Monkey Information in Marathi
माकड माहिती
- माकड माणसाचा पूर्वज, ज्याच्या वर अगणित म्हणी आणि श्लोक तसेच गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. शास्रज्ञ म्हणतात की उत्क्रांति होऊन माकडाचा माणूस झाला. आधी चार पायावर चालणारे माकड दोन पायावर उभे राहणारे एप झाले आणि त्यानंतर बदल होत शेपटी नसलेला आणि अंगावर भरपूर केस नसलेला माणूस निर्माण झाला. म्हणून माकडांना माणसाचे पूर्वज म्हणतात. “आधीच मर्कट तशात मद्य प्याला “, बंदर क्या जाने अद्रक का स्वाद,” अशा म्हणी लिहिल्या गेल्या. इसापनीती आणि बोध कथांमध्ये माकड हे रूपक घेऊन कथा लिहिल्या गेल्या. आपण तर हनुमानाला शक्ती, बुद्धी आणि पराक्रमाचा आदर्श मानतो. त्याची स्वामिनिष्ठा आणि चातुर्य हे गुण वाखाणले गेले. म्हणून त्याची आपण देव म्हणून पूजा करतो.
जाती आणि जीवन पद्धती :
- माकडांमध्ये शेपूट असलेले आणि नसलेले असे आपण समजतो, परंतु शास्रज्ञांच्या मते शेपूट नसलेले एप म्हणून ओळखले जातात आणि ते पुष्कळसे मानवासारखे असतात. त्यांनी दोन प्रकार केले आहेत. ते म्हणजे जुन्या जगातील आणि नवीन जगातील माकडे. नव्या जगातील माकडे मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. जुन्या जगातील माकडे अफ्रिका आणि आशिया येथे आढळतात. सिमियंस माकडे ६० मिलियन वर्षापासून पृथ्वीवर आहेत. नवीन जगातील माकड हे ३५ मिलियन वर्षापासून आहे.
- शेपूट असलेल्या माकडांमध्ये आपण नेहमी पाहतो ते वाईल्ड टोक माकड आहेत. त्या नंतर पांढऱ्या तोंडाचे कापुचिन, जपानी माकाकी, सिंहासारखी आयाळ असलेला मार्मोसेत, बोनेत माकाकी, खारीसारखा सैमिरी ,क्रब [खेकडे] खाणारे माकड ब्लाक होलार [काळे माकड] बनून, मंद्रील, पिग्मी मार्मोसेत,इत्यादी. एप माकडांमध्ये ओरांग उटांग, गोरिल्ला यासारखी माकडे येतात.
- माकडे नेहमी कळपानी राहतात. १००, १५० माकडे एका कळपात असतात. त्यात दोन मोठी माकडे आणि पाच सहा माद्या असतात. आणि बाकी सर्व पिल्ले आणि लहान माकडे असतात. माकडांचे आयुष्य साधारणपणे १२ [पिग्मी] ते ४५ [गिनी बबून] वर्षे असते. पिल्ले दोन ते तीन आठवडे आईच्या पाठीवर असते. नंतर ते स्वतंत्र फिरते. माकडे सर्वाहारी म्हणजे पाने, फळे, कठीण कवचाची फळे,आणि लहान प्राणी हे खातात. शहरात फिरणारी माकडे देवळातील फुटाणे शेंगदाणे सर्व खातात.
- काही माकडे झाडावर राहतात. काही जमिनीवर राहतात. एकमेकांना संदेश देण्यासाठी त्यांची वेगळी भाषा असते. काही रानात राहतात. पण काही ना शहरात माणसांची भीती वाटत नाही. दिल्लीच्या रस्त्यावरून तसेच निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वर झुंडी ने हिंडणारी माकडे आपण पाहिलीच आहेत. वणी, महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या जवळ हिंमतीने जाऊन त्यांच्या हातातून फुटाणे खाणारी माकडे आपण पाहिली आहेतच.
माकड आणि माणसाचे नाते :
- माकडांना पण भावना असतात. विशेषत: आई बाळाचे संगोपन करते तेंव्हा आणि तिला पण बाळ गेले तर दारूण दुख: होते. मेलेल्या मुलाला कवटाळून ती दिवसच्या दिवस बसते. माकडे विकलांग लोकांचे सहाय्यक म्हणून पण काम करतात. सर्कस मध्ये आणि रस्त्यावर खेळ करणाऱ्या मदारी बरोबर ते खेळ करून दाखवतात.
- माकडे सिनेमामध्ये पण कामे करतात. खूप हिंदी आणि इंग्लीश सिनेमात माकडांची कामे आहेत. शास्रज्ञ त्यांचा उपयोग प्रयोगासाठी करतात. अवकाशात पण त्यांना सोडून प्रयोग केला आहे. त्यानंतर मानव अवकाशात गेला. पण अशा प्रयोगांपायी भारतातले रीसास मंकी ही जात नामशेष होण्याची भीती निर्माण झाली. चीन मध्ये माकड ह्या प्राण्यावर वर्ष असते.
- माकडांची एकच वाईट गोष्ट आहे ते म्हणजे ते फळांच्या बागांमध्ये शिरून नासधूस करतात. त्यामुळे त्यांना मारले जाते. असे असले तरी हा चपळ, मिष्कील प्राणी बहुतेकांना आवडतो हे नक्की.