Nilgiri Tree Information in Marathi
नीलगिरी माहिती
- जेव्हा भारतात आणि सर्व जगात डेंगू आणि चिकन गुनिया यांनी कहर केला होता तेव्हा सगळ्यांना नीलगिरीच्या तेलाचे महत्त्व कळले. हे तेल अत्यंत रोग प्रतिकारक आहे. पूर्वीपासून याचा उपयोग मलेरिया वर उपचार करण्यासाठी होत होता. नीलगिरी हे झाड वनस्पती शास्त्रात अंजियोस्पर्म या वर्गात मोडते. याचे कूळ मिर्टेसी आहे. हे उष्ण कटिबंधातील वाढणारे झाड आहे. तरीही पण ते डोंगर माथ्यावर जास्ती उगवते.
- झाड सरळ, उंच आणि लांबट पानांचे सदा हरित वृक्ष आहे. याची उंची साधारणतः ३३ फुट / १० मीटर असते. मुख्यत: हा ऑस्ट्रेलिया किंवा ट्यूनिशिया इथला वृक्ष आहे. ही झाडे जास्तीत जास्त ऑस्ट्रेलिया मध्येच पाहायला मिळतात. हे झाड उणे ५ ते ४७ डिग्री सेल्सियास पर्यंत तपमान सहन करू शकते. हे झाड कमी पावसात पण उगवते. या झाडाला खोल, जिरायती आणि ओलसर जमीन लागते. ब्रिटिशनी १८४३ मध्ये या झाडाची लागवड नीलगिरी पर्वतावर केली. म्हणून त्याला नीलगिरी असे म्हणतात.
नीलगिरीचे उपयोग :
- मुख्यत: सर्दी, पडसे किंवा जंतु नाशक म्हणून या झाडाच्या पानांच्या तेलाचा उपयोग होतो. याच्या पानांपासून जे तेल काढतात ते चटकन उडून जाणारे असते. सामान्य सर्दी झाली तरी किंवा खोकला आणि घसा दुखणे यावर या तेलाचा जालीम उपाय होतो. सायनस आणि अलर्जी यावर पण या तेलाचा उपयोग होतो.
- याचे लाकूड जहाज, इमारतीचे खांब आणि स्वस्त फर्निचरच्या बनविण्यास उपयोगात येते. या झाडाचे साल कागद बनवायला आणि कातडे कमावण्याच्या कारखान्यात कामास येते.
- या झाडाबद्दल एक विशेष असे सांगतात की हे झाड जमिनीतील खोलवर असलेले सोने शोषून घेऊन ते पानांच्या वाटे बाहेर टाकते. त्यामुळे या झाडाच्या पानांवर सोन्याचे कान सापडण्याची शक्यता असते. तरीही तिथे खाली सोन्याची खाण आहे असे ठरवता येत नाही. या झाडामुळे जमिनीची सुपीकता कमी होते असा समाज आहे. म्हणून ही झाडे लावण्यावर कर्नाटक सरकारने बंदी घालण्याचा विचार केला असे कळते.
- तरीही हे झाड त्याच्या औषधी गुणांमुळे महत्त्वाचे आहेच.
Nilgiri / Eucalyptus Information in Marathi Language
Medicinal Plants in Marathi Uses & Benefits
Related posts
Babul Tree Information in Marathi | बाभूळ झाडाचे उपयोग व फायदे
Coconut Tree Information in Marathi | नारळाच्या झाडाची माहिती
Biogas Information in Marathi | गोबर गॅस प्लान्टची माहिती
Palash Tree Information in Marathi | Meaning Essay, Benefits & Uses
Gulvel Benefits in Marathi | Giloy Plant Meaning | गुळवेल वनस्पती माहिती
Nice information about the medicine plant and there benefits
मला अश्वगंधा या औषधी वनस्पती बद्द्ल संपुर्ण माहिती मिळेल काय। कारण मला या वनस्पतीची शेती करायची आहे।
We want to purchase nilgiri plants for five acres plantation pleaase give us details of plants and price