Gudi Padwa Information in Marathi
Gudi Padva : गुढीपाडवा माहिती
गुढी पाडवा म्हणजे काय?
- चैत्र शुक्ल प्रतिपदेचे संस्कृत नाव गुढी पाडवा आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करतात जो हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस असतो. पाडवा किंवा पाडवो हा शब्द संस्कृत शब्द पड्ड्वा/पाड्ड्वो पासून आला आहे ज्याचा अर्थ आहे चंद्राच्या वाढत्या कलेचा (शुक्ल पक्षाचा) पहिला दिवस जो संस्कृत मध्ये प्रतिपदा म्हणून ओळखला जातो.
- हा हिंदू पंचांगानुसार मानल्या जाणाऱ्या साडे तीन मुहूर्तापैकी एक आहे, ज्या दिवशी कुठलीही वेळ नवीन धंधा किंवा वैयक्तिक कामाला सुरवात करण्यासाठी पवित्र मानली जाते.
गुढी पाडव्यादिवशी काय करावे?
- गुढी पाडव्या दिवशी, मराठी घरांमध्ये, खिडकीबाहेर गुढी उभारतात आणि सजवतात. उजळ हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जरीची किनार असलेले कापड लांब बांबूच्या टोकाला बांधतात, त्यावर गाठी, कडूलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळया आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. चांदीचा किंवा तांब्याचा कलश त्यावर उलटा ठेवतात. ही गुढी घराबाहेर, खिडकीमध्ये, गच्चीवर किंवा उंच ठिकाणी उभारतात जिथून ती सर्वांच्या नजरेस पडेल.
- गुढीपाडव्यादिवशी गावाकडे अंगण झाडून शेणाने सारवतात. शहरात लोक वेळ काढून साफ-सफाई करतात. स्त्रिया आणि मुली दारासमोर सुबक रांगोळी काढतात. ब्रम्हदेवाला विविध रंगाची फुले वाहिली जातात, तसेच घराचा मुख्य दरवाजा सुंदर रंगाच्या फुलांनी व तोरणांनी सजवला जातो.
- प्रथेनुसार, ह्या दिवशी, लोक मंगल स्नानाने दिवसाची सुरवात करतात आणि नवीन वस्त्र परिधान करतात. कडूलिंबाची कडू-गोड पाने खावून कुटुंबातील लोक उत्सवाची सुरवात करतात. कधी कधी कडूलिंबाच्या पानाची, धणे, गुळ, आणि चिंच घालून चटणी केली जाते. कुटुंबातील सदस्य ही चटणी खातात. असे मानले जाते की, ही चटणी रक्त शुद्ध करते आणि शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.
- मराठी कुटुंबात ह्या दिवशी श्रीखंड-पुरी किंवा पुरणपोळीचा बेत असतो. कोकणी लोक कणगाची खीर, रताळे, खोबऱ्याचे दुध, गुळ, आणि तांदळाचे पीठ पासून विविध प्रकारच्या खीर आणि सांदण बनवतात.
गुढी उभारण्याची काही महत्वाची कारणे खालीलप्रमाणे :
- ही राजा शालिवाहनचा हुन्स वरील विजयाचे प्रतिक आहे आणि त्याच्या राज्यातील लोकांनी त्याचे पैठणमध्ये आगमन झाल्यानंतर गुढी उभारल्या.
- इतिहासाप्रमाणे, गुढी भगवान रामाच्या विजयाचे आणि रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला परतण्यामुळे झालेल्या आनंदाचे प्रतिक आहे. विजयाचे प्रतिक उंच धरतात म्हणूनच गुढीसुद्धा उंच उभारली जाते. असेही मानले जाते की चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून आल्यानंतर रामाचा राज्याभिषेक झाला तेव्हा हा सण साजरा केला गेला.
- असे मानले जाते की गुढी वाईट शक्तींना घरापासून दूर ठेवते, समृद्धी आणि भाग्य घरी आमंत्रित करते.
- काही मराठी लोकांसाठी, हा सण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली मराठा सैनिकांना मिळालेल्या विजयाचे द्योतक आहे. ह्या महान मराठी नेत्याने खूप शौर्याने लढून मुघलांच्या वर्चस्वाखाली मराठा साम्राज्य स्थापित केले म्हणून महाराष्ट्रीयन लोकांना त्यांचा खूप अभिमान आणि गर्व आहे.
- दंतकथेनुसार, “गुढी” शूर मराठी योद्धयांचे युद्धामध्ये विजय मिळवून घरी परतण्याचे द्योतक आहे.
- गुढीचे स्थान मुख्य दरवाजाच्या उजव्याबाजूला असते. उजवी बाजू आत्म्याच्या साक्रीयेतेचे प्रतिक आहे.
Nice
best information thanks
Really good information about gudhipadhava festival………Thanks