Rose Information in Marathi
Gulab Mahiti / गुलाब माहिती
- गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजले जाते. शिव पुराणामध्ये गुलाबाला देवपुष्प संबोधले आहे.
- गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. तसेच ते सुवासिकही आहे. आपली सुंदरता आणि कोमलतेमुळे हे फुल लोकांत खूप प्रिय आहे. आणि म्हणूनच लहान मुलांन गुलाबाची उपमा दिली जाते.
- भारतात तीन प्रकारचे गुलाब आढळतात, कलमी, देशी आणि रानटी गुलाब.
- गुलकंद आणि अत्तर तयार करण्यासाठी देशी गुलाबाची फुलेच वापरली जातात कारण ती फार सुगंधी असतात.
- रानटी गुलाबांच्या रोपावर कलम करून विलायती जातीचे गुलाब बनविले जाते. भारतात विलायती गुलाबांच्या जवळपास १०० जाती आहेत.
- विविध रंगांचे गुलाब बागांची शोभा वाढवतो. तसेच गुलाबाचे फुल प्रेमाचे, मैत्रीचे आणि शांततेचे प्रतिक आहे. तसेच याचा उपयोग घरांची सजवण्यासाठी, हार, पुष्पगुच्छ बनवण्यासाठी सुद्धा होतो. स्त्रिया शृंगार करण्यासाठी याला डोक्यात माळतात.
- गुलाबाच्या झाडाला बहुधा बारमाही फुल येते. फक्त मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान मुबलक प्रमाणात उपलब्ध पाहिजे.
- या फुलाच्या उपयोगितेमुळे याचा मोठया प्रमाणात व्यवसाय देखील केला जातो. भारतातूनही वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबाच्या फुलांची मोठया प्रमाणात निर्यात होते.
- क्षारयुक्त जमिनीत गुलाबाचे रोपटे चांगले बहरत नाही. त्यासाठी उत्तम निचरा होणारी जमीन आणि जमिनीचा पी.एच. ६.० ते ७.५ पर्यंत असावा लागतो. तसेच चांगल्या प्रतीची माती गरजेची असते.
- भारत सरकारने १२ फेब्रुवार हा दिवस ‘गुलाब दिवस’ म्हणून घोषित केला आहे.
- काश्मीर आणि भूतान मध्ये पिवळ्या रंगाची जंगली गुलाबी फुले मोठया संख्येने आढळतात.
- गुलाबाचे झाड रोपट्यासारखे असते त्याला टोकदार काटे असतात. काही ठिकाणी ते वेलीसारखेही आढळते.
- गुलाबापासून अत्तर बनवण्याचा आविष्कार नुरजहाने केला. गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर यांच मिश्रण करून गुलकंद बनवले जाते.
- लाल, गुलाबी, पिवळ्या गुलाबांसह हिरव्या आणि काळ्या रंगाची गुलाबेही काही ठिकाणी फुलतात. हिरव्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ह्या पानांसारख्या भासतात. काळ्या रंगाचे गुलाब खरेतर गडद लाल रंगाचे असते.
- गुलाब हे इंग्लंडचे राष्ट्रीय फुल आहे तसेच अमेरिकेचे राष्ट्रीय प्रतिक सुद्धा आहे.
- खूप कमी लोकांना हे माहित आहे कि गुलाबाचे फुल झडल्यानंतर त्याला फळे लागतात ज्यांचा रंग लाल, जांभळा किंवा काळा असतो.
- २००९मध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने सर्वात पहिले निळे गुलाब बनविले गेले.
- या फळांपासून बनविण्यात आलेल्या शरबतात मोठया प्रमाणात विटामिन सी आढळते. तसेच याचे अनेक औषधीय उपयोगही आहेत.
- पंडित जवाहरलाल नेहरू गुलाबाचे फुल आपल्या कोटाच्या खिशात लावत असत. ते त्यांना अतिशय प्रिय होते.
Hi,
It’s true, honest thank you…Whoever u are!
Please write information
Not POINT.
Thanks for this information and I am a child, I also want this information for project very much thank
Thank you
LOVELY INFO. Thank you very much.
Tuljapur
Thanks for this info