Lifebuoy Soap Information in Marathi
लाइफबॉय साबण माहिती
“लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ…लाइफबॉय”
ही मधुर धून जर तुम्ही ऐकलेली नसेल तर मला खरंच नवल वाटेल. लहानपणापासून ते आतापर्यन्त एकदातरी आपण हा साबण नक्कीच वापरलेला असेल. सामान्य मध्यमवर्गीय माणूस असो किंवा उच्चभ्रू वसाहती मध्ये राहणारी व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या स्वच्छतेसाठी त्याने हा साबण नक्कीच वापरलेला असणार आहे.
Description / वर्णन :
- साधारणपणे लाल रंगामध्ये येणारा लाइफबॉय ओरिजिनल आपण वापरलेला आहे. आयताकृती आकार असणारा हा साबण ज्यावर लाइफबॉय असे अधिकच्या चिन्हासोबत कोरलेले असते.
- एक विशिष्ठ पकड हा साबण आंघोळीच्या वेळेस देत असतो आणि इतर साबणाच्या तुलनेत या साबणाची जाडी ही थोडी जास्त असते असे माझे थोडेसे निरीक्षण आहे.
- या साबणाला देखील त्याची विशिष्ट ओळख म्ह्णून ओळखला जाणारा सुगंध असतो. त्वचेवर अगदीच सौम्य असा हा साबण आहे.
Advertising / जाहिरात :
- ‘दुनिया का नंबर १ जर्म प्रोटेक्शन सोप ‘असं म्हणत किंवा ‘किटाणू से सुरक्षा करता है लाइफबॉय’ म्हणत अतिशय प्रभावशाली जाहिराती आजपर्यन्त या साबणाच्या केलेल्या आहेत.
- काजोल आणि अजय देवगण यांच्यासोबत त्यांच्या जवळपास सर्वच उत्पादनाच्या जाहिराती यांनी केलेल्या आहेत. विविध जिंगल वापरून त्यांनी ग्राहकांना आकर्षित केलेले आहे.
- डॉक्टर आणि लहान मुलाचा संवाद असेल किंवा सतत आजारी पडणाऱ्या मुलाची कथा असेल यांच्या जाहिराती अगदीच आपल्या समस्यांसारख्या वाटतात आणि कुठेतरी त्या सत्य परिस्थितीचे वर्णन करत असतात म्हणूच त्या प्रभावशाली ठरतात.
Other products / इतर उत्पादने :
- साबणाप्रमाणेच यांची इतरही काही उत्पादने आहेत जसे हँडवॉश, सॅनिटायझर इत्यादी. आज जगभरातल्या परिस्थितीमुळे या सर्वच साबणाच्या उत्पादनाची बाजारामधील मागणी वाढली आहे. तरीदेखील लाइफबॉयची मागणी सर्वाधिक आहे.
- वेगवेगळ्या स्किन प्रकारानुसार आणि घटकानुसार या साबणाचे देखील विविध प्रकार आहे.
- जसे जर्म प्रोटेक्टिव सोप, लिंबाचे गुणधर्म असणारा लेमन फ्रेश बार, सिल्वर शील्ड बार, मॉयश्चर प्लस हा स्किनला अधिक मॉयश्चर देण्यासाठी, असे अनेक साबणाचे देखील प्रकार आहेत.
Market value / बाजारातील मूल्य :
- दुनियाका नंबर १ जर्म प्रोटेक्शन सोप अशी यांची टॅग लाइन अगदीच खरी आहे असे म्हणायला हरकत नाही.
- २०१९ च्या सर्वेक्षणानुसार भारतीय बाजारपेठेमधील नंबर १ चा साबण अशी लाइफबॉयने ओळख मिळवली आहे.
- हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचे लाइफबॉय हे उत्पादन आहे. भारतातील टॉयलेट साबण प्रकारात विकल्या जाणाऱ्या साबणांमध्ये लाइफबॉय हा सर्वात अधिक विकला जाणारा साबण आहे.
- २०१८ मधेही या साबणाचा बाजारामधील विक्रीचा वाटा हा १८.७ एवढा जास्त होता आणि तेव्हा सुद्धा हा साबण प्रथम क्रमांकावर होता. वाढत्या स्पर्धेमुळे किंवा बाजारातील काही इतर गोष्टींमुळे या साबणाच्या किमतीमध्ये अनेकदा चढ उतार बघावयास मिळत असतात.