Kingfisher Information in Marathi
Mahiti Essay on Kingfisher Bird : किंगफिशर पक्षाची माहिती
भाग्याचा दूत – किंगफिशर !
कोकणात गेलात की तळ्याच्या काठी एखाद्या फांदीवर एक निळा जांभळा देखणा धारदार चोचीचा पक्षी दिसतो. जरा जवळ जायच्या आत तो उडून जातो. हा आहे किंगफिशर पक्षी.
किंगफिशर दिसला की तुमचे भाग्य उजळले समजा.त्याच्याबद्दल असे बरेच समज आहेत. हा गुरूबरोबर जोडला जातो त्यामुळे ह्याच्या दर्शनाने येणारे भाग्य, लक्ष्मी अमाप मिळते. भरभराट होते इत्यादी.
या उलट बोर्नियोचे लोक पिवळ्या आणि लाल किंगफिशरला पाहणे हा अपशकुन मानतात. हे अर्थात सगळे पाश्चात्य लोकांचे समज आहेत. अर्थात आपल्याकडे पण तो भाग्य विधाता म्हणून गणला जातो.
कोकणात किंगफिशरला खंड्या ह्या नावाने ओळखतात. पण पक्षिमित्र संघटनेचे डॉ. राजू कसंबे यांनी ह्या पक्ष्याला घीवर म्हणजे कोळी हे नाव दिले आहे. कारण तो मासे पकडतो. त्याची विशेषता म्हणजे तो विजेच्या वेगाने सूर मारून पाण्यातील मासे किंवा भक्ष्य पकडतो.
विविध जाती
हा पक्षी राज्यातील ‘एवेस’ वर्गातील ‘अल्सिडीनिडी’ कुटुंबाचा सदस्य आहे. त्याचे शास्त्रीय नाव ‘हॅलसायन स्मिर्मनसिस’ आहे. हा तळे, साठलेले पाणी, तलाव, पाणथळ जागा अशा ठिकाणी राहतो. कारण किंगफिशरचे मुख्य अन्न आहे मासे आणि ते अशा ठिकाणीच सापडतात.
तथापि त्यांच्यात जमिनीवर किंवा झाडावर राहणाऱ्या पण जाती आहेत. जमिनीवर राहणारे बहुधा कीटक, अळ्या आणि “सेन्तीपेड” [शतपाद] व “मिलीपेड” [सहस्त्रपाद] प्राणी, साप इत्यादींवर जगतात.
किंगफिशर हा पक्षी जगातील अल्सेडीनिडी कुटुंबातील प्राणी आहे. त्याच्या पृथ्वीवर ११४ जाती आहेत आणि १९ प्रजाती आहेत.
हा मुख्यत्वेकरून समशीतोष्ण प्रदेशातील पक्षी आहे. ह्याच्या जास्ती जाती अफ्रिका, युरेशिया बल्गेरिया, फिलिपाइन्स आणि आशिया येथे आढळतात. आपण त्या सर्व जातींना डोंगरी चिमणी किंवा खंड्या किंवा किलकिल्या ह्या नावाने ओळखतो. इंग्लिशमध्ये कुकाबुरा म्हणून पण ओळखतात.
शारीरिक माहीती :
किंगफिशर हा आकाराने लहान असतो पण डोके मोठे असते, चोच लांब, धारदार आणि अणकुचीदार असते. पाय आणि शेपटी छोटे असतात. पायाला पुढे तीन आणि मागे एक अशी चार बोटे असतात. ते हसल्यासारखं आवाज काढतात.
काही किंगफिशरची शेपटी लांब असते. ह्यांचा आकार १० से.मी पासून ४२-४६ से.मी असतो. वजन १० ग्राम पासून २५५-४२६ ग्राम असते.
ह्यांचे पंख आकर्षक रंगांचे असतात. ते निळ्या हिरव्या आणि जांभळ्या रंगाचे असतात. पोट पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असते. चोच लाल, पिवळ्या किंवा काळ्या रंगाची असते.
किंगफिशरची नजर अतिशय तीक्ष्ण असते. त्यांचे डोळे भक्ष्य पकडण्यासाठी विशिष्ट तऱ्हेचे असतात. त्यांना दूरचे चांगले दिसते आणि मान न वळवता चोहिकडे बघण्याची डोळ्यात संरचना असते. त्यामुळे तो एखाद्या सुंदरीसारखा तिरप्या नजरेने बघून सावज पकडू शकतो.
राहणे आणि जीवनमान :
मासे पकडणारे किंगफिशर ह्यांना डोळ्याला पारदर्शक पडदा असतो जो पाण्यात सूर मारल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी जात नाही. तसेच ते पाण्यातील प्रकाशाच्या वक्रीभवनाचे आणि परावर्तनाचे पृथक्करण करून सावजाची आणि पाण्याच्या खोलीची अचूक जागा बघू शकतात.
किंगफिशर घरटे बांधण्याच्या बाबतीत आळशी असतात. ते जेंव्हा पाणथळ जागी असतात तेथे ते ओल्या मातीत खोडून खड्डा खणून राहतात. झाडावर ते ढोलीचा किंवा वाळवीच्या बोगद्याचा वापर करतात. किंगफिशर हे एकनिष्ठ असतात आणि सहसा त्यांचे जोडपे मोडत नाही. ग्रीक दंतकथेनुसार ते ‘अल्सायोन’ आणि ‘सेयीक्स’ ह्या नावाचे शापित यक्ष होते आणि त्यांचे लग्न झाले होते. म्हणून किंगफीशरला हल्सियोन पण म्हणतात.
किंगफिशरची अंडी पांढरी आणि चकचकीत असतात. एकावेळी मादी दोन ते दहा अंडी घालते. नर आणि मादी दोघंही अंडी उबवतात. पिल्लू ३ ते ४ महिन्यातच उडू लागते. किंगफिशरचे आयुष्य ५ ते ७ वर्षाचे असते. त्यांचे शत्रू म्हणजे कोल्हे, राकुंस, मांजरी आणि साप. त्यांची अंडीपण इतर प्राणी खातात. किंगफिशर स्वत: मासे, छोटे बेडूक, किडे, आळ्या खातात. कधी कधी साप आणि मृदुकाय प्राणी पण खातात.
किंगफिशर २५ की. मी वेगाने उडू शकतात. ते इतके तीव्र गतीने पाण्यात सूर मारतात की त्यांची फक्त झलक दिसते आणि निमिषार्धात ते मासा पकडतात. त्यांना हिवाळ्यात भरपूर खाद्य मिळते पण एखाद्या देशात बर्फ गोठले की ते स्थलांतर करतात.
किंगफिशरचे अस्तित्व इंडोमलायन प्रदेशात २७ दशलक्ष वर्षापासून आहे तर काही ठिकाणी ३० ते ४० दशलक्ष वर्षापासून आहे. ह्यापैकी मार्क्वेसन किंगफिशर हा नामशेष होण्याची भीती आहे. तसेच जंगल तोडी आणि सुकलेल्या तळ्यांमुळे बऱ्याच किंगफिशरचे अस्तित्व धोक्यात आहे. पृथ्वीचा समतोल राखायचा असेल तर हे होता कामा नये. पर्यावरण स्नेही ह्या बाबतीत प्रयत्नशील आहेत.
भाग्य हवे असेल तर हे पक्षी राहिलेच पाहिजे नाही का?
You p/z give long information