IPS Officer Information in Marathi
आय पी एस ऑफिसर
आय पी एस ऑफिसर म्हणजे? :
- द इंडियन पोलीस सर्विस म्हणजेच भारतीय पोलीस सेवा ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे. याची स्थापना १९४८ मध्ये करण्यात आलेली आहे. भारतातील अत्यंत मानाचे आणि अभिमानाचे समजले जाणारे हे क्षेत्र आहे. अत्यंत कठीण परीक्षांपैकी एक अशी ही परीक्षा आहे. अनेक सिनेमांमधून आपण एक आय पी एस ऑफिसरचे जीवन बघितलेले आहे.
- केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचा भाग आहे. संपूर्ण भारतात ही परीक्षा एकाच वेळेस घेतली जाते आणि संपूर्ण भारतातून या परीक्षेसाठी अनेक उमेदवार दरवर्षी ही परीक्षा देत असतात. जिल्हा पातळीवर यांचे काम चालत असते, गुन्हे शोधणे आणि त्यांना प्रबंध करणे, रहदारी नियंत्रण, अपघात नियंत्रण व्यवस्थापन आणि सुव्यवस्था ही यांची मुख्य जवाबदारी आहे.
- एक आय पी एस ऑफिसर होण्यासाठी अत्यंत कठीण अशी स्पर्धा परीक्षा पास होणे गरजेचे असते. ही एक अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे, दरवर्षी साधारणपणे ३,५०,००० उमेदवार या परीक्षेला बसतात ज्यातून फक्त २०० निवडले जातात.
- म्हणून ही एक सर्वात कठीण परीक्षा समजली जाते आणि त्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम आणि ध्यास घेणे गरजेचे आहे.
आय पी एस ऑफिसर बनण्यासाठीची पात्रता :
- शारीरिक निष्कर्ष – यामध्ये पुरुष आणि स्त्रियांची उंचीचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत, साधारणपणे खुल्या वर्गासाठी पुरुषांची उंची १६५ सेमी तर महिलांची १५० सेमी आहे. तसेच कुमाऊंनीस, आसामी, आदिवासी अशा एस टी उमेदवारांसाठी ही पात्रता पुरुषांसाठी १६० सेमी तर महिलांसाठी १४५ सेमी अशी आहे. तसेच चष्म्याची परवानगी आहे, परंतु दृष्टी चांगली असणे गरजेचे आहे.
- शैक्षणिक पात्रता – यूजीसी ने मान्यता दिलेल्या कोणत्याही महाविद्यालयातून उमेदवाराने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे गरजेचे आहे किंवा तत्सम पदवी असणे आवश्यक आहे. तसेच शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेले आणि निकालाची वाट बघत असलेले विद्यार्थी देखील पूर्व परीक्षा देऊ शकतात.
- वयोमर्यादा – ही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा २१ वर्षे आणि किमान मर्यादा ३२ वर्षे आहे.
- राष्ट्रीयत्व – परीक्षा देणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच १९६२ नंतरचे त्याचे वास्तव्य भारतात असणे आवश्यक आहे.
आय पी एस ऑफिसरची जवाबदारी :
- भारतीय कायदा व सुव्यवस्था राखण्यात यांचा मुख्य हात असतो, तसेच दहशदवाद रोखणे, व्हीआयपी लोकांची सुरक्षा करणे, गुप्तचर विभागाशी संपर्क ठेऊन त्यासंबंधी अहवाल गोळा करणे, गस्त घालणे, पर्यावरण संदर्भातील कायद्याचे रक्षण करणे, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे, भ्रष्टाचार रोखणे या त्यांच्या अतिमहत्वाच्या जवाबदाऱ्या आहेत.
- सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या संपर्कात राहणे आणि त्यांचे नेतृत्व करणे.
- संपूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने आपल्या देशाची सेवा करणे आणि रक्षण करणे.
- सीआयडी, आयबी, सीबीआय यांसारख्या गुप्तचर शाखेशी संपर्क ठेवणे आणि सुव्यवस्था राखणे.
Good information