Skip to content

Job Application Letter in Marathi Language | नोकरीसाठी अर्ज

Application Letter in Marathi Patra

Application Letter in Marathi

Patra Lekhan : Examples 1 – Bank Job Application Letter in Marathi

श्री सुहास श्रीपती जाधव
रूम नं २, मातोश्री चाळ,
मुक्ताई नगर,
नगर २.
२६ ऑक्टोबर २०१९.

प्रति,
व्यवस्थापक,
एबीसी बँक लिमिटेड./ हेरंब इंजिनियरिंग प्रा.लि.
म.गांधी रोड,
नगर १.

विषय :- शिपाई/सफाई कामगार पदासाठी अर्ज करणेबाबत.

माननीय महोदय,

मी, सुहास श्रीपती जाधव, वरील पदांसाठी अर्ज करू इच्छितो. माझी व्यक्तिगत माहिती खालीलप्रमाणे:

नाव : सुहास श्रीपती जाधव.

जन्मतारीख : ३ मे २०००

शिक्षण : १२ वी विज्ञान पास गुण – ७० %.

शाळा : हिराबाई शहा एज्युकेशन इंस्टिटयुट नगर -२

शारीरिक क्षमता : उंची : ५’५”,
वजन : ५७ किलो,
छाती : २७ से.मी.

इतर पात्रता : खेळ : कबड्डी साठी शाळेकडून कर्णधार म्हणून खेळलो.
NCC : शाळेत ग्रुप कॅप्टन होतो.
अभिनय : शाळेतील नाटकांमध्ये काम केले.

भाषा : इंग्लिश, हिंदी, मराठी.

घरगुती माहिती : आई : गृहिणी,
वडील : सुरक्षा रक्षक ‘अपर्णा प्रायव्हेट लिमिटेड’,
भाऊ आणि बहिण : अजून शाळेत शिकत आहेत.

छंद : व्यायाम, गिर्यारोहण.

अनुभव : १. सुट्टीमध्ये बदली कामगार म्हणून एबीसी बँकेत २ महिने काम केले.
२. शाळेत स्कॉलरशिप परीक्षांना पर्यवेक्षक म्हणून काम केले.

शैक्षणिक तसेच अनुभवाची प्रमाणपत्रे ह्या पत्राबरोबर संलग्न केलेली आहे. मला आपल्या संस्थेत काम करण्याची संधी दिल्यास मी प्रामाणिकपणे काम करीन आणि कोणत्याही तक्रारीसाठी संधी देणार नाही.

आपला,
सुहास जाधव.(सही)
सुहास श्रीपती जाधव

संलग्न : १. १२वी पास बोर्डाचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका ह्यांची स्थळप्रत.
२. हिंदी भाषा प्रवेश पास प्रमाणपत्र आणि अनुभवाचे प्रमाणपत्र ह्यांची स्थळप्रत.
३. आधारकार्डाची स्थळप्रत.
४. १०वी च्या गुणपत्रिकेची स्थळप्रत जन्मातारीखेसाठी.

Sample 2 – Application Letter for Bank Clerk in Marathi

श्री.सुहास श्रीपती जाधव,
रूम नं.२, मातोश्री चाळ,
मुक्ताई नगर,
नगर – २.
इमेल : suhasj21@gmail.com
दूरध्वनी : ९९३७२३९२१

प्रति,
महाव्यवस्थापक,
महाराष्ट्र ग्रामीण बँक,
इंद्रायणी प्लाझा,
अकलूज रोड.
इंदापूर ता.इंदापूर.

विषय :- लिपिक/कॅशियर पदासाठी अर्ज करणे बाबत

महोदय / महोदया ,

मी, सुहास श्रीपती जाधव, आपल्या बँकेत लिपिक/कॅशियर पदासाठी अर्ज करू इच्छितो. माझी माहिती खालीलप्रमाणे :

नाव : सुहास श्रीपती जाधव.

जन्मतारीख : २ मे १९९७.

शैक्षणिक पात्रता : बीकॉम, प्रथम वर्गात उत्तीर्ण.

भाषा : इंग्लिश, मराठी, हिंदी.

इतर शैक्षणिक पात्रता : १. MS CIT पास.
२. डेटा एन्ट्री स्पीड ७० शब्द/मिनिट
३. ICWA कोर्स करीत आहे.
४. CAIIB पहिला पार्ट परीक्षा देत आहे.

अनुभव : सुटीत मार्च २०१९ ते जून २०१९ अर्धवेळ डेटा एन्ट्रीचे काम पुण्यातील एका NGO मध्ये केले.

विशेष कौशल्य : ABACUS, MS-Tally, MS-Windows, MS-Office. इंग्रजी वर उत्तम पकड. उत्तम संभाषण कला. ग्राहक सेवा निपुण.

घरगुती माहिती : आई – गृहिणी, वडील – सेवानिवृत्त, एक भाऊ – कॉलेज मध्ये शिकत आहे.

छंद : पोहणे, गिर्यारोहण, NGO संस्थांद्वारे लोकांना मदत करणे.

वरील माहिती आपल्यास योग्य वाटली तर मला आपल्या बँकेत सेवेचा लाभ द्यावा ही विनंती.

आपला स्नेहांकित,
सुहास जाधव (सही)
सुहास श्रीपती जाधव.

संलग्न : 1. पदवीपरीक्षा पास ह्याची गुणपत्रिका आणि डिग्री ह्यांची स्थळप्रत
2. MS CIT पास आणि टायपिंग वेगाच्या प्रमाणपत्राची स्थळप्रत.
3. आधार कार्डाची स्थळप्रत.
4. १०वी शाळा सोडल्याचा दाखल्याची स्थळप्रत जन्मतारीखेसाठी.

➤➤ Click for more Letters in Marathi!

Resume / Covering Letter in Marathi Example : Teacher, Bank Jobs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *