Volleyball Information in Marathi
वॉलीबॉल माहिती
Volleyball Game Information History / खेळाची ओळख
- १८९५ साली, मॅसॅच्युसेट्स (यूएसए), येथील विल्यम जी. मॉर्गन या YMCA च्या शारीरिक शिक्षण संचालकाने या खेळाचा शोध लावला. या खेळाला प्रथम मिंटोनेट असे संबोधले जायचे.
- त्याचा उद्देश्य अशा खेळाचा शोध लावणे होता की जो खेळ कोणतीही व्यक्ती सहजपणे खेळू शकेल आणि इतर खेळांप्रमाणे जास्त दमविणारा नसेल.
- १९०० साली या खेळासाठी लागणाऱ्या खास बॉलची निर्मिती केली गेली.
खेळाचे मैदान :
- वॉलीबॉलच्या खेळाचे मैदान 18 मीटर लांब आणि ९ मीटर रुंद किंवा ६० फुट लांब आणि ३० फुट रुंद असते.
- मैदानाला कोर्ट संबोधतात. कोर्टच्या मध्यभागी एक रेषा असते जी कोर्टाच्या लांबीला दोन भागांमध्ये विभाजित करते.
- कोर्टाच्या चारीबाजूंना ३ मीटरपर्यंत आणि जमिनीपासून ७ मीटर उंचीपर्यंत कोणताही अडथळा असू नये.
- मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस तीन मीटर किंवा दहा फुट अंतरावर समांतर अश्या दोन रेषा काढल्या जातात. ह्या आक्रमण रेषा असतात.
- रुंदीच्या रेषेवर उजव्या बाजूला आतल्या दिशेने १० फुट अंतरावर रेषा काढल्या जातात ज्यांना सर्विस लाईन म्हणतात. इथून सर्विस करायची असते.
- मध्यरेषेवर एक जाळी लावली जाते जी पुरुषांसाठी आठ फुट उंचीवर आणि महिलांसाठी ७ फुट ४ इंच उंचीवर असते. जाळीचे खांब साईड लाईन पासून साधारणत: एक मीटर बाहेर असते.
Volleyball Rules in Marathi / खेळाचे नियम :
- हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात.
- तीन खेळाडू पुढे आणि तीन मागे एका रांगेत उभे रहातात.
- संघ एका लीबेरो खेळाडूला वापरू शकतो जो इतर खेळाडूंपेक्षा वेगळ्या रंगाचे शर्ट घालतो. शिवाय त्याच्या शर्टवर सुद्धा लीबेरो लिहिलेले असते. हा खेळाडू सर्विस किंवा आक्रमण करू शकत नाही फक्त रक्षात्मक खेळू शकतो.
- बॉल नरम चामड्याचा, बारा तुकड्यांचा बनविलेला असतो. या बॉलचा व्यास ६५ सेमी ते ६८.५ सेमी असतो आणि वजन २५० ते ३०० ग्राम असते.
- खेळाडूंना पंचाच्या निर्णयाबद्दल काही बोलायचे असल्यास ते कर्णधाराला सांगू शकतात. प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू शकत नाहीत.
- तसेच खेळादरम्यान खेळाडू आपल्या सहकाऱ्याला खेळाबद्दल काही उपदेश देऊ शकत नाही. आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंविषयी अपशब्द उच्चारू शकत नाहीत.
- खेळाडूंना जर्सी, हाफ पँट आणि विशेष शूज घालणे गरजेचे आहे. तसेच समोर व पाठीवर आपला नंबर लावणे सुद्धा गरजेचे आहे.
- संघ बारा पेक्षा जास्त खेळाडूंची नावे देऊ शकत नाहीत. खेळ चक्राकार पद्धतीनेच खेळला गेला पाहिजे.
- एका खेळा दरम्यान फक्त दोनदाच टाईम आउट मागू शकतात.
How to Play Volleyball in Marathi / खेळाची पद्धत :
- सर्वप्रथम नाणेफेक करून कोर्टाची बाजू निवडतात. प्रत्येक सामना तीन खेळांचा असतो आणि शेवटचा सामना पाच खेळांचा असतो. प्रत्येक खेळानंतर कोर्टची बाजू बदलली जाते.
- कर्णधार खेळाडूंचा क्रम निर्धारित करून त्यांना कोर्टमध्ये उतरवतो. हा क्रम नंतर बदलता येत नाही.
- नाणेफेक करून सर्विस करायची की नाही ते ठरविले जाते. सर्विस करणारा बॉलला हवेत उडवून त्याला हाताच्या सहाय्याने मारतो आणि प्रतिस्पर्धी संघाकडे टाकतो. तो पर्यंत त्याला सर्विस क्षेत्राच्या बाहेर जाण्याची परवानगी नसते.
- प्रथम सर्विस शरीराच्या कुठल्याही भागाच्या सहाय्याने केली तरी चालते. परंतु बॉलचा शरीराला फक्त एकदाच स्पर्श होऊ शकतो.
- बॉल जर आपल्याच कोर्टमध्ये पडला तर जास्तीजास्त तीनवेळा त्या बॉलला मारू शकतात.
- प्रतिस्पर्धी संघ सुद्धा बॉलला परतविण्याचा पयत्न करतो. आणि जास्तीजास्त तीन वेळा फटके मारू शकतो.
- बॉल टाकणारा संघ बॉल प्रतिस्पर्ध्याच्या कोर्ट मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो व विरोधी संघ बॉलला आपल्या कोर्ट मध्ये येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जाळीच्या जवळील खेळाडू उंच उडी मारून बॉलला थांबविण्याचा प्रयत्न करतात.
- असे तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत बॉल कोर्टमध्ये खाली पडत नाही किंवा इतर काही चुका होत नाहीत. बॉल खाली पडला किंवा काही चुका झाल्या तर विरोधी संघाला एक गुण मिळतो.
- खेळ जिंकण्यासाठी दोन गुणांचा फरक असणे गरजेचे आहे.
- जो संघ सामन्यातील जास्तीजास्त खेळ जिंकेल तो विजेता ठरतो.
- पहिलेच्या चार सेट मध्ये जो संघ दोन गुणांच्या फरकाने २५ पेक्षा अधिक गुण बनवेल तो विजेता असतो.
- जर तीन खेळांचा सामना असेल आणि दोन्ही संघ एक खेळ जिंकले असतील किंवा पाच खेळांच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ दोन-दोन खेळ जिंकले असतील तर शेवटच्या खेळात जो संघ सर्वात प्रथम आठ गुण प्राप्त करेल तो विजेता ठरतो. हा खेल जास्तीजास्त १५ गुणांपर्यंत खेळता येतो.
- खेळाडूंनी पुढचा खो देण्याआधीच मैदानात उतरणे आवश्यक असते जर कोणा खेळाडूने उशीर केला तर त्याला बाद ठरवण्यात येते. बाद झालेल्या खेळाडूच्या बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो.
चुका :
- बॉल कमरेखालच्या कोणत्याही भागाला लागला नाही पाहिजे. बॉल जास्त वेळ हातात ठेवता येत नाही लगेच मारावा लागतो.
- जर दोन जणांनी एकदम बॉल मारला आणि त्याचा दोनदा आवाज झाला तर त्याला डबल फाउल मानले जाते.
- जाळीला किंवा प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही शरीराचा स्पर्श झाला नाही पाहिजे. सर्विस बॉलचा सुद्धा जाळीला स्पर्श झाला नाही पाहिजे.
- बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊ देऊ नये. तसेच बॉल जाळीच्या खालून जाणे सुद्धा चुकीचे आहे.
- मागच्या रांगेतील खेळाडू पुढे येऊन बॉलला मारू शकत नाहीत. किंवा चुकीच्या चक्राकार पद्धतीने खेळू शकत नाहीत.
R/s does net services is a correct