Football Information in Marathi
फुटबॉल माहिती
Game Introduction / खेळाची ओळख
- फुटबॉल किंवा सॉकर -एक जोशपूर्ण आणि चित्तथरारक खेळ! सध्या त्याची सगळीकडे चर्चा चालू आहे. मार्च २०१९ मध्ये “रियल माद्रीदला” “अजाक्सच्या” संघाने त्यांच्या मैदानावर हरवले आणि ९ वर्षांनी “रियल माद्रिद” क्वार्टर फायनलच्या बाहेर फेकले गेले. केव्हढा जल्लोष केला “अजाक्सच्या” संघाने!
- असा जगातील ८० करोड लोक अतिशय उत्कंठेने पाहत असलेला हा ‘फुटबॉल’ खेळ क्रिकेटपेक्षाही प्रचंड लोकप्रिय आहे.
- युरोप आणि दक्षिण अमेरिकेत हा सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ आहे. आजकालचे तरुण पोर्तुगालच्या ‘रोनाल्डो’ आणि अर्जेन्टिनाच्या ‘मेस्सी’ साठी वेडे झालेले असतात. ह्या वेगवान खेळात जोशपण आहे, कौशल्यपण आहे व थोडीफार हिंसा ही आहे!
Football History / खेळाचा इतिहास
कसा निर्माण झाला हा सुसंस्कृत जगात खेळ?
- इंग्लंडमध्ये पब्लिक स्कूल मध्ये १८६३ मध्ये रस्त्यावर हा खेळ खेळला जायचा. कारण विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढविणे हा हेतू होता. तसेच सैनिकांना फिटनेस साठी हा खेळ खेळला जायचा.
- तथापि ह्याहीआधी चीनमध्ये इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्यापूर्वी ‘हान’ वंशाच्या दरम्यान हा खेळ ‘सुजू’ ह्या नावाने खेळला जायचा. ह्याचेच जपानी रूप म्हणजे ‘केमारी’ जो असुका ह्या काळात खेळला जात होता. ह्या खेळामध्ये बरेच लोक गोलाकार उभे राहून एकमेकांकडे बॉल फेकत असत. तसेच ग्रीक आणि रोमन लोकपण बॉलचा खेळ खेळत होते.
- १५८६ मध्ये जॉन डेविस ह्या ब्रिटीश खलाशाने एका एस्कीमोबरोबर बर्फात फुटबॉल खेळल्याचे लिहिले आहे. वसाहतवादी ब्रिटिशांना जुन्या अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात स्थानिक लोक चेंडूशी खेळत असल्याचे आढळले असे नोंदले आहे.
- ऑस्ट्रेलियामध्ये ‘थॉमस’ ह्या दर्यावर्दीने १८७८ मध्ये लोक मुंगुस सारख्या प्राण्याच्या कातड्यापासून केलेल्या बॉलशी खेळत असल्याचे लिहिले आहे. अशा रीतीने पुरातन काळापासून मानवाला ह्या खेळाचे आकर्षण आहे.
- ब्रिटन मध्ये ९व्या शतकापासून ह्याच्या मॅचेस होऊ लागल्या. तसेच फ्रांस मध्ये १२व्या शतकात “ला सौल” हा खेळ खेळत होते.
- सुरुवातीला खूप लोक मिळून खेळत होते त्याला “मॉब फुटबॉल” म्हणत, हा दोन गावांमध्ये सामना होत असे. त्यात जनावराचे मूत्राशय फुगवून बॉल तयार केला जात होता.
- इंग्लंडमध्ये उच्च वर्गाच्या लोकांमध्ये हा खेळ खेळला जायचा. १३व्या शतकात किंग एडवर्ड III ने ह्या खेळावर बंदी घातली आणि १४व्या शतकात किंग हेन्रीने फुटबॉलसाठी पैसे मागण्यास बंदी घातली. १५व्या शतकात नॉटींगहॅमशायर येथे फुटबॉलला “किकिंग गेम” (लाथाळ्यांचा खेळ) म्हणून खेळला गेला. १६व्या शतकात सरदार लोकांनी हा खेळ खेळल्याची नोंद आहे. हा लष्करातील लोकांना व्यायाम म्हणून खेळला जात होता.
- १८व्या शतकात मात्र ह्या खेळणे जोर धरला आणि वेगवेगळे फुटबॉल क्लब स्थापन झाले. त्यामध्ये केम्ब्रिज रुल १८४८, शेफिल्ड रूल १८५७, आणि लंडन जीम्नास्तिक सोसायटी स्थापन झाल्या. १८४५ मध्ये रग्बी स्कूलमधील तीन मुलांनी लिखित रूल / नियमावली घडवली. ह्या खेळाचा विस्तार वाढून त्याला “असोसिएशन फुटबॉल” म्हणू लागले. त्याची नियमावली तयार झाली आणि त्याचे सामने पण होऊ लागले.
- अशा प्रकारे खेळाचे रूप बदलत बदलत २१व्या शतकात जवळपास १८० देशात २०० मिलियन खेळाडू हा खेळ खेळतात!
Football Rules in Marathi / खेळाचे नियम
- फुटबॉल ह्या खेळात ११/११ खेळाडू दोन्ही संघामध्ये असावे लागतात. सामन्याची सुरवात झाली की लगेच प्रचंड वेगाने दोन्ही संघ बॉलच्या मागे धावत सुटतात आणि एकमेकांना ढकलत, पायांनी लाथाडत एकदाचा गोल मध्ये बॉलला लाथ मारून ‘गोल’ केला की प्रेक्षागृहात प्रचंड जल्लोष होतो.
- फक्त ९० मिनिटांच्या ह्या खेळात दोन्ही संघ अक्षरश: एक प्रकारचे युद्ध खेळतात आणि तितक्याच चवीने लाखो लोक ते बघतात. ९० मिनिटाच्या अखेरीस ज्या संघाने जास्त गोल केले तो विजयी ठरतो.
- फुटबॉल मध्ये सगळ्यात मुख्य नियम म्हणजे बॉलला हात न लावता फक्त पायाने उडवून विरुद्ध बाजूच्या नेटमध्ये गोल करायचा. त्यासाठी पळताना प्रतिस्पर्ध्याला पाडणे इत्यादी अनुषंगाने येतेच.
- ह्या खेळात जरी बॉलला हात लावायची मनाई असली तरी संघातल्या खेळाडूकडे हाताशिवाय डोक्याने आणि लाथेने गोल करायची मुभा आहे.
- प्रत्येक संघात ११ खेळाडूंपैकी एक ‘गोली’ असतो. गोलीला हाताने बॉल अडवून आपल्या संघाचा ‘गोलं’ होण्यापासून वाचवायचा प्रयत्न करावा लागतो.
- ह्या खेळात नियमबाह्य वर्तन केले तर प्रथम पिवळे [यलो] कार्ड देऊन वॉर्निंग दिली जाते आणि तरीही तसेच वर्तन राहिले तर लाल [रेड] कार्ड देऊन त्याला खेळातून बाहेर घालवले जाते व बंदी घातली जाते.
- खेळाडूंचा पोशाख शर्ट, शॉर्ट, मोजे, बूट, शिनगार्द अॅथलेट सपोर्टर, आणि प्रोटेक्शन कव्हर असा असावा लागतो. ह्या कारणाने १९५० मध्ये क्वालिफाय होऊनसुद्धा भारतीय संघ फिफा वर्ल्ड कप खेळला नाही कारण आपले खेळाडू बूट न घालता खेळत होते!
Ground, Pitch & Ball Information / खेळाचे मैदान व साहित्य
- फुटबॉलचे पीच १०० ते ११० मीटर लांब आणि ६४ ते ७५ मीटर रुंद असावे लागते. नॉन इंटरनॅशनल खेळांसाठी ९० ते १२० मीटर लांब आणि ४५ ते ९० मीटर रुंद असावे लागते.
- बॉल गोलाकार ६० ते ७० से.मी. परीघाचा असावा लागतो आणि त्याचे वजन ४१० ते ४५० ग्राम असावे लागते. बॉलमध्ये हवा भरतानाचा दाब ०.६ ते १.१ बार असतो. पूर्वी बॉल चामड्याचे असायचे आणि जनावराचे मूत्राशय फुगवून वापरायचे. आता सिंथेटिक असतात.
इतर माहिती :
- फिफा (FIFA) ही वर्ल्ड कपचे सामने आयोजन करणारी संस्था आहे. “द फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोशिएशन द पॅरीस” हिची स्थापना २१ मे १९०४ ला झाली. ही दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप आयोजित करते. फुटबॉल मध्ये सगळ्यात अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणजे हा वर्ल्ड कप!
- आजकाल बायकांच्या फुटबॉल संघाचे पण सामने होतात. ब्राझील, जर्मनी, रशिया, इंग्लंड हे देश सध्या फुटबॉल मध्ये अग्रेसर आहेत. झेक रिपब्लिक, डेन्मार्क, डोमिनिक रिपब्लिक आणि इंग्लंडचा हा राष्ट्रीय खेळ आहे. त्यात अनेक प्रकार पण आहेत, जसे
1] फाइव्ह अ साईड फुटबॉल
2] ऑस्ट्रेलियन रूल
3] इंटरनॅशनल रूल
4] इनडोअर सॉकर
5] सिक्स अ साइड
6]अपंग आणि मुकबधीर खेळाडूंसाठी, 5—अ—साइड, 7- अ – साइड इत्यादी - भारतात १८८८ साली मोहन बगान स्पोर्टिंग क्लब स्थापन झाला. १९४८ साली लंडनमध्ये भारताचा संघ गेला होता. पण वर्ल्ड कपसाठी अजून एकही संघ क्वालिफाय नाही झाला. सध्या
१] मोहन बगान
२] इस्ट बंगाल
३] बंगळूरू
४] डेम्पो
५] मिनर्व्हा पंजाब
६] साळगावकर
७] चेन्नियान
८] ऐजवाल असे बरेच भारतीय क्लब खेळत आहेत. - बैचुंग भुतिया, सुनील छेत्री हे नावाजलेले खेळाडू भारताकडे आहेत. २०१८च्या वर्ल्ड कपला आपला देश दुसऱ्या फेरीतच बाद झाला. निदान २०२२ला तरी फिफा मध्ये आपण चमक दाखवू शकू असा विश्वास आहे कारण सध्या खेळांसाठी चांगले पोषक वातावरण आणि ग्रामीण भागातून टॅलन्ट शोधले जात आहे. आपण आशा करूया.