Chrysanthemum Information in Marathi
Chrysanthemum (Shevanti) Flower – शेवंती माहिती
- शेवंती मुळची आशिया आणि युरोप या देशांमधील आहे. शेवंतीची फुले विविध रंगाची आणि आकाराची असतात.
- शेवंतीच्या सुमारे ४० जाती १०००हून अधिक उपप्रजाती आहेत. शेवंतीचे झुडूप छोटे असते. शेवंतीची फुले अर्ध्या इंचापासून १० इंच व्यासापर्यंत मोठी असू शकतात.
- शेवंतीची काही फुले चपटी थाळीसारखी असतात तर काही फुले गोंड्यासारखी असतात. शेवंती खासकरून पांढऱ्या व पिवळ्या रंगाची असते, परंतु काही शेवंतीची फुले जांभळी, गुलाबी, लाल, गडद गुलाबी, तांबूस रंगाची सुद्धा असतात.
- लाल शेवंती प्रेमाचे, पांढरी शेवंती सत्याचे आणि पिवळी शेवंती ममतेचे प्रतिक आहे.
- क्विल, डेजी, बटण, पोमपोम, स्पून, कुशन, स्पायडर आणि अनिमोन हे काही शेवंतीचे प्रकार आहेत.
- आशियातील काही भागांमध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या शेवंतीच्या फुलांना उकळून गोड पेय बनविले जाते. तसेच कोरियामध्ये तांदूळ आणि शेवंतीच्या सहाय्याने मद्य बनविले जाते.
- शेवंतीच्या फुलांच्या चूर्णापासून पायरेथ्रीन नावाचा एक घटक मिळतो जो कीटकांना व डासांना दूर पळविण्याचे काम करतो.
- नासाच्या अभ्यासातून उघडकीस आले आहे की, शेवंतीची झाडे घरात लावल्यास घरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
- युरोपमधील काही देशांमध्ये शेवंती मृत्यूचे प्रतिक आहे आणि अंत्यसंस्कार किंवा स्मशानभूमीतच शेवंतीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जपान, कोरिया आणि चीनमध्ये सुद्धा पांढरी शेवंती अधोगती आणि दुःखाचे प्रतिक आहे.
- ऑस्ट्रेलियामध्ये मदर्स डेच्या दिवशी आईला शेवंतीची फुले देण्याची प्रथा आहे. तसेच काही पुरुषही या दिवशी आईच्या सन्मानार्थ शेवंतीची फुले परिधान करतात.
- इटलीमध्ये ऑल सोल डेला मृत व्यक्तीच्या थडग्यावर शेवंतीची फुले वाहण्याची प्रथा आहे. इटलीत कोणालाही शेवंतीची फुले देणे अपमानास्पद आहे.
- जपानमध्ये राजेशाही कुटुंबातील व्यक्ती शेवंती फुलाच्या आकाराची मोहर उपयोगात आणीत. ९ सप्टेंबरला साजरा होणाऱ्या फेस्टिवल ऑफ हॅपीनेसमध्ये शेवंतीच्या फुलांची सजावट करतात. त्याचप्रमाणे शेवंती शिकागो शहराचे अधिकृत फुल आहे.
- काही ठिकाणी शेवंतीच्या फुलांचा चहा बनवितात जो सुगंधित आणि आरोग्यासाठी लाभदायक असतो. घश्याची सूज, ताप, डोकेदुखी यापासून चहामुळे आराम मिळतो. चीनमधील पारंपारिक औषधामध्ये शेवंतीचा उपयोग केला जातो.
- शेवंतीला सहसा ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये फुले येतात. नोव्हेम्बरमध्ये वाढदिवस असल्यास किंवा लग्नाच्या तेराव्या वाढदिवसादिवशी शेवंतीची फुले देण्याची प्रथा काही देशांमध्ये आहे.
- शेवंतीची फुले पाने काढून पाण्यात ठेवल्यास दोन आठवड्यापर्यंत राहू शकतात.
- फेंगशुईच्या अनुसार शेवंतीची फुले घरात सुख आणि आनंद आणतात.
- शेवंतीच्या फुलांचा व पानांचा उपयोग चीनी लोक जेवणात सुद्धा करतात. हे जास्त चविष्ट नसते पण खूप लाभदायक असते.
Ty 4 d info.