Gautam Buddha Information in Marathi
गौतम बुद्ध मराठी माहिती
“हा मुलगा एक तर खूप मोठा राजा होईल नाहीतर धर्माच्या वाटेवर नेणारा गुरु होईल.”
मुलाच्या जन्माच्या वेळेची हि भविष्य वाणी ऐकून शुद्धोधन राजाला धक्का बसला. त्याने ठरवले माझा मुलगा मोठा माझ्यासारखा मोठा राजाच व्हायला पाहिजे. पण नियतीने त्या मुलाला धर्माच्या वाटेवरच नेले आणि एक महान प्रेषिताचा जन्म झाला. तो मुलगा म्हणजे गौतम बुद्ध!
बालपण :
- गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ. कपिल वस्तू राज्याचा तो राजकुमार. कपिल वस्तू म्हणजे आत्ताचे नेपाळ मध्ये लुम्बिनी नावाचे गाव आहे. गौतम बुद्धाचे वडील शाक्य वंशातील राजा शुद्धोधन हे होते. म्हणून बुद्धाला शाक्यमुनी बुद्ध असे पण म्हणतात. आईचे नाव मायावती. सिद्धार्थची आई लहानपणीच वारली. म्हणून त्याची दुसरी आई गौतमी म्हणजेच त्याची मावशी हिने त्याचे पालन पोषण केले. म्हणून त्याचे नाव गौतम असेही होते.
- सिद्धार्थला सुंदरी ही बहीण आणि नंदा हा भाऊ होता. शुद्धोधन राजाने गौतमला राजाच करायचे म्हणून बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क येऊ दिला नाही. त्याला अतिशय लाडा कोडात आणि चैनीत वाढवले. कुठल्याही दु:खाचा त्याला वारासुद्धा लागू दिला नाही. सिद्धार्थला दु:ख, यातना, शोक याची काहीही कल्पना नव्हती. १६व्या वर्षी त्याचे यशोधरा हिच्या बरोबर लग्न झाले. त्याला राहुल नावाचा मुलगा झाला.
धक्कादायक घटना :
- एक दिवस त्याने रथाच्या सारथ्याकडे हट्ट धरला आणि तो बाहेर फिरायला पडला. रथातून जाताना त्याला एक जरा जर्जर म्हातारा दिसला. त्याने सारथ्याला विचारले, की “हा मनुष्य असा का दिसत आहे” सारथ्याने सांगितले की “हे म्हातारंपण आहे. प्रत्येक मनुष्य म्हातारपणात असाच दिसतो.” त्याला एकदम वाईट वाटले. पुढे त्याला रस्त्याच्या कडेला एक रोगी दिसला. तो यातनांनी तडफडत होता. सिद्धार्थने विचारले, “ह्याला काय झाले?” सारथ्याने सांगितले, की “हे त्याच्या शरीराचे भोग आहेत. म्हणून तो वेदनेने तळमळत आहे.” तिथून पुढे जाताना त्याला एक प्रेत यात्रा दिसली. त्याने विचारले, “हे काय आहे?” सारथ्याने सांगितले, “हा मनुष्याच्या जीवनाचा अंत आहे. तो मनुष्य मरण पावला आहे आणि प्रत्येकालाच ह्या प्रक्रियेतून जावे लागते.” सिद्धार्थला खूप मोठा धक्का बसला. तो एकदम अंतर्मुख झाला. तो विचार करू लागला, की मनुष्याच्या जीवनात ही दु:ख, हे आजार, यातना, आणि मरण हे का बरे येते? आणि ह्याच्या पासून सुटका नाही का? त्याला राज भोगामध्ये रस वाटेनासा झाला. त्याला कुठलेच सुख हवेसे वाटेना. खूप विचार करून शेवटी त्याने ठरवले की हे अंतिम सत्य काय आहे, याचा मी शोध लावीन. आणि वयाच्या २९ व्या वर्षी तो रात्री बायको आणि मुलाला सोडून घराबाहेर पडला.
आत्म्याचा शोध :
- मनाला दु:ख का होते?, आत्मा काय आहे?, याचा शोध घेण्यासाठी पहिली ६ वर्ष त्याने अल्प आहार आणि कठोर तपस्या केली. तेथे त्याला ५ साथीदार मिळाले. ते तपस्या करत असतांना शरीराला कष्ट देऊन देवाची प्राप्ती होत नाही असे वाटून त्याने अन्न ग्रहण केले. म्हणून त्याचे पाचही साथीदार त्याला सोडून निघून गेले. गौतम तपस्या करत आत्म्याच्या शोधार्थ फिरत राहिला.
- बोध गाय येथे औदुंबराच्या झाडाखाली त्याने ४९ दिवस काहीही न खाता पिता कठोर तपस्या केली. त्या साधनेत त्याला त्याचा पूर्व जन्म दिसला आणि त्याला पूर्ण ज्ञानाचा प्रकाश दिसला. तो जागा झाला म्हणून त्याला बुद्ध असे नाव पडले. तेव्हापासून तो गौतम बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला जीवनाच्या अंतिम सत्याचे ज्ञान झाले.
- मन आणि शरीर स्वास्थ्यासाठी, भूतकाळाबद्दल शोक करू नये आणि भविष्याची चिंता करू नये तर वर्तमान क्षण शहाणपणाने जगावा हे त्याला समजले. त्याच्या तेजामुळे लोक त्याला देव मानू लागले. पण तो स्वत:ला देव समजत नव्हता. प्रथम तो लोकांना हे ज्ञान देण्यास तयार नव्हता. पण असे म्हणतात की प्रत्यक्ष ब्रह्माने त्याला लोकांना उपदेश करण्यास सांगितले. येथेच त्याला त्याचे पूर्वीचे ५ सहकारी ही भेटले. येथे त्याने त्याचे पहिले प्रवचन केले. त्यात ४ सत्याचा दु:ख व यातना घालविण्यासाठी उपयोग सांगितला. १) दु:ख २) त्याचे कारण ३) त्याचा निरोध आणि ४) मार्ग.
शिकवण :
- बुद्धाने ४ सत्य सांगितली. माणसांचे दु:ख त्याच्या अपेक्षांमुळे निर्माण होते आणि त्याचा निरोध करण्यासाठी माणसाने ८ मार्ग अवलंबले पाहिजेत. ते म्हणजे:
1) योग्य दृष्टी;
2) योग्य हेतू;
3) योग्य जीवन मुल्ये;
4) योग्य वक्तृत्व;
5) योग्य कृती;
6) योग्य जीवन पद्धती;
7) योग्य मनाची अवस्था; आणि
8) योग्य एकाग्रता. - त्याच्या अनुयायांनी संघ स्थापन केले. बुद्धाने सामान्य लोकांना संस्कृत समजणार नाही म्हणून पाली भाषेत उपदेश केला. त्याचे अनुयायी तीन घोषणा करीत. त्या म्हणजे १) बुद्धं शरणं गच्छामि; २) धम्मम शरणं गच्छामि; ३) संघम शरणं गच्छामि. त्याच्या बौद्ध धर्माचा प्रसार होऊ लागला. अनुयायी वाढू लागले. त्याचे वडील आणि ७ वर्षांचा मुलगा सुद्धा त्याचे अनुयायी झाले. प्रथम तो स्त्रियांना भिक्षू म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. परंतु नंतर आईच्या हट्टामुळे त्याने स्त्रियांना बौद्ध भिक्षुणी होण्यास मान्यता दिली. त्यामुळे बौद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.
सम्राट अशोक :
- सम्राट अशोक खूप मोठा राजा होता. त्याने कलिंग देशावर स्वारी केली. या युद्धामध्ये लाखो माणसे मारली गेली. त्या गावात फिरताना त्याला सर्वत्र प्रेतांचा खच आणि रक्ताच्या नद्या दिसल्या. त्यामुळे त्याला अतिशय वैराग्य आले आणि मन:शांतिसाठी त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने आपला मुलगा महिंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा यांना सिलोनला या धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले. अशा तऱ्हेने भारतातच नव्हे, तर शेजारील सर्व राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला.
बुद्धाचे उपदेश:
- बुद्धाने अहिंसा आणि सत्य याचा उपदेश केला. त्याने सांगितले की ३ गोष्टी लपू शकत नाहीत – सूर्य, चंद्र आणि सत्य. जर तुम्हाला प्रेमाला योग्य अशी व्यक्ती मिळाली नाही तर तुम्ही स्वत: जगात कुठल्याही व्यक्तीपेक्षा प्रेमाला आणि मायेला योग्य आहात. स्वत:वर प्रेम करणे म्हणजेच दुसऱ्यांवर प्रेम करणे. कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आणि तारतम्याने विचार केल्या शिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. अगदी मी सांगितले तरी.
- वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे त्याने महानिर्वाण म्हणजेच समाधी घेतली. बौद्ध धर्माचा प्रसार चीन, भारत, थायलंड, जपान, ब्रह्मदेश, भूतान, श्रीलंका, तिबेट, मंगोलिया, रशियाचा एक भाग, कम्बोडिया, व्हिएतनाम या देशांमध्ये झाला.
Mala Gautam Buddhanchya jAnna pasun tyachya sampurn karya baddal hi mahiti marathit pahije
I want to more information Gautam Buddha in Marathi thank you for this information