Green Tea Information in Marathi
ग्रीन टी चे फायदे
- आजकाल जगातील बहुतांश लोकांना भेडसावत असलेली समस्या म्हणजे जाडेपणा. जाडेपणा कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि रुचकर उपाय म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून जाडेपणा कमी करण्यास मदत करते.
- काही कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी येत असल्यास साधी चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी पिणे उत्तम. तोंडाला दुर्गंधी आणणाऱ्या जीवाणूंचा ग्रीन टी नाश करते.
- शिवाय हिरड्या दुखणे किंवा सुजणे या समस्यांमध्ये सुद्धा ग्रीन टी मुळे आराम मिळतो. ग्रीन टी उकळवून त्याचा अर्क घ्यावा आणि त्यात बेकिंग सोडा घालून पेस्ट बनवावी. हि पेस्ट टूथपेस्ट ऐवजी लावून दात घासावेत.
- ग्रीन टी मध्ये असलेल्या टॅनिन नावाच्या द्रव्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नैसर्गिक रित्या कमी होतो आणि हृदयरोगांपासून आपला बचाव होतो. शिवाय हे शरीराचे कोलेस्टेरॉल शोषण कमी करते त्यामुळे भविष्यातही हृदयरोगांपासून रक्षा होते.
- ग्रीन टी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकत असल्यामुळे तुमची त्वचा देखील दिवसेंदिवस तरुण आणि तजेलदार दिसू लागते. तुम्ही ग्रीन टी उकळवून फ्रीज मध्ये ठेवून त्याचा तोंड धुण्यासाठी सुद्धा वापर करू शकता किंवा ग्रीन टी चा बर्फ बनवून तो चेहऱ्यावर चोळू शकता. यामुळे मुरमे आणि तारुण्यपिटिकांचा त्रास कमी होतो आणि निस्तेज त्वचेवर तेज येते.
- तीन चमचे दही घेऊन त्यात एक चमचा ग्रीन टी टाकावी आणि याचा वापर स्क्रब सारखा करावा. त्वचेच्या अनेक समस्यांपासून यामुळे मुक्ती मिळेल.
- एलर्जीमुळे वारंवार सर्दी होत असल्यास साध्या चहापेक्षा ग्रीन टी प्यावी, लवकरच आरम मिळेल.
- अर्ध्या लिटर पाण्यात तीन चार ग्रीन टी बॅग उकळवून घ्या, शाम्पू आणि कंडिशनर करून झाल्यानंतर या पाण्याने केस धुवा. कोंडा, केस गळणे, कमजोर केस अश्या अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.
- ग्रीन टीच्या नित्य सेवनाने मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. तसेच शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा मदत होते.
- उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते.
- नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक रोगांमध्ये सुद्धा दररोज ग्रीन टी पिण्यामुळे सुधार होतो. ग्रीन टी मेंदूसाठी खूप चांगली असते.
- ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर रोज ग्रीन टी चे सेवन करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.