Jal Tarang Information in Marathi
जलतरंग एक मधुर सुस्वर स्वरांचे वाद्य
- जलतरंगाचा शोध ४थ्या ते ६व्या शतकात लागला. मुनी वात्सायानांच्या कामसुत्रात ह्याचा उदकवाद्य म्हणून उल्लेख आहे. कुमारिका मुलींनी शिकायच्या चौसष्ट कलांपैकी हि एक कला आहे.
- ह्याचा उल्लेख ‘संगीत पारिजात’ ह्या पुस्तकात देखील आहे. इंडियन क्लासिकल म्युझिक मध्ये ह्याला महत्वाचे स्थान आहे. हे घन वाद्यांमध्ये मोडते.
- ह्याला जलतरंग व जलयंत्र असे म्हणतात, कारण ह्यात वाट्यांमध्ये असलेल्या पाण्याच्या लहरी किंवा तरंगातून निघणारा ध्वनि असा ह्याचा अर्थ आहे. जलयंत्र हे नाव कृष्णाच्या काळातील अष्टछाप ह्या कवीने दिले होते. हे पूर्वीच्या गोंग किंवा गमेलोन ह्या वाद्यांपासून निर्माण झाले आहे.
- ह्यामध्ये चिनी मातीच्या किंवा धातूच्या / पितळेच्या वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या अर्धवर्तुळाकार ठेवून त्यात पाणी भरून त्या वाट्यांच्या कडांवर लाकडी काड्यांनी हलकेच टिचकीसारखा आघात करून नाद निर्माण केला जातो. वाट्यांच्या कडांवर काड्यांनी हलकेच आघात केला की, पाण्यावर तरंग उठतात आणि त्यातून नाद येतो.
- जसा नाद काढायचा असेल त्याप्रमाणे वाटी पाणी भरतात. ज्याप्रमाणे लाटा किनाऱ्यावर आदळताना समुद्राची गाज ऐकू येते तसेच पाण्याच्या तरंगातून नाद येतो.तो नाद निरनिराळ्या रागांमध्ये परावर्तीत करून जलतरंग वाजवतात. दिसायला सोपे वाटले तरी हे अत्यंत कला कुसरीचे आणि कुशलतेचे काम आहे.
- काड्या किती जोरात किवा हलकेच मारायच्या हे त्यातील कसब आहे. ह्यामध्ये पंधरा ते बावीस वाट्या असतात आणि त्यांचे लहान मोठे आकार असतात. कारण मंद स्वर काढायचा असेल तर वाटीचा आकार मोठा असतो आणि तार स्वर काढायचा असेल तर लहान आकाराची वाटी घेतात.
- हे एक मेलडी निर्माण करणारे वाद्य आहे आणि वाट्याची संख्या मेलडीवर अवलंबून असते. वाजविणारा एक तर उभा राहून टेबलवर अर्धवर्तुळाकार वाट्या ठेवतो किंवा सतरंजीवर बसून समोर अर्धवर्तुळाकार वाट्या ठेवतात.
- संगीत सार मध्ये म्हंटले आहे की वादकाने जर छोट्याशा आघाताने वाटीतील पाणी गोल फिरविले तर तीव्र आणि उत्तम ध्वनि निर्माण होतो.
- खूप कमी लोकांना हे वाद्य माहित आहे. पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यातील राज्यांमध्ये हे रोज वाजविले जायचे. तसेच जावा, बाली बेट आणि ब्रह्मदेश येथे ही वाजविले जायचे. असेच कप जपान मध्ये बुद्ध टेम्पल मध्ये असतात.आणि ‘काबुकी’ ह्या वाद्यमेळात वापरतात.
- त्याचे पण संगीत समारंभ होतात. हे वाद्य वादन करणारे मिलिंद तुळणकर हे प्रसिद्ध आहेत. त्यांनी एका समारंभात अतिशय सुंदर रित्या “मुंबईचा जावई’ ह्या चित्रपटातील ‘प्रथम तुज पाहता’ हे गाणे वाजवून दाखविले.
- जलतरंग हे फेंगशुईच्या विंड चायीम सारखे वाटते. युरोप मध्ये वाट्यांच्या ऐवजी ग्लास वापरले जायचे. जलतरंग सारखेच राजस्थानात जलताल असे वाद्य आहे.
- त्यात वाट्याऐवजी थाळी असते आणि ती पाण्याने भरलेली असते त्यावर लाकडी किंवा धातूच्या स्टिक असतात.तसेच झायलोफोन ह्या वाद्यासारखे हे पण काडीने वाजवायचे असते.
- जलतरंग वाजविणारे कलाकार मात्र आपल्याकडे खूप आहेत. त्यापैकी कुमार पंकज साखरकर, पंडित दत्तोपंत मंगळवेढेकर, रामराव परसातवार, मास्तर बर्वे, मिलिंद तुलनकर, सीता दोरायस्वामी, शशिकला दाणी, ए.गणेशन, कोट्टायम ती.एस.रंजना प्रधान, रागिणी त्रिवेदी इत्यादी.
- कधी कधी आपण ट्रान्स मूडमध्ये असतो तेंव्हा बासरी किंवा जलतरंग ऐकत शांत बसून राहावे असे वाटते. संगीतामध्ये खरोखर हि जादू आहे की आपण सर्व जग विसरून जातो.
Information about Jal Tarang in Marathi Language – Essay Wikipedia
Jaltarang Notations, Lesson & Notes in Marathi
Related posts
Electronic Drum Information in Marathi | इलेक्ट्रॉनिक ड्रम माहिती
Piano Information in Marathi, Piano Notes, Music Lesson
Bongo Drums Information in Marathi | बोंगो ड्रम माहिती
Dholak Information in Marathi, ढोलक वाद्याची माहिती
Harmonium Information in Marathi, हार्मोनियम माहिती
Tabla Information in Marathi, Tabla Lessons & Notes Marathi
Very nice