Laptop Information in Marathi
लॅपटॉप माहिती
लॅपटॉप ही सध्याच्या काळात एक महत्त्वाची वस्तू बनली आहे. मनोरंजन, क्रीडा, शैक्षणिक आणि साहित्य अशा अनेक क्षेत्रात डेस्कटॉप संगणकापेक्षा लॅपटॉपला अधिक पसंती दिली जाते. आज आपण लॅपटॉपची साध्या सरळ आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत.
लॅपटॉप म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? :
- लॅपटॉपचा अर्थ त्याच्या शब्दातच दडला आहे. लॅप म्हणजे ‘ मांडी ‘ आणि टॉप म्हणजे ‘ च्यावर ‘ म्हणजेच अगदी मांडीवर घेऊनही आपले काम सहज हाताळता येणारा संगणकच.
लॅपटॉप कसा असतो? :
- लॅपटॉप हा संगणकाचा एक सुटसुटीत आणि सूक्ष्म प्रकार आहे. लॅपटॉप डेस्कटॉप संगणकाच्या मानाने खूप छोटा असला तरीही ह्यावर डेस्कटॉप संगणकावर केली जाणारी सर्वच कामे अगदी आरामात करता येतात.
- लॅपटॉप मध्ये संगणकाच्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश आहे. लॅपटॉपचे वजन साधारणतः १ कीलोग्रम ते ५ कीलोग्रम इतके असते, वजनाने लॅपटॉप जरी डेस्कटॉप संगणकापेक्षा हलका असला तरी किमतीने महाग असतो.
- लॅपटॉप मध्ये इनपुट – आऊटपुट यंत्र जसे की माऊस, कीबोर्ड यांचा अंतर्गत समावेश असतो. लॅपटॉपला असलेल्या बॅटरीमुळे आपण वीजपुरवठा बंद असला तरीही लॅपटॉपचा वापर करू शकतो.
- लॅपटॉपला असलेल्या कॅमेरा सुविधेमुळे आपण इंटरनेटचा वापर करून व्हिडिओ कॉल करू शकतो.
- लॅपटॉपचा छोटा वहिसारखा असलेला आकार आणि त्यासारखी असलेल्या रचनेमुळे त्याला नोटबुक ह्या नावाने सुद्धा संबोधले जाते.
इतिहास :
- १९६८ साली Alan Kay ह्या संशोधकाला ‘ पोर्टेबल इन्फॉर्मेशन मॅनिपुलेटर ‘ ची कल्पना आली, १९७२ साली त्यांनी आपल्या शोधपत्रात यालाच ‘ डायनाबुक ‘ ह्या नावाने संबोधले, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने लॅपटॉप बनवण्याच्या क्रियेला वेग आला.
- १९८१ साली Adam Osborne ह्या संशोधकाने लॅपटॉप बनवला त्या लॅपटॉप ला त्यांच्या नावावरून ’ Osborne 1′ हे नाव देण्यात आले. Osborne 1 ह्या लॅपटॉप चे २४.५० पाऊंड म्हणजे जवळपास १२ किलो इतके वजन होते आणि तेव्हा त्याची १५०० डॉलर इतकी किंमत होती. Osborne 1 अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आणि त्याने लोकांच्या बरोबरच संगणक निर्मिती करत असलेल्या कंपन्यांचे ही लक्ष वेधून घेतले.
- Osborne 1 ला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहत IBM, Lenovo, HP, Dell, Apple, Acer, Asus ह्यासारख्या तगड्या कंपन्या ह्या स्पर्धेमध्ये उतरल्या. त्यांच्यात लॅपटॉप संबंधित शोध घडवून आणून आपली विक्री वाढविण्यासाठी चढाओढ चालू आहे. आपल्या सर्वोत्तम जागेसाठी आपसातील स्पर्धेमुळे नवनवीन तंत्रज्ञ आपल्याला पाहायला मिळत आहे.
लॅपटॉपचे फायदे :
- लॅपटॉपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लॅपटॉप पोर्टेबल आहे. त्याला आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो; तसे डेस्कटॉप संगणक पोर्टेबल नसल्यामुळे आपण त्याचा एकाच जागेवर उपयोग करू शकतो.
- डेस्कटॉप संगणकपेक्षा लॅपटॉप हे आकाराने लहान असल्यामुळे ते कमी जागा व्यापते.
- लॅपटॉपचे घटक जसे की माऊस, कीबोर्ड अंतर्गत असल्यामुळे आपल्याला डेस्कटॉप संगणका सारखे वेगळे ठेवण्याची गरज भासत नाही.
- लॅपटॉपला असलेल्या बॅटरी सुविधेमुळे त्याचा वापर करण्यासाठी वीजप्रवाह चालू ठेवण्याची गरज नसते.
Yes