याला हा प्राणी ज्यांनी नॅट जिओग्राफिक (NAT GEO) चॅनेल पहिले असेल त्यानाच किंवा ज्यांनी पॉल नावाच्या जर्मनीतील ऑक्टोपसचे कारनामे ऐकले तेंव्हा माहित झाला असेल.
  • हा पॉल फुटबॉल च्या वर्ल्ड कप च्या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल हे भविष्य सांगत होता. त्याला खाण्यास दिलेल्या भांड्यातील खाणे खायचा त्या भांड्यावर ज्या देशाचा झेंडा असेल तो देश जिंकायचा.
  • कारण हा प्राणी अत्यंत बुद्धिमान आहे. किंबहुना सर्व अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये तो सर्वात बुद्धिमान आहे असे म्हणता येईल. पॉल २०१० मध्ये मरण पावला.
  • ऑक्टोपस हा मोल्युस्का प्राणी असून ऑर्डर ‘ऑक्तोपोडा’ आणि वर्ग ‘सिफालोपोडा’ आहे. सिफालोफोडा ह्या ­वर्गातील प्राण्यांचे वैशिष्ठ्य म्हणजे हे बायलाटारली सिमित्रीकल म्हणजे मध्ये एक रेषा आखली तर डावी आणि उजवी बाजू तंतोतंत सारखी असते.

शरीर रचना :

  • ऑक्टोपसचे डोके आणि पाय लंबवर्तुळाकार आकाराच्या घमेल्याला जोडलेले असतात. मेंदू आणि तोंड हे डोक्याचे भाग असतात. पाय मउ असतात पण त्यांची पकड घट्ट असते – त्यांना आर्म (arm) म्हणतात.
  • आर्म हे तोंडाभोवती असतात आणि एकमेकांशी तळाला जाळीसारख्या रचनेने जोडलेले असतात. ह्यांचे चार जोड असतात आणि शेवटचे दोन जोड समुद्राच्या पृष्ठभागावर चालण्यासाठी असतात. म्हणून काही जीवशास्त्रज्ञ ह्याचा उल्लेख सहा हात आणि दोन पायाचा प्राणी असा करतात.
  • ऑक्टोपसचे शरीर लवचिक असल्याने ते फटीत घुसून जीव वाचवतात. कंदाच्या आकाराचे आणि पोकळ असे आवरण डोक्याच्या मागे जोडलेले असते.
  • ते कुबडासारखे दिसते म्हणून त्याला व्हीसेरल हंप म्हणतात. ह्यात सर्व महत्वाची इंद्रिये असतात. आवरणाला स्नायूंच्या भिंती असतात आणि आत गिल्स असतात. आणि हे बाहेरच्या भागाला फनेलने जोडलेले असते.
  • आतल्या भागाला मुख असते आणि अणकुचीदार चोच असते. ऑक्टोपसची बाह्यत्वचा श्लेष्मल पेशी आणि संदेशवाहक पेशींनी बनलेली असते.
  • एक जोडणारी पातळ त्वचा जी पांढऱ्या संयोजक पेशीतील प्रथिन घटक तंतूंनी आणि इतर तंतूंनी बनलेली असते ज्यामुळे ऑक्टोपसला रंग बदलता येतो.
  • ऑक्टोपस कितीही मोठा असला तरी स्नायूंच्या लवचिकपणामुळे तो कसाही वळू शकतो. आकुंचन पावू शकतो आणि कुठल्याही दिशेला वळू शकतो.
  • आर्म्सवर वाडग्यासारखे शोषक असतात. हे जाड स्नायूंचे बनलेले असतात. त्याच्या बाहेरचा भाग फानेल्च्या आकाराचा असतो आणि आत उथळ खळगी असते.
  • जेंव्हा शोषक पृष्ठभागाला चिकटतो, तेंव्हा दोन भागांतील छिद्र बंद होते आणि फानेल्च्या आकाराचा मार्ग चिकटतो आणि उखलीची खळगी मोकळी राहते. आणि स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण विलय किंवा जोडणे या क्रिया करता येतात.
  • ऑक्टोपसचे डोळे बटबटीत असून डोक्याच्या वर असतात. त्यांची रचना माश्यांच्या डोळ्यांसारखी असते. आणि ते कुर्चाच्या वेष्टनात असते. ते बाह्यपटलाने सांधलेले असतात.
  • कोर्निया अर्धपारदर्शक बाह्यत्वचेच्या थरापासून बनलेला असतो. आणि चीरेच्या आकाराची बाहुली असते. बुब्बुळामध्ये एक छिद्र तयार करते. बाहुली आवश्यकतेनुसार आकार बदलते.
  • ऑक्टोपसचे रक्त निळे असून रक्ताभिसरण बंदिस्त असते. त्याला 3 हृदये असतात – एक सिस्तीमिक हृदय जे संपूर्ण शरीरात रक्त फिरवते.आणि दोन ब्रोंकोयल हृदये जी दोन्ही गील्स्मधून रक्त फिरवतात.
  • जेंव्हा ऑक्टोपस पोहत असतो तेंव्हा सिस्तीमिक हृदय निष्क्रिय असते म्हणून ऑक्टोपस लवकर थकतो. आणि सरकत हालचाल करतो.
  • ऑक्टोपसच्या रक्तात कॉपरने समृद्ध प्रथिने असतात त्यांना हिमोसायनीन (hemocyanin)मध्ये जाते म्हणतात. थंडीमध्ये ऑक्सिजन कमी असतांना हेमोसायानीन हेमोग्लोबिन पेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजन पेशींना पुरवितो. हे द्रव्य प्लाझमामध्ये विरघळते म्हणून त्याच्या रक्ताला निळसर रंग येतो.
  • ऑक्टोपस एका छिद्रावाटे जाळीच्या पोकळीत पाणी खेचतो आणि गील्स्वरून जाऊन ते सायफनवाटे बाहेर फवारतो. गिल्स पाण्यातला ऑक्सिजन शोषून घेतात.
  • ऑक्टोपस इतर जलचरंप्रमाणे पातळ त्वचेने पण श्वसन करतो. विश्रांतीच्या वेळी एकूण गरजेच्या ४१% ऑक्सिजन त्वचेने शोषून घेतो.
  • ऑक्टोपसला रेड्युला नावाचे काटेरी स्नायूंचे जीभेसारखे इंद्रिय असते ज्यावर बारीक दातांच्या अनेक रांगा असतात. त्याने अन्न बारीक करून अन्ननलिकेत ढकलले जाते.
  • तेथून आतड्यासारख्या मार्गात जे जाळीच्या पोकळीच्या वरच्या भागातून अगणित पडद्यांच्या सहाय्याने लोंबत असतात. पचनाचा मार्ग क्राप ने बनलेला असतो ज्यात अन्न साठवले जाते.
  • पुढे पोटात जाऊन ते घुसळले जाते. पुढे कॅकम (एक थैली) मध्ये जाते ज्यात द्रव पदार्थ आणि बारीक कण वेगळे केले जातात. पुढे पचन ग्रंथी मध्ये लिव्हर पेशी द्रव पदार्थाचे विघटन आणि शोषण होते. आणि उरलेला मळ आतड्यातून मळामध्ये काही द्रव स्त्रवतात आणि फनेल मधून रेक्तम द्वारा बाहेर फेकला जातो. ऑक्टोपस मोठा खेकडा पण आरामात पचवू शकतो.
  • ऑक्टोपसला ९ मेंदू (brain) असतात. त्याचा मेंदू ते शरीरवजन प्रमाण सगळ्यात जास्त असतो. त्याची मज्जासंस्था अत्यंत गुंतागुंतीची असते. जी कुर्चामय लहान वेष्टनात असते.
  • ऑक्टोपसच्या एकूण न्युरोन पैकी 2/3 न्युरोंस त्याच्या आर्म्समधल्या नर्व्ह कॉर्डस मध्ये असतात. ज्यामुळे त्याला मेंदूकडून कोणत्याही संदेशाशिवाय तर्हेतर्हेच्या गुंतागुंतीच्या रिफ्लेक्स अॅक्शन करता येतात.
  • ऑक्टोपसला स्पर्शाने वस्तूंचे बरोबर ज्ञान होते. त्यामुळे त्याचे टेंटॅकलस् एकमेकात गुंतत नाही. त्याला बरोबर कळते की हे आपलेच अवयव आहेत. त्याला सगळ्या भावना पण असतात उदा. आनंद, राग, भीती, एव्हडेच नव्हे तर मत्सर, अपराधीपणाची भावना, लज्जा.

पुनरुत्पादन (REPRODUCTION) :

  • ऑक्टोपसचे पुरुत्पादन हि एक विशिष्ट गोष्ट आहे. ऑक्टोपस अल्पजीवी प्राणी आहे. तो पटकन मोठा होतो पुनरुत्पादन करतो आणि लगेच मरतो.
  • नर हेतेरोकोतीलीस नावाच्या विशेष आर्म ने मादीमध्ये शुक्रजंतू सोडतो आणि लगेच मरतो. मादी ते साठवते आणि मग अंड्यांमध्ये फलन होऊन त्यांचे 5 महिने सांभाळते त्या काळात ती काही खात नाही आणि फलन झाल्यावर त्या असंख्य ऑक्टोपसना पाण्यात सोडून ती पण मरते.
  • ग्रेट पॅसिफीक जायंट ऑक्टोपस हा 4 वर्षे जगू शकतो. जायंट पासिफिक ऑक्टोपस ची मादी एका स्ट्रिंग वर अंडे चिकटवून त्यांचे रक्षण करते. एका वेळी 10,000 ते 70,000 अंडी असतात. अंडी पूर्ण ऑक्टोपस मधेच फलित पावतात. ते कोपेपोड अर्थोपोड अळ्यांवर जगतात. आणि मोठे होतात.
  • ऑक्टोपस हा एकलकोंडा प्राणी असतो. पण पासिफिक ऑक्टोपस हे 40 च्या कळापानी राहतात. ते पोवळ्यांचे जाळे आणि काहीं भरतीच्या सीमारेषेवर राहतात.
  • ऑक्टोपस भूतलावर डायनासोर पेक्षा जुन्या काळातील आहेत.
  • नॉर्वे मध्ये त्यांना समुद्री राक्षस म्हणजे क्रकेन म्हणतात. आयाणु देशात अक्कोरोकामुल आणि प्राचीन ग्रीस मध्ये गोर्गन म्हणतात.
  • व्हिक्टर ह्युगो च्या टेलर्स ऑफ द सी कादंबरीत ऑक्टोपसशी लढाई दाखवली आहे. पण ऑक्टोपस आक्रमक नाही. इयान फ्लेमिंगच्या बॉन्डपटाचे नाव ऑक्टोपसी होते.
  • मेडीतेरानियान आणि आशियाई देशात समुद्र काठचे लोक ऑक्तोपासला मिष्टान्न म्हणून खातात. अर्थात माणूस समुद्रातील सर्व जीवांचा भक्षक आहेच त्यातून बिचारे ऑक्टोपस तरी कसे सुटतील?

Information of Octopus in Marathi / Octopus Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *