Guru Purnima Information in Marathi
तिथी
सगळीकडे आषाढ पौर्णिमा या दिवशी गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.परंतु तामिळनाडू राज्यात गुरुपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेस साजरी करतात.
उद्देश
गुरु म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप असते.वर्षभर सर्व गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे अमृतरूपी बोध देत असतात. त्या ईश्वररूपी गुरूंच्या प्रती अत्युच भावनेने कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी करणे.
महत्व
१. गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी ईश्वर रुपी गुरुतत्त्व नेहमी पेक्षा १ हजार पटीने अधिक कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली सेवा आणि योगदान यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ हजार पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे. गुरुपौर्णिमा साजरी करणे म्हणजे ईश्वरचिंतनाचाच दुसरा मार्ग आहे.
२. ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूं लोकांची लाखो वर्षांपासून चालत आलेली चैतन्यमय संस्कृती आहे; परंतु सध्याच्या काळात नवीन संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरु-शिष्य परंपरेकडे दुर्लक्ष्य होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन करण्यात येत असते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची माहिती समाजाला जाणीव करून देण्यात येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची व गुरूचा आदर करण्याची सुसंधीच आहे ना.
गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत
सर्व शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात व गुरूंची पाद्यपूजा करतात.तसेच गुरुदक्षिणा रुपी काही ना काही गुरूंना मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याचीहि प्रथा प्रचलित आहे. पौराणिक गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले जाते. सर्व भारतियांची अशी धारणा आहे कि सर्व ज्ञानाचा उगम महान महर्षि व्यास यांच्यापासूनच होतो. कुंभकोणम् आणि शृंगेरी या ठिकाणी व्यासपूजेचा भव्य दिव्य महोत्सव साजरा होतो. कुंभकोणम् आणि शृंगेरी ही दोन्ही शंकराचार्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध पिठे आहेत. हे शंकराचार्यांच्या रूपामध्ये व्यासमहर्षी परत पृथ्वीवर अवतीर्ण झाले, अशी श्रद्धाळूंचा समज आहे; त्यामुळे संन्यासी लोक या दिवशी व्यासपूजेचे प्रतीक म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात.
गुरुपूजनाचा विधी
आंघोळ वगैरे आदी नित्यकर्मे आटोपून “गुरुपरम्परासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये “ या मंत्राचा उच्चार करून पूजा केली जाते.एक शुभ्र अंथरून त्यावर अष्ट गंधाने पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण दिशेमध्ये बारा रेघा काढल्या जातात.त्या रेघ मारलेल्या शुभ्र वस्त्राला महर्षि व्यास यांचे व्यासपीठ समजले जाते. मग व्यास, ब्रह्मा, शुक्रदेव, परात्परशक्ती, गौडपाद, गोविंदस्वामी व शंकराचार्य यांचे त्या व्यासपिठावर आवाहन करून त्यांची पूजा केली जाते. याच दिवशी ज्यांनी दीक्षा दिली त्या गुरुची आणि मातापित्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.’
Guru Poornima Mahiti
Mahiti / गुरु पूर्णिमेची माहिती
- ज्या व्यासमुनींनि महाभारत, पुराणे लिहिली त्यांना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल अवसर आहे. त्यांच्याएवढे महान आचार्य, गुरुजी अद्याप झालेले नाहीत अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. शास्त्रात असे कथन केले आहे कि अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे व पूजन करावे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार तसेच शिल्पकार मानले जातात. ज्या ग्रंथात व्यवहारशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र आहे असा महाभारत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याचे वर्णन केले जाते अशा ज्ञानेश्वरानी सुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ अश्या वाक्याने सुरुवात केली.
- मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला हळुवारपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि अवघड कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने आणि कोणत्याही लोभाशिवाय प्रेमाने आधार देऊन संकटा मधून तरुण नेणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुं प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असतो.
- गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ असा मंत्रोच्चार करून, त्यांना प्रथम वंदन करण्याची प्रथा व परंपरा आहे. आपल्या भारत देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.आपल्या सर्वांचा उद्धार आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. पौराणिक भारतीय गुरुपरंपरेच्या इतिहासामध्ये गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जसे कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण,जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, द्रोणाचार्य-अर्जुन, परशुराम-कर्ण अशी गुरु-शिष्य परंपरा आहे.एकलव्याची ज्यांनी गुरुनिष्ठा पाहिली त्या सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
- गुरूच्या घरी भगवान श्रीकृष्णांनी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी आपले वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच स्वतःचे गुरु मानले, तर संत नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय स्थान आहे.
- गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा असते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश आणि गुरु शिष्याला जे ज्ञान देतात तो ज्ञानरुपी प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करायचा हाच तो दिवस होय.