Love Quotes in Marathi
प्रेम हे प्रेम असत…तुमच अणि आमच सेम असत…बरोबर आहेना मित्रांनो…प्रेमावर बोलू तेवढे कमीच. पुढे प्रेमावर काही हृदयस्पर्शी मराठी सुविचार दिले आहेत…बघा, वाचा आणि सांगा आडतात काय ते तुम्हाला.
प्रेमावर मराठी सुविचार :
- वैरभावाने का होईना मला दुखविण्यासाठी तरी एकदा भेटून जा. पुन्हा माझ्यापासून दूर जाण्यासाठी तरी येऊन जा [रंजीशी सही दिल भी दुखाने के लिये आ | आ फिरसे मुझसे दूर तू जाने के लिये आ ]
- हाय रे देवा ! आम्हाला तिच्याकडून एकनिष्ठतेची अपेक्षा होती जिला साधी निष्ठा म्हणजे काय तेच माहित नव्हते. [हमको उनसे वफा की है उम्मीद ,जो नाही जानते वफा क्या है|[–गालिब]
- पारखून घेतलं तर आपलं कुणीच नसतं. समजून घेतलं तर परके कुणीच नसते.
- आजकाल पावसाचं पण आठवणींसारखं झालय, कधीही येतो आणि भिजवून जातो, निमित्त तेच वादळाचं, कधी मनातल्या कधी समुद्रातल्या.
- पानगळीत फक्त पानेच गळतात, नजरेतून उतरण्याचा कुठलाच ऋतु नसतो.
- ती कर्मकहाणी जिला शेवट पर्यंत नेता येत नाही चल तर मग तिला छानसे वळण देऊन तिथेच सोडूया.[ वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुश्कील उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा|]
- ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात, मनापासून प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.
- तुझ्यात आणि माझ्यात फक्त थोडाच फरक आहे, तुला वेळ घालवायचा होता आणि मला आयुष्य.
- गमावले मी पण होते गमावले तिनेपण, फरक फक्त एव्हडा आहे…मी सर्व काही गमावले तिला मिळवण्याकरिता आणि तिने मला गमावले सर्व काही मिळवण्याकरिता
- मन गुंतायला ही वेळ लागत नाही आणि मन तुटायला ही वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.
- जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात. जितके जास्त जपाल तितके आपणाला आणखी दूर लोटतात.
- प्रेमाचं सारं कर्ज फेडलय मी, हिशोब उरला तो फक्त तू दिलेल्या जखमांचा.
- भरोसा ज्यांच्यावर करायचा त्यांनीच आम्हाला लुटले, किती नावे घेऊ सर्वानीच लुटले.
- वर्षांच्या धगधगत्या शरीरावर अश्रुंचे थेंब पण नाही पडले तापलेल्या हृदयाच्या जखमांवर वर्षा बरसली ती पण अंगारांसारखी
- वाट पाहण्याचे दुख: वाट पाहून गेले, वाट पाहणे उरले.
- तुझ्या प्रेमाचे दुख: हा तर एक बहाणा होता. आमचे नशीबच फुटके की, ज्याने हृदय भंगले.
- माझ्या नशीबात तू असून माझे नशीब हुकले असेल तर माझे प्रेम तुला समजावताना माझे काहीतरी चुकले असेल.
- जर तुम्ही प्रेम करीत असलेल्या लोकांनी तुम्हाला जाणून घ्यावे असे वाटत असेल तर हे सिद्ध करा की तुम्ही त्यांच्याशिवाय जगू शकता.
- प्रेमाचा विश्वासघात करू नका, प्रेमी बदलतात हि समस्या नाही, आपण कोणालाही इतके आपले मानू नका फक्त एकाच गोष्टीची साथ द्या ती म्हणजे प्रेम, प्रेमावरच प्रेम करा. प्रेमात पडा बाकी सर्व दुय्यम आहे -ओशो.
- जीवन मिळते एकाच वेळी ,मरण येते एकाच वेळी, प्रेम होते एकाच वेळी, हृदय तुटते एकाच वेळी, हे सर्व होते एकाच वेळी, तर तिची आठवण का होते वेळोवेळी?
- दूर जाणाऱ्या तुझ्या डोळ्यात मी माझ्यापासून दुरावत होतो, तुझ्यातून विलग होऊन पुन्हा तुझ्यातच हरवत होतो, तुझ्याशिवाय जगणे तर सोड, मरणे पण कठीण आहे, उरलेल्या श्वासात आता अखंड जळणे आहे.
- तुला आठवले की किनारा आठवतो, पायाखालची ओली वाळू ही आठवते, या आठवणींचे एक छोटेसे गाव मी वसवते, डोळ्यात सारे घेऊन पापणी डोळ्यांना मिटवते .
- का विसरावे तिने मला, का विसरावे मी तिला, जिने माझ्या कवी मनाला, आपल्या प्रेमातून जन्म दिला.
- ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्या सारखे खूप भेटतील मला, मी पण हसून विचारले तिला “आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला?”
- शब्दात तू, गीतात तू, डोळ्यात तू, स्वप्नात तू, श्वासात तू, हृदयात तू, पण नशीबात मात्र नव्हतीस तू.
- झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक फक्त एव्हढाच आहे की, झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत.
- माझ्यासाठी एव्हढच कर, पुन्हा एकदा भेटून जा, आपल्या आठवणींची खिडकी, तुझ्याच हाताने लोटून जा.
- आठवणी सांभाळणे सोपे आहे कारण त्या मनात साठवता येतात, क्षण सांभाळणे अवघड आहे कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात.
- का कधी असे जगावे लागते, मनात दुख: पण ओठावर हसू आणावे लागते खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट पण हसत तिला दूर जाताना पाहावे लागते.
- माणसांवर जेव्हढे प्रेम करावे तेव्हढे ते दूर जातात फुलांना जास्त जवळ घेतले तर पाकळ्या गळून पडतात ज्यांना मनापासून आपले मानले तीच आपल्याला विसरून जातात फुले वाळू लागले की फुलपाखरेही उडून जातात.
- जपण्यासारखे बरेच काही उद्यासाठी राखून ठेवले आहे, हृदयाच्या पंखावरती तुझच नाव कोरून ठेवले आहे.
- तुझे हसणे आणि माझे फसणे एकाच वेळी घडले, नकळत माझे मन तुझ्या प्रेमात पडले.
- किनार्याची किंमत कळण्यासाठी लाटांच्या जवळ जावे लागते, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते.
- वाट पाहता तुझी संध्याकाळ ही टळून गेली, तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या पण ती ही मला एकटे सोडून गेली.
- कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमी एक प्रश्न पडतो, माझे एक ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो.
- कुणी तरी म्हटले दोस्ती हळूवार विष आहे आम्ही म्हटले आम्हाला तरी मरण्याची घाई कुठे आहे.
Love Quotes in Marathi
Related posts
Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी सुविचार
Sad Quotes in Marathi | Marathi Sad Dukhi Status & Thoughts दुःखी विचार
Naming Ceremony Information in Marathi, Name Invitation, Quotes, Ideas
Marathi Charolya - College | कॉलेज चारोळ्या
Good Thoughts in Marathi | मराठी सुविचार
75th Birthday Wishes in Marathi || 75th, 61st Birthday Marathi Celebration
Engagement Wishes in Marathi Language | Sakharpuda Shubhecha | SMS
Nirop Samarambh Information in Marathi | Farewell Speech on Send off
Inspirational Quotes in Marathi | प्रेरणादायी वचने / सुविचार