Finch Information in Marathi
फिंच
Finch information / फिंच माहिती :
- फिंच हा एक लहान आकाराचा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करत नाहीत तर अधिवासाच्या विविध जागा व्यापतात. ऑस्ट्रेलिया आणि ध्रुवीय भाग वगळता ते सर्वत्र आढळतात. फिंच हे संपूर्ण जगभरात पाळीव पक्षी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. फिंच आकाराने अगदी लहान असतात त्यामुळे पोपटासारख्या मोठ्या पक्षांच्या तुलनेत याना पाळण्यासाठी प्रार्थमिकता दिली जाते.
- हे मानवी घरांमध्ये अगदी सहजरित्या राहू शकतात याना जंगलच हवे असे काही नाही, पण असे जरी असले तरीदेखील ते फक्त मानवाच्या संगतीत राहू शकत नाहीत म्हणून हे पक्षी पाळताना नेहमी यांची जोडी घेतली जाते किंवा काही पक्षांचा थवा घेतला जातो आणि पाळला जातो. एकटा फिंच आजारी राहू शकतो किंवा मानसिक तणावाखाली असू शकतो असे एका अभ्यासातून समोर आले आहे. तसेच पोपटाप्रमाणे याना हात लावलेले आवडत नाही किंवा हातात घेऊन स्पर्श केलेला याना चालत नाही. झेब्रा फिंच हि सर्वात लोकप्रिय फिंच प्रजाती आहे.
Description / वर्णन :
- सर्वात लहान फिंच हा आकाराने ३.८ इंच तर वजनाने ८ ग्राम एवढा असू शकतो. तर सर्वात मोठा फिंच हा ९.४ इंच आणि ८३ ग्राम असू शकतो. विविध प्रजातीनुसार यांचा आकार आणि वजन हे भिन्न असू शकते. फिंच हा एक जुना पक्षी मानला जातो आणि साधारणपणे १० ते २० दशलक्ष वर्षांपासून त्यांचे पृथ्वीवर अस्तित्व आहे. यांची पिसे काहीशी पारदर्शक असतात, चोच छोटी पण टोकदार शंकूसारख्या आकाराची असते. यांची पिसे लहान असतात व शेपटी लांब असते. परंतु पाय मात्र तुलनेत छोटे असतात.
- हा एक विविध रंग असणारा पक्षी आहे, साधारणपणे तपकिरी किंवा हिरव्या रंगाचा असतो. तसेच यावर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची तुरळक नक्षि बघावयास मिळते. तसेच काही भडक पिवळा आणि लाल रंग असलेले फिंच सुद्धा बघावयास मिळालेले आहेत. निळा रंग मात्र यांमध्ये फारच क्वचित बघाव्यास मिळतो. झेब्रा फिंच, घुबड फिंच, गोल्डीन फिंच या फिंच च्या काही प्रसिद्ध प्रजाती आहेत.
Personality & Behavior / व्यक्तिमत्व आणि वर्तन :
- हा कळपाने राहणार पक्षी आहे, जेव्हा तो इतर फिन्चसोबत असतो तेव्हा अतिशय आनंदी असतो आणि तेव्हा ते अतिशय आनंदी आवाज काढतात. फळे, बिया, कीटक हे यांचे अन्न आहे. पाळीव फिंचला घरामध्ये टाकण्यासाठी वेगळे फूड येते तसेच हे फळेपण खाऊ शकतात. जेव्हा हे पिंजऱ्यात नसतात तेव्हा झाडांमध्ये, तणांच्या टोकावर, झाडावर आढळून येतात. यांची हालचाल हळू हळू असते.
- तसेच शहरे, उद्याने, अंगण, गवताळ भाग किंवा वाळवंट कुठेपण फिंच आढळून येऊ शकतात. फिंच हे एकमेकांपासून भिन्न भिन्न दिसू शकतात. त्यांच्या अन्नावरून आणि राहण्याच्या प्रदेशावरून त्यांचा रंग वेगळा असू शकतो. तसेच त्यांचे आकारही आहार आणि प्रदेश यामुळे भिन्न असू शकते. हे एक अतिशय उत्तम गायक म्हणून ओळखले जातात आणि आनंदी असतात तेव्हा सूर लावतात.
- फिंचचे घरटे बांधणे काही नवीन नाही, अंडी घालण्यासाठी हे देखील कप आकाराचे घरटे बांधतात आणि एका वेळेस ४ ते ५ अंडी घालतात. अंड्यांची संपूर्ण जवाबदारी मातांवर असते परंतु पिलांना वाढवण्यात वडिलांचा मोठा हात असतो. झाडांचे साहित्य गोळा करून हे झुडुपामध्ये घरटी बांधतात.