Snake Information in Marathi
साप माहिती
- साप हा एक सरपटणार प्राणी आहे. साप पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो. जगभरात जवळजवळ २५००० ते ३०००० प्रकारच्या सापांच्या जाती आढळतात.
- साप चावल्याने माणसाचा मृत्यु होऊ शकतो. पण सगळेच साप विषारी नसतात. विषारी सापांच्या तोंडात एक पिशवी असते ती दातांना जोडलेली असते. जेव्हा हे साप कोणत्याही प्राण्याला चावतात तेव्हा हे विष दातांमार्फत प्राण्याच्या शरीरात प्रवेश करते.
- साप कोणतीही गोष्ट चावून न खाता गिळून खातात. बेडूक, पाल, उंदीर, चिमण्या हे सापांचे भोजन असते. सापांना पाण्याची गरज नसते ते आपल्या शिकारातुनच पाणी प्राप्त करतात.
- न्यूझीलंड आणि आईसलैंड या जगातील सर्वात दोन लहान देशात साप आढळत नाहीत. साप थंड ठिकाणी राहत नाहीत.
- विषारी सापांपैकी किंग कोबरा हा साप लांब असतो. त्यांची लांबी जवळजवळ १८ फूट असते.
- एक साप आपल्या तोंडाच्या तिप्पट मोठा शिकार खाऊ शकतो. साप आपले तोंड १५० अंशापर्यंत खोलू शकतो.
- साप एका वर्षात कमीत कमी तीन वेळा आपली चमडी काढतात.
- भारतीय संस्कृतीमध्ये नागपूजा महत्वाची मानली जाते. नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते.
- हिंदू देव शंकराच्या गळ्यात सापाला स्थान आहे.
- सगळ्यात लांब साप ‘पाईथन रेटीकुलटेस’ आहे ज्याची लांबी ३० फूट असते.
- सापांच्या प्रजातीपैकी ७० टक्के साप अंडी घालतात व बाकी ३० टक्के पिल्लांना जन्म देतात.
- साप नाकाने नाही तर आपल्या जिभेने वास घेतो. साप डोळे बंद करू शकत नाही कारण त्याच्या डोळ्यांना झापड नसतात. झापडांच्या जाग्यावर एक पातळ आणि पारदर्शी पापुद्रे असते जे सापांच्या डोळ्यांची रक्षा करते. साप डोळे उघडे ठेउनच झोपतो.
- काही साप काहीही न खाता १ ते २ वर्ष जिवंत राहू शकतात.
- सापाचे विष काढून त्यापासून तेल औषधे बनवली जातात. काही साप वीस फुटापर्यंत आपले विष फेकू शकतात.
- गरुड हा सापाचा शत्रू आहे.
- अजगर या सापाच वजन जवळजवळ १५० किलो असत. आफ्रीक्र्तील अजगर छोट्या गाईनाही गिळतात.
- वातावरणानुसार सापांच्या शरीराचं तापमान कमीजास्त होत असत. वाघ, हत्ती अशा इतर प्राण्यांप्रमाणे सापांना आपण शिकवू शकत नाही. कारण अन्य जीवांप्रमाणे सापांच्या डोक्यात सेरिब्रल हेमिस्पियर सापडत नाही.
- सापाला आतील कान असतो पण बाह्यकान नसतो.
- साप त्यांच्या त्वचेनेही श्वसन करू शकतात ज्यामुळे ते पाण्याखाली सुद्धा राहू शकतात.
king