Mogra Flower Information in Marathi
Mogara Mahiti / मोगरा माहिती
- मोगरा हे एक प्रकारचे सुवासिक फुल आहे ज्याच्या सुगंधाने कोणाचेही मन मोहून जाऊ शकते. मोगऱ्याचे फुल पांढऱ्या रंगाचे असते व त्याची प्रकृती उष्ण असते.
- मोगऱ्याला संस्कृतमध्ये मालती किंवा मल्लिका म्हणतात व त्याचे लॅटिन नाव जेसमिनम सेमलेक आहे.
- मोगरा हे खरेतर भारतीय झाड आहे व इथूनच त्याचा विस्तार इतर देशांमध्ये झाला.
- मोगऱ्याचे झाड हे खर तर वेलीसारखे असते पण नंतर त्याचा झुडपासारखा विस्तार होतो.
- मोगऱ्यापासून सुवासिक अत्तर तयार केले जाते. हे फुल २.५cm चे असते. मोगऱ्याचे फुल शक्यता पहाटेच तोडतात.
- बेला, मोतिया, मदनमान, पालमपूर ह्या काही मोगऱ्याच्या प्रजाती आहेत ज्यामधील मोतिया सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.
- मोगऱ्याचे झाड वसंत ऋतुत चांगले बहरते त्यासाठी त्याला सुरुवातीला शेणखत घालावे लागते. मोठया मोगऱ्याला आधार दिल्यास वाढीस मदत होते. व फुल झडल्यावर त्या भागाची छाटनी केली जाते.
- मोगऱ्याला बिया नसतात. लांब वाढलेली मोगऱ्याची फांदी वाकवून ती दुसऱ्या ठिकाणी पुरतात व नवीन रोप तयार करतात. तसेच जिथे नवीन पाने येतात तो भाग तोडून मातीत पुरल्यावर नोडपासून खाली मुळे फुटतात. ही माती ओलसर ठेवावी लागते. अशा प्रकारे मोगऱ्याचे रोप तयार केले जाते.
- मोगऱ्याच्या फुलाचे तेलही बनवले जाते ज्याचा उपयोग क्रीम, शाम्पू आणि साबणात केला जातो. तसेच अरोमाथेरपीमध्ये मोगऱ्याच्या तेलाचा उपयोग तणाव पासून मुक्तता देण्यासाठी आणि आरामदायक म्हणून वापरला जातो.
- स्त्रिया मोगऱ्याचा गजरा बनवुन तो श्रुंगार प्रसाधनासाठी केसात लावतात. खास करून दक्षिण भारतीय स्त्रिया याचा जास्त उपयोग करतात.
- भगवान शिव आणि विष्णुसाठी जास्त करून मोगऱ्याची फुले वाहिली जातात.
- या फुलांच्या कळ्यांचा उपयोग अल्सर, त्वचारोग आणि डोळ्यांच्या उपचारासाठी केला जातो. त्या अतिशय गुणकारक आहेत.
- मोगऱ्याच्या झाडाची उंची १०-१५ फूट असते. दरवर्षी हे झाड १२-२४ इंचाने वाढते.
- मोगरा हिवाळ्यात बहरतो व जिकडेतिकडे आपला सुंदर सुगंध पसरवतो. मोगऱ्याची फुले बराच काळ टवटवीत रहातात अगदी उष्ण तापमानात सुद्धा.
- मोगऱ्याची चहा दररोज पिल्याने कॅन्सर दूर होण्यास मदत होते. तसेच ताप, इन्फेक्शन आणि मुत्ररोगामध्येही मोगऱ्याच्या चहामुळे आराम मिळतो. चीनमध्ये चहाचा स्वाद वाढविण्यासाठी या फुलांचा वापर होतो.
- मोगऱ्याच्या पानांचा लेप जखम, खरुज किंवा फोडांवर केल्याने त्वरित आराम मिळतो.
- मोगरा हे भारतातील अनेक सुंदर आणि सुवासिक फुलांपैकी एक आहे आणि त्याचा उपयोग अत्तर बनविण्यासाठी सुद्धा होतो.
- मोगरा फिलिपिन्स देशाचे राष्ट्रीय फुल आहे.
Mogra Information in Marathi / Flowers Wikipedia Language
Related posts
Sadafuli Information in Marathi | Periwinkle Flower | सदाफुली फूल
Cosmos Flower Information in Marathi | Flower Essay | कॉसमॉस फूल माहिती
Chafa Flower Information in Marathi, आवडते फुल निबंध ( चाफा )
Rose Information in Marathi, Rose Flower Essay गुलाब माहिती Gulab
Jasmine Flower Information in Marathi l जाई फुलाची माहिती
Lotus Information in Marathi II कमळ फुलाची माहिती
Jaswand Flower Information in Marathi, Hibiscus Essay l जास्वंद फुलाची माहिती
Marigold Flower Information in Marathi ll झेंडू फुलाची माहिती
Nice information you are giving from where does get this information
Wow !awesome I don’t know about mogra that much
Nice research