Morning Glory Information in Marathi
मॉर्निंग ग्लोरी – प्रेमाचे प्रतिक
मॉर्निंग ग्लोरी, बागेतील विविध रंगाच्या फुलांनी आणि हृदयाच्या आकाराच्या पानांनी नटलेली वेल.सकाळी सूर्याच्या कोवळ्या उन्हात घंटेच्या आकाराच्या फुलांची नागमोडी कळी हळूहळू फुलवत फुलपाखरे आणि हमिंग बर्डस यांना आकर्षित करून त्यांना मध आणि जगाला सुवास देऊन दुपारपर्यंत आयुष्याची इतिकर्तव्यता संपवून शांतपणे कोमेजणारे फुल. हिची वेल एकदा लावली की सर्व जागा व्यापून रंगीबिरंगी फुलांचा गालीचा अंथरते.हि वेल प्रेम आणि त्याची क्षणभंगुरता दर्शविते.चीन मध्ये प्रेमिकांना एकच दिवस भेटण्याचा म्हणून म्हणतात. तसेच हि सप्टेंबर मध्ये फुलते म्हणून शाळेला चला असे सुचवते.(पाश्चिमात्य देशात शाळा सप्टेंबर मध्ये सुरु होतात.)आणि 11 वा लग्नाचा वाढदिवस म्हणून पण दर्शविला जातो. हि वेल घरावर चढली तर हिच्यामुळे घरातील वातावरण थंड राहते.
Information of Morning Glory / मॉर्निंग ग्लोरीची माहिती :
- Ipomoea (batata)ह्या जातीपासून रताळी हे अमेरिकेतील सर्वात जास्त खाल्ले जाणारे अन्न मिळते. ती फुले पर्पल रंगांची असतात.
- ह्या वेलीची फुले, मुळ्या आणि बिया ह्यांचा फार पूर्वीपासून उपयोग केला जात होता. हि वेल प्लांट किंगडमच्या कन्व्हल्व्हुलेसी कुटुंबातील अर्गुरा,अस्त्रीपोमी, कॅतैस्तेजीया, कॅन्व्होव्हुलास ,इपोमिया, लेपिस्तेमोम,ओपार्क्युलीना, रीव्हिया, स्तीक्तोकार्डिया ह्या जातीतील आहेत.
- हि वेल दंव न पडणाऱ्या जमिनीत बारमाही असते आणि थंड हवामानात वर्षायु किंवा वार्षिक असते. हि मुळची जपान आणि मेक्सिकोची आहे आणि हि कोरड्या जमिनीत, दुष्काळात पण तग धरून राहते.
- पावसाळ्याचा पाऊस हिला पुरतो किंवा आठवड्यातून एकदा पाणी घातले तरी चालते. आणि सूर्यप्रकाश दिवसभर लागतो.
- ह्या वेलीला जोरात वारा सहन होत नाही आणि खूप पाणी टाकले तरी चालत नाही. शक्यतो जिराईत जमीन बरी असते.
- हिची मुळे 20 फुटापर्यंत जमिनीत जातात आणि जामिनावर पसरत जातात. त्यामुळे हि भराभर वाढत जाते. त्याच बरोबर ती इतर झाडांना पण मारते.
- वेगवेगळ्या रंगात ह्या वेली येतात. त्या म्हणजे गुलाबी, पर्पल, माग्नेतो,आणि पांढरा ह्या रंगांची फुले असलेल्या वेली.
- जरी हि दिवसाच फुलणारी असली तरी मूनफ्लॉवर म्हणून रात्री फुलणारी मॉर्निंग ग्लोरी ह्याच वर्गात मोडते. हिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि जाळली तर आतषबाजीसारखे तारे पसरवितात.
- ह्या वेलीच्या पाश्चिमात्य देशात सनस्पॉट, हेवनली ब्लू, मूनफ्लॉवर, सायप्रस, कार्डीनल क्लायंबर अशा जाती आहेत.
Shape of Morning Glory / मॉर्निंग ग्लोरीचा आकार:
- ह्या वेलीच्या बिया खूप जड कवचाच्या असतात. जर हि वेल अंगणात किंवा घराबाहेर लावायची असेल तर त्या बिया आधी थोड्या ठेचायच्या आणि 12 ते 24 तास पाण्यात भिजवून मग लावायच्या.
- ह्या वेलीची रोपे बायोडीग्रडेबल पिशवीत लाऊन मग रोप जमिनीत लावावे लागते कारण ह्या वेलीला एका जमिनीतून काढून दुसऱ्या जमिनीत लावले तर ती वेल मरते.
- जर हि वेल भरपूर माजली आणि काढून टाकायची असेल तर नुसती कापून उपयोग होत नाही.त्यासाठी ग्लायफोस्फेट-2 वापरावे लागते. हिचे पुनरुत्पादन हमिंग बर्डच्या पराग वहनाने होते.
- हिच्या घंटेसारख्या आकर्षक रंगांच्या आणि सुंदर वासांच्या फुलाकडे पक्षी आकर्षित होतात.
- हमिंग बर्डला विशेषत: फुलाच्या आकाराचा मध गोळा करण्यास फायदा होतो. त्यामुळे ह्या पक्षाची पहिली पसंती ह्याच वेलीला आहे. विशेषत: इपोमिया नील, स्कार्लेट-ओ-हारा हि हमिंग बर्डची आवडती आहे.
- इपोमिया सिक्वालिकाहि वेल खाण्यासाठी म्हणून उपयुक्त आहे. तिला वाटर स्पिनच, ओंग-चोय, कांग कुंग, स्वाम्प कॅबेज अशी नावे आहेत.
Uses of Morning Glory / मॉर्निंग ग्लोरीचा वापर:
- हि पूर्व आणि साउथ वेस्ट आशिया मध्ये हिरवा भाजीपाला म्हणून लोकप्रिय आहे. तसेच रताळे हे पण खाण्यास उपयोगी ठरतात.
- हिच्या बियांचे अनेक ठिकाणी पूर्वीपासून वेगवेगळे उपयोग केले जात होते.
- चीन मध्ये औषध म्हणून वेलीचा उपयोग होत होता.हिच्या बियांमध्ये लायसर्जीक असिड असते, ते LSD सारखे सायकोअॅक्टिव असते.
- त्याने मेंदूला भ्रमल्यासारखे वाटते.मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये ह्यांच्या लॅटेक्सचा उपयोग ह्यातील सल्फरने रबर व्हलकानयझेशनसाठी करीत होते.
- अझटेक हा मेक्सिकोतील पुजारी ह्या वेलीचा हॅल्युसिनेनोजेन्तिक म्हणजे मेंदूत विभ्रम निर्माण करण्यासाठी करीत होते.
- हिच्या LSD सारख्या उपयोगामुळे अमेरिकेतील टेक्सास मध्ये हिला बंदी आहे. हिच्या बिया पण ज्यांना यकृतात बिघाड आहे त्यांनी घेतल्या तर भयंकर परिणाम होतात. बिया पेस्टीसाइड म्हणून पण वापरतात.
अशी बहुउपयोगी सुंदर फुलाची आणि तितकीच खतरनाक वेल सौंदर्याचा खरा अर्थ समजावून देते.