Bhima Koregaon Information in Marathi
1 जानेवारी 2018 ला अहमदनगर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव ह्या गावी विजय स्तंभाला वंदन करण्यास आलेल्या नागरिकांमध्ये अचानक दंगल उसळली. त्यात भर म्हणून वढू ह्या गावातून पण दंगल झाली आणि त्यात एक युवक ठार झाला. बघता बघता दंगलीचे पडसाद साऱ्या महाराष्ट्रभर उमटले आणि काट्याचा नायटा झाला.
भीमा कोरेगाव इतिहास :
- १ जानेवारी १८१८ ला ब्रिटीश फौजांनी पेशवे साम्राज्यावर विजय मिळवला.
- त्याला 200 वर्षे पूर्ण झाली होती. दुसरा बाजीराव पेशवे हा त्यावेळी पेशवेगिरी सांभाळत होता. तो पहिल्या बाजीराव इतका शूर अजिबात नव्हता.
- पेशवेपदाची धुरा त्याला सांभाळता येत नव्हती. त्यातून तो विलासी आणि ऐषारामी होता.
- त्यामुळे इतर सरदार त्याच्यावर नाराज होते. हळूहळू छत्रपती किंवा पेशवे यांचे एकछत्री अंमल खिळखिळे झाले होते. आणि ह्याचा फायदा शत्रू नक्कीच घेणार होते. सर्वात मोठा शत्रू म्हणजे इंग्रज.
व्यापारी म्हणून आले आणि राज्य गिळंकृत केले :
- शिवाजी राजांच्या काळात म्हणजे 16 व्या शतकात इंग्रज ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी या नावाने कालिकत येथून समुद्र मार्गाने मसाल्यांच्या व्यापारासाठी भारतात शिरले.
- भारतात त्या काळी सोन्याचा धूर निघत होता. ते पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. प्रचंड समृद्धी होती.
- खूप राजे छोट्या छोट्या राज्यांवर राज्य करीत होते. सगळा भारत तुकड्यांमध्ये विखुरला गेला होता.
- त्यामुळे कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नव्हता. इंग्रजांनी ह्याचाच फायदा करून घ्यायचे ठरविले. त्यांनी मुंबई, कलकत्ता, कालिकत आणि सुरत येथे त्यांच्या वखारी उभ्या केल्या.
- त्यासाठी मोठे नजराणे घेऊन राजांकडून व्यापाराची परवानगी मागीतली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पण ते आलेले इतिहास दर्शवितो. पण शिवाजी महाराजांनी त्यांना जागीच रोखले होते.
- बंगाल मध्ये सिराज उद्दौला राज्य करीत होता. इंग्रजांनी त्याच्या राज्यातील गोंधळ पाहिला आणि बंगालवर आक्रमण केले. बंगाली खूप शूरपणे लढले पण एकतर त्यांच्याकडे आधुनिक तोफा व बंदुका नव्हत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्यातील मीर जाफर इंग्रजांना राज्य लोभामुळे फितूर झाला होता.
- परिणामी कलकत्त्यावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला. ह्याच फितुरीचा फायदा घेऊन इंग्रजांनी एक एक करीत सर्व राज्ये जिंकली. दक्षिणेकडे टिपू सुलतानला सुद्धा अशाच रीतीने हरविले.
- शिवाजी महाराजांनी जमविलेल्या एका पेक्षा एक शूर सरदारांपुढे इंग्रज काही करू शकत नव्हते.
वढू गावाची गोष्ट :
- छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यानंतर औरंगजेबाने त्यांचे तुकडे वढू गावी टाकले होते आणि कोणीही त्यांची अंत्येष्टि करू नये असा आदेश दिला होता. पण गणपत नावाच्या एका महार जातीच्या इसमाने हे मोठ्या धाडसाने केले आणि संभाजी महाराजांची समाधी बांधली.
- त्याची शिक्षा म्हणून त्यांना कमरेला लोटा आणि झाडू बांधून फिरण्याची शिक्षा दिली. तेंव्हा ही शिक्षा पेशव्यांनी दिली असे म्हणतात. हे १७ व्या शतकापर्यंत चालू होते. पण त्या आधी इंग्रज काही करू शकत नव्हते. फक्त त्यांनी स्थानिक माणसे आपल्या सैन्यात भरती करणे सुरु केले.
- सार्जंट त्यांचा असे आणि हाताखालील सैन्य भरती स्थानिक लोकांची करीत होते. त्यांना बंदुका चालवायचे शिक्षण आणि शिस्तीचे धडे दिले जात होते. त्यामुळे त्यांच्या सैन्यात शिस्त आणि एकसंधपण होता.
- याउलट स्थानिक राजे किंवा पेशवे ह्यांच्या सैन्यात खोगीरभरती सैन्य होते. त्यांचे काम फक्त लढायचे एव्हडेच होते आणि त्यांची शस्त्रे म्हणजे ढाल तलवार आणि भाला एव्हडेच होते.
- राजा पडला की पळून जायचे किंवा शरण जायचे एव्हडेच त्यांना शिक्षण होते.
- जेंव्हा शेवटचा पेशवा कुचकामी निघाला तेंव्हा इंग्रजांनी डाव साधायचे ठरविले. जरी सर्व सैन्य छत्रपतींशी एकनिष्ठ होते तरी त्यांच्यात आपापसातच मतभेद होते. इंग्रजांनी महार लोकांना आपल्या सैन्यात भरती केले आणि त्यांचा लोटा आणि झाडू ह्यापासून मुक्तता केली.
- जसे त्यांनी अगदी वेगळी गुरखा पलटण सुरु केली तशी महार रेजिमेंट सुरु केली. इंग्रजांनी पुण्यावर ताबा मिळविला होता पण जेंव्हा त्याना कळले की बाजीराव जवळ-जवळ ३०००० सैन्य घेऊन पुणे परत मिळवायला येत आहे तेंव्हा पुण्याच्या कर्नल बारने कंपनी फर्स्ट रेजिमेंट ऑफ बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री ला पेशव्यांना तोंड देण्यास सांगितले. आणि पुण्याजवळ भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या ३०००० सैन्याबरोबर ८०० ब्रिटीश सैन्याची गाठ पडली.
- त्या वेळी इंग्रजांचा कप्तान फ्रांसिस स्टॉंटन हा होता. त्यांनी ८०० सैनिकांची, ज्यात महार पण होते, शिस्तशीरपणे आखणी करून मराठी सैन्याला पाठी मागून आणखी सैन्य येणार असल्याची भीती दाखवून पळवले आणि विजय मिळविला. बाजीराव पळून गेला आणि शेवटी त्याने इंग्रजांच्या हातात सापडल्यावर शरण जाऊन पेन्शन वर तह केला.
- पेशवे पडल्यावर सातारचे छत्रपतींचे राज्य पण इंग्रजांनी गिळंकृत केले. या विजयात ५०० कंपनीचे सैनिक कामी आले. मराठ्यांचे मोठे साम्राज्य हरवले, दक्षिणेकडेचा मार्ग मोकळा झाला म्हणून ब्रिटिशानी त्यावेळच्या प्रथेनुसार भीमा कोरेगाव येथे एक विजय स्तंभ उभारला.
- पण मजेची गोष्ट अशी की ह्या विजयाचे सर्व श्रेय ब्रिटीश ऑफिसर घेऊन गेले, त्यांना प्रमोशन सन्मान पत्रे मिळाली. बाकी स्थानिक लोकांना काहीच मिळाले नाही.
- उलट पक्षी नंतर ब्रिटिशानी महार लोकांना सैन्यात भरती करणे बंद केले होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचे, वडील जे एक सुबेदार होते त्यांच्या आणि गोपाळ कृष्ण गोखले ह्यांच्या प्रयत्नांनी ही भरती परत सुरु झाली.
- आता महार रेजिमेंट मध्ये ले.ज. कृष्ण राव सारखे शूर अधिकारी आहेत. आणि ती पूर्णपणे महार रेजिमेंट पण नाही. त्यात सर्व जातीचे लोक आहेत. खरं तर महात्मा गांधीनी त्यांना हरिजन हे नाव दिले तेच खूप योग्य होते.
- त्यानंतर प्रत्येक १ जानेवारीला सर्व दलित ज्यात महार पण असतात, ते भीमा कोरेगाव येथे त्या योद्ध्यांना श्रध्दांजली वाहण्यास येतात. १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण होणार म्हणून त्यांनी मोठा समारंभ केला.
- त्यात दलित नेते, जिग्नेश मेवणी, उमर खालिद आणि दक्षिणे कडील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुल्लाची आई असे सर्वजण होते. तेवढ्यात कुणीतरी दगडफेक सुरु केली आणि दंगल उसळली.
- आणि त्यात एका युवकाचे मरण झाले. त्यानंतर सगळीकडे हिंसा आणि जाळपोळ सुरु झाली. ज्यांचा ह्या कुठल्याही गोष्टीशी संबंध नव्हता असे बेकार लोक गाड्या जाळणे, रस्ता रोको करणे आणि दगडफेक करून दंगल माजवणे एव्हडेच काम करीत होते.
- अशा तर्हेने केवळ गैरसमजा मुळे ही दंगल झाली. ह्यामध्ये इंग्रजांची फोडा आणि झोडा [Divide and Conquer] ही नीती खूप कामी आली आणि हेच आपल्या भारताचे दुर्दैव आहे. इंग्रजांमध्येही स्कॉटलँडचे, आयर्लंडचे आणि वेल्स अशी उप घटक आहेत पण राष्ट्राभिमान हा पूर्ण इंग्लंड म्हणून आहे.
- पानीपतच्या लढाईत अहमदशहा अब्दालीबद्दल एक गोष्ट सांगतात. तो अगदी चिंतित होता हिंदुस्तानी सैन्याला कसे हरवायचे ह्या विचाराने. त्याच रात्री त्याला समोरच्या हिंदी सैन्यात वेगवेगळ्या ज्वाला दिसल्या.
- त्यांनी सेनापतीला विचारले, “हे काय आहे?” तेंव्हा त्याने उत्तर दिले, “हे वेगवेगळ्या जातीचे असल्याने वेगळा स्वैंपाक करून खातात.” त्यावर अहमदशहा म्हणाला, “मग आपण नक्कीच जिंकू कारण जे जेवण पण वेगळे करतात ते काय एकत्र येऊन लढणार?” हे इतके जुने उदाहरण आहे ज्यापासून आपण शिकायला पाहिजे.
- हे खरे आहे, पण जमावाला मेंदू नसतो आणि त्याचा उठाव झाला तर त्यात आपले-परके कोणी रहात नाही. प्रचंड बेरोजगारी म्हणून अशांतता, ह्या मुळे युवा वर्ग बेचैन आहे आणि त्यांच्या शक्तीचा स्फोट झाला तर असे घडते.
- एक शिवाजी महाराज असे पारखी होते ज्यांनी त्यावेळच्या निराशा जनक परिस्थितीतील युवा वर्गाची शक्ती विधायक कार्याकडे वळवली आणि स्वराज्य निर्माण केले.
- आता खरी गरज ही अशा द्रष्ट्या नेत्याचीच आहे.